
26/09/2025
नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांना पालिका प्रशासन वृत्त समूहातर्फे ‘माँ दुर्गा सन्मान 2025 पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कुक्षेत सारसोळे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुजाता पाटील यांना हा पुरस्कार पालिका प्रशासनचे मुख्य संपादक सुदिप घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्य आणि समर्पण यांच्या गौरवासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली असून, समाजसेवेतील त्यांचे कर्तृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे.