29/06/2025
आपल्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणारे बुके नको बुक द्या नेहमीचा होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे, समाजसेवक तसेच माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर 4 येथील दिवंगत काळू राघो सोनवणे येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्या प्रसंगी जेष्ठ नागरिक, योगा ग्रूप, बलवान योगा ग्रूप, एकता मित्र मंडळ, महिला, पुरुष युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित सर्वांनी माजी नगरसेवक अंकुश सोनावणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या,
तसेच दुपारच्या सत्रामध्ये अंकुश सोनावणे मित्र परिवाराच्या वतीने सेक्टर ४, समाज मंदिर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी फिजिओथेरपी देखील करण्यात आली phisiotheraphy मध्ये महिला पुरुष जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला व तसेच जेष्ठ नागरिक कार्ड, राशन कार्ड फेरबदल बदल करिता मोठ्या सख्येने नागरिक उपिस्थित होते. अनेक महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपिस्थित राहून रक्तदान केले,रक्तदाताना माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे व नगरसेविका हेमांगी सोनावणे यांच्या हस्ते रक्तदाताचे प्रमाण पत्र देऊन स्वागत केले
संध्याकाळच्या सुमारास खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले, व विभागातील डॉक्टर, CA, पदवीधर व 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच अंकुश सोनवणे मित्र मंडळ व खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते विभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केले तसेच नवी मुंबईतील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी विभागातील ज्येष्ठ नागरिक युवा तरुण महिला मंडळ या सर्वांनी उपस्थिती राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व अंकुश सोनवणे हेमांगी सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
https://youtu.be/nABw-V2Qxu8?si=QqaO0O-DQgnA8kA6