
05/05/2025
*बसव सेवा प्रतिष्ठान च्या वतीने उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*
गुरुवार दिनांक: 1.5.2025 रोजी वाशी सेक्टर 3 येथील महात्मा फुले बहुउद्देशीय सभागृहात *बसव सेवा प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली, प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आलेली ही 10 वि बसवेश्वर जयंती होती*, गेली 10 वर्षे निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करून बसवेश्वरांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे काम हे प्रतिष्ठान करत आहे.
सदर जयंतीसाठी परभणी जिल्ह्यातील *श्री गुरू कांचबसवेश्वर संस्थान, वीरमठ पाथरी येथून परम पूज्य श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथ्रीकर* यांचे आशिर्वचन लाभले, महाराजानी आपल्या प्रवचनात असे सांगितले की महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात कधी कुठली तीर्थयात्रा केली नाही त्यांनी माणसात देव पहिला आणि लिंगपूजा हेच एक उत्तम स्तोत्र आहे, कसलाही भेदभाव करू नका एकमेकांना सहाय्य करा, माथी विभूती लावा, अष्ठावरण चे अनुकरण करावे, बसव सेवा प्रतिष्ठान हे या महानगरामध्ये समाज जोडण्याचे खूप मोलाचे काम करत आहे हे असेच चालू ठेवण्यासाठी सर्वांनी त्यांना मदत करावी असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री मल्लिनाथ उपासे साहेब यांनी प्रतिष्ठान च्या 10 वर्षाच्या उल्लेखनीय कामगिरीचि स्तुती केली आणि असेच कार्य करीत रहा माझ्याकडून जी मदत लागेल ती मी करायला तय्यार आहे.
सदर कार्यक्रमात श्री नागनाथ पाटील यांनी शिव भजन सादर केले, कादंबरी बारडोळे हिने चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रा तर्फे भाग घेऊन सुवर्णपदक मिळवून दिले आहे म्हणुन तिला आर्थिक मदत करून स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
सदर कार्यक्रमासाठी उद्योजक श्री राजेंद्र बिडवे, श्री रमेश भूमे,
श्री सोमेश्वर चौगुले (OSD- मंत्रालय) श्री नितीन सांगवे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री इरप्पा कोटीवाले, आणि टीम श्री सुदर्शन बिडवे, अनिल चिल्लर्गे, बस्वराज दाडगे, चंद्रकांत शिखरे, शिवशरण साखरे,
बसवराज गोवे,
काशीनाथ हेगडे,
सौ सुजाता विंचूरकर हे मेंबर्स उपस्थित होते.
तत्पूर्वी कु. आर्या, वैष्णवी आणि मानसी यांनी बसव वचन सादर केले.
कु. अंजली शिखरे हिने सूत्रसंचालन केले, सचिव श्री गोरख शिखरे यांनी प्रास्ताविक केले, श्री शिवा ठिगळे यांनी आभार प्रदर्शन केले.