भन्नाट नाशिककर

भन्नाट नाशिककर नाशिककर एकत्र आणण्याचा एक छोटासा प्रयत्न..

माझ्या सर्व अस्सल नाशिकर मित्रांना एक विनंती आहे जर आपण खरोखरच अस्सल नाशिकर असाल आणि नाशिक वर तुमच नितांत प्रेम असेल तर कृपया हे page share करा व आपल्या सर्व नाशिककर मित्रना " भन्नाट नाशिकर " मध्ये join होण्यास सांगा ..

05/07/2025
03/07/2025

महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये,जिल्ह्यामध्ये,तालुक्यामध्ये अन् गावमध्ये ज्या पध्दतीने परप्रांतीयाचे लोंढे वाढतं आहेत!

त्यामानाने मनसे स्टाईल खळखट्याक् चं योग्य आहे! हे इतके मुजोर आहेत,ना!की जरा डोक्यावर घेतीलं की मस्ती दाखवयला चालू करतात..! काय काय ठिकाणी आपल्याचं मराठी स्ञियांना,मुलींना बाहेर फिरायचे मुश्किल झाले..! कमी पैश्यातं लेबर मिळतं असल्यामुळे स्थानिक मराठी माणसाला कमी पगारीमध्ये मुजोर व्यापारी वर्ग व उदयोग व्यावसायिक भाग पाडतं आहेत..!

मुंबई सह उपनगरामध्ये ह्या प्रमाण जास्तीचं आहे,त्याबरोबरचं सर्वञ महाराष्ट्रभर प्रमाण वाढलेले आहे! भाजपशासितं राज्यातील लोढें इथल्या भाजप सरकारने पुरस्कृत केलेतं आहे..!

जो मराठी माणसासाठी लढतोयं...संघर्ष करतोयं...स्वत;च्या अंगावर केसेसं घेतोयं...रस्त्यावर उतरूनं हाथपाई करतो...त्यालाचं मराठी माणसे साथ न देता...उलटे शिव्या घालतं आहेत...मराठी माणसांच्या अस्मितेसाठी संघर्ष करणार्‍या तरुणांच्या,पक्षाच्या आणि संघटनेच्या जास्तीत जास्त विरोधामध्ये इथलाचं मराठी माणूस आहे...हे दुर्देवं आहे..आपल्या मराठी मातीचे...

हे येणार्‍या काळातीलं सर्व धोके ओळखूनं मराठी माणूस किमान....जातपात धर्म न बघता...तो फक्त मराठी माणूस आहे...हेचं महत्वाचे मानूनं आपण एकमेकांना साथ देणे गरजेचे आहे...

इथले उदयोग,व्यवसाय,शेती,संस्कृती,मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकणे ही फार काळाची गरजचं आहे...🙏❣️🚩

सर्वांना नम्र विनंती आहे की येत्या पालकसभेत आपण आपल्या लेकरांचा विचार करून तृतीय भाषेच्या या अन्यायकारक लादणुकी विरोधात ...
21/06/2025

सर्वांना नम्र विनंती आहे की येत्या पालकसभेत आपण आपल्या लेकरांचा विचार करून तृतीय भाषेच्या या अन्यायकारक लादणुकी विरोधात आपली भूमिका मांडावी.
उद्या जर तुम्ही काहीच बोलला नाहीत तर आपल्या लेकरांना हे पुढे खूप त्रासदायक होईल.
CBSE च्या मुलांना केवळ दोन भाषा असतात. सरकारने कितीही सांगितलं की आम्ही त्या बोर्डांना तृतीय भाषेची सक्ती करू तरीही कोणतीही CBSE बोर्डाची शाळा राज्य शासनाच्या या निर्णयाला जुमानत नाही. ते सांगतात की आम्हाला CBSE चे नियम लागू होतात.

CBSE ने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात शाळांना केवळ दोन भाषा शिकवायला सांगितले आहे.
त्यातली पहिली भाषा मातृभाषा आणि दुसरी भाषा इंग्रजी आहे.

जर शासनाने CBSE पॅटर्न लागू केला आहे तर CBSE प्रमाणे दोन भाषा का शिकवल्या जात नाहीत हा प्रश्न आपण विचारला पाहिजे.
CBSE बोर्डाच्या दहावी परीक्षेत तृतीय भाषा अनिवार्य नाही त्यामुळे त्याऐवजी ती मुले Artificial Intelligence हा विषय घेतात आणि एक नवीन विषय शिकतात.
आपल्या मुलांच्या माथी तिसरी भाषा मारली जाते व अशा आधुनिक विषयापासून वंचित ठेवले जाते.

कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की यात शाळेची काहीच चूक नाही. शाळेला शासनाने दिलेले निर्णय बंधनकारक असतात. परंतु आपण विरोध दर्शवला तर शाळेतर्फे वरती तसे कळवले जाऊ शकते.

उद्या सर्वांनी या निर्णयाला विरोध करा.
मी वरती पाठवलेले पोस्टर वाचा. ही सर्व मंडळी तज्ज्ञ मंडळी आहेत ज्यांचा अभिप्राय न घेता शासनाने हा निर्णय लादला आहे.

सर्वांना कळकळीची विनंती आहे 🙏🏻
आपल्या लेकरासाठी कृपया ठाम भूमिका घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आणि पुन्हा एकदा सांगतो, यात शाळेला दोष देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻

#तिसरीभाषानकोच

महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र, एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नु...
18/06/2025

महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र,

एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल.

हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी.

पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार. पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का ? तसा तो कुठे आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे मग तिसरी भाषाच मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय. याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका.

मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे.

सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं ,अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.

उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.

या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की...
महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे !

बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे !

आपला

राज ठाकरे ।

24/05/2025

*आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात CASH भीक देणं बंद*
भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. *अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.* आणि ही चळवळ योग्यच आहे.*कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही**याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर 'भिकारी' या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.*सुरवात करा पोस्ट शेअर करा..आणी कृपया एक हि रुपया भिकाऱ्याला देऊ नका.. खूप वाटल तर गाडीत 2बिस्कीट चे* *पुडे ठेवा पण पैसे देऊ नका* 🙏🙏या मोहिमेशी सहमत असल्यास हा विचार किमान १० व्यक्तींना आणि किमान पुढील तीन ग्रुप पुढे पाठवा.*🙏🙏

👆 Received from another group of friends.🙏🙏🙏

21/05/2025

#सतरंजी उचल्या कार्यकुत्र्यांना अजितदादांचा मोलाचा सल्ला😅🙏🏻
😅😁
#एनसीपी #भाजपा #मनसे #शिवसेना #काँग्रेस #राष्ट्रवादी

इतर राज्यात विजय साजरा करत असताना, सीमावर्ती राज्यांमधील आपल्या बंधू-भगिनींनी सहन केलेल्या वेदना विसरू नयेत. त्यांच्या स...
09/05/2025

इतर राज्यात विजय साजरा करत असताना, सीमावर्ती राज्यांमधील आपल्या बंधू-भगिनींनी सहन केलेल्या वेदना विसरू नयेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतीसाठी प्रार्थना करावी…🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Nasik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भन्नाट नाशिककर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category