08/06/2023
६ लाख रुपयाचा एलएसडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या इसमास नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर १४ येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडुन केली कारवाई
प्रतिनिधी (CNI) : मिलींद भारंबे पोलीस आयुक्त, संजय मोहिते (पोलीस सह आयुक्त), दीपक साकोरे (अपर पोलीस आयुक्त- गुन्हे), प्रशांत मोहिते (पोलीस उप आयुक्त- गुन्हे) यांनी नवी मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याचे व त्याचा व्यापार करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
दि. ३१/०५/२०२३ रोजी नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेस गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि, नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर १४ कडे जाणारा रोड, पामबिच सव्र्हस रोडवर, नेरुळ, नवी मुंबई येथे एक इसम एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुशंगाने विनायक वस्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि बासीतअली सय्यद, पो.उप निरीक्षक, विजय शिंगे, पोहवा / १३७७ रमेश तायडे, पोना / २८७९ महेंद्र अहिरे, चापोकॉ/ ४६९८ अनंत सोनकुळ तसेच गुन्हे शाखा प्रशासन विभागाचे पोहवा / ८८९ रविंद्र कोळी व पोना / २६४३ संजय फुलकर या पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने सापळा लावला असताना सदर ठिकाणी रात्री ०९.२५ वा. च्या सुमारास आरोपी मोहमंद फैसल खतीब, वय २७ वर्षे हा एकुण ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडुन सदरचा एलएसडी हा अंमली पदार्थ तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीत इसम हा आर्किटेक्चर मध्ये पदविधर असुन उच्चशिक्षण घेत आहे. तसेच तो सुस्थापित घरातील असुन केवळ पैशांच्या हव्यासापोटी सदरचा गैरकायदेशिर धंदा करत असल्याचे आहे. समजुन येत
सदर आरोपी विरुध्द नेरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर २४९ / २३ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उप निरी. विजय शिंगे हे करित आहेत.