23/07/2026
वाट ही पंढरीची | Pandharpur Bhakti Geet 🌸
https://youtu.be/8IsOmTL59Ro?si=
गायक व संगीतकार: अशोक काजळे
गीतकार: शेख बिस्मिल्ला सोनीशी
Music Production & Mix by Sharang Raj
✨ विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेली ही भक्तीमय वाट…
“वाट ही पंढरीची” हे गीत तुम्हाला आषाढी वारीच्या भावविश्वात घेऊन जातं. वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, ओठांवर विठ्ठलनाम, आणि अंतःकरणात खोल भक्ती…
🎵 या गीताच्या माध्यमातून अनुभव घ्या पंढरपूरच्या वारीचा भक्तिपूर्ण सोहळा.
🙏 विठ्ठल विठ्ठल म्हणत या भावगीताला प्रेमाने ऐका, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
जय हरि विठ्ठल! जय पांडुरंग!
विशेष आभार
समस्त ग्रामस्थ पिंगोरी
🔔 सबस्क्राईब करा अशोक काजळे यांचा अधिक भक्तिगीतांसाठी.
#वारीगीत #पंढरपूरवारी #आषाढीवारी #वाटहीपंढरीची
Video Credit : -
Director By - Ashokk Kajale
Actor - Vinod Shinde
Editing & DI - Akshay Jadhav ( Bombaybase )
DOP - Bharat Wagh / Shubham deshmukh
Drone - Girish Khasbage
Production Head - Nayana Kajale
Location - Jejuri - Walhe - Pingori
विशेष आभार
समस्त ग्रामस्थ पिंगोरी
शुभम देशमुख
गिरीश खासबागे
Audio Credits
Singer : - Ashokk kajale
Music Director : - Ashokk kajale
Lyrics : - Shaikh Bismillah Sonoshi
Music Production & Programming : - Sharang Raj
Guitar : - Sharang Raj
Mix & Master : - Sharang Raj
Recording Studio : - J.S Sounds ( Rabale ) Navi Mumbai
गीत
वाट ही पंढरीची
वारी चाले विठ्ठलाची
टाळ मृदंगाच्या नाद
वीणा चीपळ्यांची साद
त्यात गोडी अभंगाची
घुमे विठ्ठल विठ्ठल नाद
झाली पंढरी नजर
विठ्ठल विठ्ठल गजर
कसा ओसांडूनी वाहे
उरी भक्तिचा पाझर
जरी पाया आले फोड
तरी पांडुरंग ओढ
देह विठुमय सारा
मुखी हरी नाम गोड
वाट पंढरीची......
भूक तहान हरली
माया संसारी सरली
वारकरी चित्तालाया
गोडी हरीची लागली
घेण्या विठूचे दर्शन
कसे आतुरले मन
पुढे चालती पाऊले
विसरुनी देहभान
वाट ही पंढरीची.....
🌸 वाट ही पंढरीची | Pandharpur Bhakti Geet 🌸गायक व संगीतकार: अशोक ...