29/07/2024
नमस्कार, Dhiro News च्या बातमी गावाकडची मध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 29 जुलै 2024 12:00 am
धिरो News youtube चॅनेल आणि वेब news पोर्टल च्या माध्यमातून चला बघूया आजच्या ठळक बातम्या
Dhiro news 29/07/2024 11.04 am
शिकार झालेला 'तो' वाघ कुठला?
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ६ जणांना १४ दिवसांची कोठडी
Dhiro न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे २९ जुलै रोजी वाघांच्या संरक्षणासाठी जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जात असताना, दुसरीकडे शनिवारी वाघाची शिकार करून कातडीची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, शिकार करण्यात आलेला वाघ कुठला..? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
वन विभागाकडून हा वाघ मध्य प्रदेशातील असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नशिराबाद टोलनाक्याजवळ वाघाची कातडी घेऊन तस्करी करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीमाशुल्क विभागाने या सहा जणांना वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. शनिवारी सर्व सहा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची वन कोठडी ठोठावली आहे.
जिल्ह्यात आधी तीन वाघांचा झाला आहे मृत्यू
वाघाच्या कातडीची तस्करी होत असलेल्या वाघाची शिकार
१ कोठे झाली? याबाबत वन विभागाकडून चौकशी सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई- भवानी वनक्षेत्रात ६ ते ७ वाघ असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यापैकी तीन वाघांचा मृत्यू गेल्या ११ वर्षांत झाला आहे.
२०१३ मध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील वायला टाकळी
परिसरात एका वाघाचा मृत्यू झाला होता. २३ मार्च २०१८ रोजी सुकळी भागात एक वाघीण मृतावस्थेत सापडली होती. ही वाघीणही अनेक दिवस जखमी अवस्थे जंगलात फिरत होती. मात्र, वन विभागाला या वाघिणीचाही शोध घेता आला नव्हता.
१२ ऑगस्ट २०१८ रोजी पूर्णा नदीच्या काठालगत असलेल्या एका केळीच्या बागेत एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. दोन वर्ष होऊनही या वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबतचा अहवालदेखील समोर आलेला नाही. वाघाच्या कातडीची तस्करी करत असलेल्या सहा जणांना १४ दिवसांची वन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची आता चौकशी सुरु आहे. या चौकशीअंतीच शिकार झालेला वाघ कुठला, हे समजेल. मध्य प्रदेशातून वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याचा संशय आहे. मुक्ताई भवानी अभयारण्याची घोषणा झाली आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मंजुरीच्या ठरावाची गरज आहे. त्या सर्व गावांमधील ग्रामस्थांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. अ