11/10/2025
#ऐरोली_नाटयगृहाचे_65_टक्के_काम_पूर्णत्वास.
#नवीन_वर्षाच्या_प्रारंभापर्यंत_काम_पूर्ण_करण्याचे_आयुक्तांचे_निर्देश
सुमेध वाघमारे
ऐरोली ब्रेकिंग न्युज
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली से.5 येथे भूखंड क्र.37 वर बांधण्यात येत असलेल्या नुतन नाटयगृहाच्या सुरु असलेल्या बांधकामाची संपूर्ण पाहणी करुन येथील कामाच्या प्रगतीचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईनी आढावा घेतला. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वास्तुविशारदांनी केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण पाहून आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या.
सद्यस्थितीत या प्रकल्पाचे साधारणत: 65 टक्के काम पूर्ण झाले असून या कामाची गुणवत्ता राखत कामाला गती द्यावी व नवीन वर्षाच्या प्रारंभापर्यंत काम पूर्ण करण्याचे कालबध्द नियोजन करावे असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले
• #कसे_असेल_नूतन_नाट्यगृह?
860 आसन क्षमतेचे हे नाटयगृह 4 मजली उंचीची असून या ठिकाणी पहिल्या व दुस-या बेसमेंटमध्ये चार चाकी व दुचाकी वाहन तळाची व्यवस्था आहे.
• तळ मजल्यावर काही भाग वाहनतळाचा असून मुख्य प्रवेशव्दारावर स्वागत कक्ष, तिकिट बुकींग कार्यालय, फुड काऊंटर, प्रशासकीय दालन, भांडार गृह तसेच नाटय साहित्याची ने – आन करण्याकरीता स्वतंत्र प्रवेशव्दार आहे.
• पहिल्या मजल्यावर रंगमंच तसेच प्रेक्षागृहात 478 आसन व्यवस्था आणि ध्वनी नियंत्रण कक्ष व रंगीत तालीम कक्ष आहे.
• दुस-या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, 382 आसन व्यवस्था, भांडार कक्ष व महिला कलाकारांसाठी रंगभुषा कक्ष आहे.
• तिस-या मजल्यावर पुरुष रंगभुषा कक्ष, ध्वनी / प्रकाश नियंत्रण कक्ष व्यवस्था आहे.
चौथ्या मजल्यावर विशेष अतिथी कक्ष, कलाकारांच्या सुविधांकरीता कक्ष अशी व्यवस्था आहे.
• या नाटयगृहामध्ये सहा प्रवासी उद्वाहक आणि एक हायड्रोलिक उद्वाहक व्यवस्था आहे.
या प्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता संजय पाटील व संबधित अधिकारी उपस्थित होते.
Airoli Breaking News Navi Mumbai Municipal Corporation Airoli - ऐरोली Airoli Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस Maharashtra DGIPR Mumbai - मुंबई Ganesh Naik Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Mumbai Local Trains Thane Police Commissionerate Vijay Chougule - विजय चौगुले Naresh Mhaske Gajanan Kale MNS Mumbai City, Maharastra Airoli ..... Business and Gossip Airoli Rabale ghansoli koparkhairne all Navi Mumbai Ajit Pawar Kopar Khairane - Navi Mumbai Thane City Thane City Navi Mumbai Thane Vashi Navi Mumbai Ghansoli Nerul (Navi Mumbai ) Kalyan & Dombivli Kalyan City Panvel,Navi Mumbai