मराठीLine

मराठीLine अस्सल मराठी मनोरंजन, जोक्स, बातम्या, राजकारण,

सुरमई एका हजाराला मिळते . पापलेट सतराशे रुपयांना. मटण साडेसातशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे याचा विचार करत लिंबाखाली ब...
04/06/2025

सुरमई एका हजाराला मिळते . पापलेट सतराशे रुपयांना. मटण साडेसातशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे. मी येतो की संध्याकाळी. ’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’ मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो.मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात?

तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.

’याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची.

दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.माझ्या घरातले मासे श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती….

निशब्द…

लेखक : अज्ञानी

02/09/2024
शहरातल्या प्रत्येकाला वाटतं कोकणात असं एक घर असावं #कोकण
20/07/2024

शहरातल्या प्रत्येकाला वाटतं
कोकणात असं एक घर असावं

#कोकण

आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी, याचं नवल मलाचं वाटतं..दिसायला एकदम दणकट, राकट म्हणजे कोणती...
18/07/2024

आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी, याचं नवल मलाचं वाटतं..दिसायला एकदम दणकट, राकट म्हणजे कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा.

कॉलेजमध्ये येऊन टवाळक्या करायच्या. बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची.बुलेट काढून सगळ्या कॉलेजला कानठळ्या बसवायच्या, पण पोरींच्या बाबतीत फुल रिस्पेक्ट. टुकार पोरांचा कॉलेजमध्ये असताना त्रास व्हायचा. त्यांच्या प्रोपोज ला नकार दिला की गाडीची हवा सोड, सीट फाड असे भिकार चाळे चालायचे. याच्याशी ओळख झाल्यानंतर या सगळ्या ल फड्यातून सुटका झाली...

त्याचा आधार वाटायचा. प्रेम वगैरे होतं हे फार नंतर कळालं. एखादा पुरुष आपल्यासाठी ढसाढसा रडतो हे पाहिल्यानंतर मनात कालवायचं. २१ वर्षाची होते मी. कोणताही निर्णय घेण्याची अक्कल नव्हतीच. घरच्यांना खोटं बोलून त्याच्यासोबत फिरायला जायचे. कित्येकदा असे प्रसंग आले, त्याच्या मनात आलं असतं तर तो वाट्टेल ते करू शकला असता. मीदेखील आडवलं नसतं. उलट मलाच कधी कधी इच्छा व्हायची. मिठी मारून पाठीवर हात फिरवायला पाहायचे पण तो तिथेच आडवायचा.तू लहान आहेस बेटा, हे सारं नको....

त्याचं लग्न झालं पण मला त्याची लागलेली सवय काही सुटत नव्हती. वाटायचं कशाला त्याच्या संसारात ढवळाढवळ करायची. कितीही प्रयत्न केला तरी राहावायचं नाही आणि मी फोन करायचे. उगाच रडायचे. तो समजावून सांगायचा. लग्न कर म्हणायचा, तुझं मन रमेल. मी तर त्याची रखेल म्हणून राहायलाही तयार होते...

त्याने जपलं मला. माझ्या मनाला सांभाळलं. तिशी पार केलेल्या पुरुषाला एक विशीतली तरणीताठी पोरगी सर्वस्व देत होती, पण त्याने मोह कधीच केला नाही. भेटायला यायचा. बायकोसोबतचे फोटो पाहिले की मी चिडायचे. तुला आता मिळाली, माझी कशाला काळजी वाटणार. त्याने तोल कधीच ढळू दिला नाही. माझ्या बालीशपणाला परिस्थितीच भान आणून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला...

आज मला एक मुलगी आहे. नवरा चांगला कमवणारा, प्रेम करणारा, सगळं सुखात. कॉलेजचा विषय निघाला की आठवण येते त्याची. फेसबुकवरून कॉनटँक्ट देखील केला मी. भेटायला येशील का विचारलं. सुरुवातीला तो नाही म्हणाला, मग मीच जास्त फोर्स केला. माँल मध्ये भेटायचं ठरलं. आरशासमोर नटताना वेगळाचं उत्साह होता. लिपस्टिक नीट लागलीये का हे पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. दिवाळीत घेतलेली नवीन कोरी साडी नेसली. दर्ग्याशेजारून आणलेलं छान अत्तर लावलं, त्याला आवडणारं. ठरल्या वेळेला संध्याकाळी पोहचले...

तास दोन तास झाले, तो आलाच नाही. मी फोन लावला पण लागतचं नव्हता. वाट पाहायचं ठरवलं. आठ वाजून गेले तरी तो नव्हता आलेला. प्रचंड राग आला. ही कुठली वागण्याची पद्धत झाली. चिडचिड करत मी रिक्षा पकडली. त्याचा काँल आला. हावरटासारखा मी लगेच उचलला...

“छान दिसत होतीस. सुंदर अगदी. बर्याच दिवसांनी पाहिलं तुला. तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेलीये. फेसबुकवर पाहिलं मी. काही आठवणी आठवणीच चांगल्या असतात बेटा. त्यांना फुलासारखं जपायचं. तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले. किती बदल झालाय तुझ्यात. मला मोह नसता आवरला म्हणून समोर नाही आलो. स्वतःला असंच जप. काळजी घे, तुझी आणि घरच्यांचीसुद्धा.....”

फोन कट झाला. पुन्हा लागणार नाही याची खात्री होती. आजही तोच जिंकला. मी अजूनही लहानच आहे, बालिश,पोरकट. तो मैदानात उतरलाचं नाही. स्वतःची विकेट राखून ठेवली त्यानं.....माझा डाव सावरण्यासाठी.

- अभिनव ब. बसवर…...............................................................

● मी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या त्या अबोल, अव्यक्त नात्यासाठी- माझ्याकडून.

वयात येण्याचे वय अन् विवाह करण्याच्या वयात दिवसेंदिवस गॅप वाढत चालल्यामुळे विवाहपूर्व शरीर संबंध ही आजकाल सर्वसामान्यपणे...
01/06/2024

वयात येण्याचे वय अन् विवाह करण्याच्या वयात दिवसेंदिवस
गॅप वाढत चालल्यामुळे विवाहपूर्व शरीर संबंध ही आजकाल सर्वसामान्यपणे आढळून येणारी बाब झाली आहे, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्याबाबत खुलेपणाने विचार विनिमय व चर्चा होणे फार गरजेचे आहे, ते मात्र घडत नाही... विवाह करण्याचे नक्की ठरलेले आहे, परंतु घराची सोय नाही, शिक्षण चालू आहे, नोकरी नाही अशा अनेक कारणांनी विवाह लांबतो, अशावेळी दोघांच्या संमतीने शरीरसंबंध आला, तसेच गर्भधारणा न होण्याच्या दृष्टीनेही काळजी घेतली गेली असे बऱ्याच अविवाहित जोडप्यांच्या बाबतीत घडते... तथापि मुलीची इच्छा नसतांना, याच मित्राशी विवाह करावा की नाही अशी द्विधा मन:स्थिती असल्यामुळे वा विवाहाची शक्यता कमी असल्यामुळे मुलगी शरीरसंबंधास राजी नसेल, अशावेळी जर तिचा मित्र शरीर संबंधासाठी तिच्यावर दबाव आणत असेल तर ते गैर आहे.

मैत्रणींनो,

तुम्ही तुमच्या मित्राबरोबर एकटया फिरायला गेलात, तुम्ही एकत्र कॉफी घेतलीत किंवा सिनेमा पाहिलात की लगेच तो पुढची अपेक्षा धरतो. तुम्ही शरीरसंभोगाला तयार आहात असे तो गृहीतच धरतो.

तुम्ही नकार दिला तर त्याला अतिशय राग येतो. तुम्हाला सोडून जाण्याची धमकी तो देतो. संभोगास नकार, म्हणजे माझ्यावर तुझे प्रेम नाही असे तो म्हणतो. प्रेम सिध्द करायचे असेल तर माझ्याबरोबर चल अशी गळ तो घालतो.

तू माझ्याबरोबर इतक्या वेळा एकटी आलीस, मला झुलवलेस, खेळवलेस असे आरोप तो करतो. परंतु लक्षात ठेवा या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. तुमची इच्छा ही सर्वात महत्वाची आहे. तुमचे शरीर तुमचे आहे. त्यावर फक्त तुमचा अधिकार आहे.

त्यामुळे अगदी चुंबनापर्यंत तुमचे संबंध पोहोचले असले, तुम्ही त्याला तोपर्यंत कधीही नकार दिलेला नसला तरी शरीरसंबंधाला तुम्ही नकार देऊ शकता. तुम्ही नकार देऊन देखील त्याने तुम्हाला एकांतात गाठले व तुमच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध घडला तर तो बलात्काराचा गुन्हा आहे.

समजा तुम्ही स्वेच्छेने शरीरसंबंधाला तयार झालात तर त्याने निरोध वापरायलाच हवा, या पूर्वअटीवर तुम्ही ठाम रहायला हवे. तो याबाबतीत बेफिकीर राहील व कधीतरी अधून मधून संबंध ठेवल्याने लगेच गर्भधारणा होत नाही असे तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करेल. पण या सांगण्यास अजिबात भुलू नका, बळी पडू नका. एकाच संभोगातूनही गर्भसंभव होऊ शकतो आणि अशी गर्भधारणा झाली तर तुम्हालाच असह्य मनस्ताप व त्रास सहन करावा लागेल. शेवटी निर्णय तुमचाच आहे... बहुसंख्यने पुरूषसत्ताक मानसिकता असणाऱ्या समाजात आपण राहतोय. या वास्तविकतेचा कधीच विसर पडू देऊ नये. कारण काही अघटीत घडले तर सामाजिकदृष्ट्या फक्त स्त्री च कलंकीत, दोषी मानली जाते.. परिणामी भोग तिला व तिच्या परीवारालाच भोगावे लागतात.

अन् सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः स्वत:च्या शरीराकडे कशा पाहता, स्वत:ला व्यक्ती म्हणून महत्व देता की फक्त स्वतःचे स्त्रीत्व गोंजारत, जोपासत बसता, याबाबत आत्मपरीक्षण करा. तुम्ही स्वतःच्या स्त्रीत्वाचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी करुन घेता कामा नये. याचा फायदा म्हणजे समाज, बरोबरीचे तरूण देखील तुमच्याकडे व्यक्ती म्हणून आदराने पाहू लागतील. हा नुसता विचार नसून व्यवहारातही हे सिध्द झालेले आहे हे लक्षात घ्या. स्वत:चे वागणे बदला, अधिक ठाम बना, तुमचा स्व जागृत ठेवा, स्वाभिमानी असा, दबून राहू नका, आपली मते मांडण्यास कधीही घाबरु नका..!
© Maitreyee Navale

😎🤗
31/05/2024

😎🤗

30/05/2024
30/05/2024
28/05/2024
27/05/2024
"म्हसवे'' च्या वटवृक्षाची महती सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्त...
27/05/2024

"म्हसवे'' च्या वटवृक्षाची महती

सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या गावात देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला "वडाचे म्हसवे‘ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन "फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी‘मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कूक थिओडोर या ब्रिटिशाने पश्‍चिम घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे.

विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे.

वडच का लावावा?
-एक परिपूर्ण वड सुमारे 35 हजार जिवांना अभय-आश्रय देतो.
-पाच वातानुकूल यंत्रे उघड्या वातावरणात 24 तास चालू ठेवल्यावर त्याचा वातावरणावर जो परिणाम दिसून येईल तो परिणाम एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड देते.
-जिथे वड, तेथील एक किलोमीटर परिसरात हमखास पाणी सापडते.

22/05/2024

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठीLine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठीLine:

Share