25/09/2024
जगात अशी केस बघितली नसेल तुम्ही :
• बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. बरं झालं!
• या प्रकरणात अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याची चर्चा आहे. या एन्काऊंटर प्रकरणी वकील कॉम्रेड असीम सरोदे आता 'मानवाधिकार' म्हणत उच्च न्यायालयात जाणार आहेत.
• अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेबाबतच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
• त्याच कॉम्रेड असीम सरोदे यांनी दोन अत्याचारग्रस्त मुली व तिच्या परिवाराच्या बाजूनेही आधीच वकीलपत्र घेतलेले आहे
• आता वकील कॉम्रेड असीम सरोदे बलात्काराचा आरोप असलेल्या मुख्य आरोपीसाठी त्याच केसमध्ये कोर्टात जात आहेत!!
हे पाहून अनेकांच्या मनात सरळ, साधे, सोपे प्रश्न आले. त्यातील काही मी इकडे मांडत आहे :
१.) अत्याचार झालेल्या दोन चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाला त्यांच्या बलात्काराच्या आरोपीचा एवढा पुळका का?
२.) बलात्काराचा आरोपीलाच न्याय मिळवून द्यायला चालले असतील, तर अत्याचार झालेल्या दोन लहान बाळांना ते खरंच न्याय मिळवून देणार होते का?
३.) संघटित गुन्हेगारी असो की दहशतवाद, त्यांच्या प्रत्येक 'ट्रेनिंग मॉड्युल' मध्ये ही शिकवण असते की आरोपीला निर्दोष मानून क्लिन-चीट देत रहा आणि पोलिसांवरच अविश्वास दाखवून त्यांनाच आरोपी करा! एवढं होऊनही कोर्टात डाळ शिजली नाही, तर कोर्टावरही बेछूट आरोप करा, वाटलं तर नंतर अवमानना झाली म्हणून चुपचाप 1 रूपया देऊन टाका. पोलिस आणि न्यायपालिका यांच्या क्रेडीबिलिटी ला धक्का देण्यातलाच हाही प्रकार तर नाही? असंही काहींनी माझ्याजवळ बोलून दाखवलं.
अनेक प्रश्न आहेत. कॉम्रेड असीम सरोदे कोर्टात याचिका घेऊन जातील आणि त्यात आपला युक्तिवाद करतील, तेंव्हा ते स्वतःला एक्सपोज करतीलच. पण बार कौन्सिलने व हायकोर्टाने अशा conflict of interests ची दाखल घेतली पाहिजे.(कमेंट्स मध्ये डिटेल्स).
मोठे अपघात, दहशतवाद, घातपात, एन्काऊंटर, नक्षलवाद, (बातम्यांमध्ये आलेले) मोठे गुन्हे, साथीचे रोग पसरून लोकं मेली.. अशा कोणत्याही दुर्दैवी घटना घडल्या की तिकडे 'ट्रॅजेडी टुरिजम' करायला येणाऱ्या लोकांच्या पे-रोल वर असलेली कम्युनीच टोळी लगेच उड्या मारत कोर्टात जाते. 'न्याय मिळवून देणे' याच्याशी यांचे काहीही देणेघेणे नसते, यांचे मनसुबेच वेगळे असतात. त्या अत्याचार झालेल्या दोन चिमुरड्या, त्या पोलिसांचा 'जगण्याचा अधिकार' आणि त्यांच्या मानवाधिकारांपेक्षा यांना बलात्कारी, आतंकवादी, नक्षलवादी यांचे मानवाधिकार महत्वाचे असतात. जशी वीर तुकाराम ओंबाळे यांना कसाबची गोळी लागली तसे जर काल त्या अक्षय शिंदेने एखाद्या पोलिसाला गोळी घातली असती, तर तिकडे उज्वल निकम लढताना दिसले असते.. एकही कम्युनीच वकिलाने कोर्टात नव्हे, बाहेर पण निषेधाचा एक चकार शब्द तोंडातून काढला नसता.
जे झालं ते चांगलं झालं! बदलापूरचा बदला पुरा झाला. ज्यांना वाईट वाटलं असेल, त्यांना माझा 'Get Well Soon' आणि सविनय आक थु..!!
- वेद कुमार.