15/06/2025
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५
🕯️ १६ जून २०२५ – शिक्षणाच्या पवित्र मूल्यांना श्रद्धांजली
आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. पण शिक्षणाचा खरा अर्थ, निस्वार्थी तत्व, आणि विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क — हे सर्व आज बाजारीकरणाच्या अंधारात हरवलेले दिसतात.
तर्फे घेतलेल्या उपक्रमातून हे स्पष्ट झाले की,
शिक्षण आज उपलब्ध आहे – पण सगळ्यांसाठी नाही.
ज्यांना खरोखर गरज आहे, त्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये.
ते आजही संघर्ष करतायत — शिक्षण मिळवण्यासाठी, नव्हे, तर त्याचा हक्क सिद्ध करण्यासाठी.
मात्र, आपला समाज केवळ वरवरची सहानुभूती दाखवतोय.
शिक्षणाचा अधिकार हा फक्त बोलण्यात उरला आहे, कृतीत नाही.
शिक्षणच जिथे विकले जाते, तिथे ज्ञानाची पवित्रता हरवलीच जाणार.
आजचे शिक्षण
– गरजूंना नाकारते,
– पैशांच्या जोरावर उभं आहे,
– आणि त्यात निस्वार्थपणा हरवलेला आहे.
🕯️ म्हणूनच –
खऱ्या, निस्वार्थी, आणि सगळ्यांसाठी असलेल्या शिक्षणाच्या मृत होत चाललेल्या मूल्यांना
‘जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक’ तर्फे,
आणि महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने,
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 अर्पण.
सांगायला वाईट वाटते की - देवाऱ्यातला देव हरवलाय...!!!