Aamhi Newaskar - Official

Aamhi Newaskar - Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aamhi Newaskar - Official, Media/News Company, Nevasa.

15/08/2026

‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या सुरुवातीदरम्यान जोधावास येथील शाळेत CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका आपल्या संपूर्ण टीमसह पोहोचले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शाळेची अवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत तीव्र सवाल केले.

विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गढूळ पाण्याचा मुद्दाही यावेळी समोर आला. व्हिडिओमध्ये हे पाणी स्पष्टपणे दिसत आहे. सवाल असा आहे की, जेव्हा प्रश्न मुलांच्या भविष्याचा आहे, तेव्हा त्यांना अशा मूलभूत सुविधाही मिळू नयेत का?

‘स्कूल ठीक करो’ अभियानाची ही सुरुवात सरकारी शाळांची जमिनीवरील वस्तुस्थिती समोर आणण्याचा एक प्रयत्न आहे.




14/08/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोग आणि एका 'अदृश्य शक्तीने' शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतल्याचा थेट आरोप केला आहे.




14/08/2026

तिरंगा रॅलीतील गिरीश महाजनांचा डान्स व्हायरल

14/08/2026

मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द किंवा अवैध ठरवल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच त्यांनी बावनकुळे यांच्या रूप आणि शरीरावर वैयक्तिक व व्यंगात्मक टिप्पणी करत त्यांची नक्कल केली होती.





या वैयक्तिक टीकेवर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत भावुक झाले. "माझेही कुटुंब आहे, माझी पत्नी कुणबी असून सून मराठा समाजाची आहे. माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर टीका करून जर मराठा समाजाला न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी खुशाल टिंगलटवाळी करावी," असे बावनकुळे डोळ्यात अश्रू आणून म्हणाले होते.

बावनकुळे भावुक झाल्याचे समजताच जरांगे पाटलांनी नरमाईची भूमिका घेतली आणि आपण छत्रपतींचे मावळे असल्याने भावुक झालेल्या व्यक्तीवर पुन्हा टीका करणार नाही, असे सांगत त्यांना माफ केले.

"पण..." नंतर जरांगे पाटलांचा मुख्य इशारा

जर

14/08/2026

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात शाळा सुटल्यानंतर एसटी बस न आल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात ५ ते ६ किलोमीटर पायी प्रवास करावा लागल्याची धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






एकीकडे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे ग्रामीण भागात विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून पायी जावे लागत आहे.

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाचे वेळापत्रक इतके अनियंत्रित का आहे? शाळा सुटण्याच्या वेळेत हक्काची बस का उपलब्ध करून दिली जात नाही?

एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन किंवा एसटी महामंडळ जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि पालकांकडून केला जात आहे.

14/08/2026

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हिने गोविंदा आणि अभिनेत्री कोमल रानी स्वर्णकार (Komal Rani Swarnkar) यांच्या विमानतळावरील एकत्र दिसण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोविंदा मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत असून त्याला थोडी लाज वाटायला पाहिजे, असा घणाघात तिने केला.




14/08/2026

आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी (राजपूत) यांच्या हत्या प्रकरणावरून अहिल्यानगर पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास भरकटवत असून, ते हिंदू समाजातील स्थानिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून लक्ष्य करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.



Address

Nevasa
414609

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Newaskar - Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamhi Newaskar - Official:

Shortcuts

Share