Dharashiv - धाराशिव

  • Home
  • Dharashiv - धाराशिव

Dharashiv - धाराशिव जिल्हा धाराशिव

धाराशिवसाठी स्वतंत्र पोस्टल डिव्हिजन मंजूर
28/06/2025

धाराशिवसाठी स्वतंत्र पोस्टल डिव्हिजन मंजूर



श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या सादरीकरणाची जिल्हास्तरीय समितीची बैठक मंत्रालयात मा पालकमंत्री प्रत...
17/06/2025

श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या सादरीकरणाची जिल्हास्तरीय समितीची बैठक मंत्रालयात मा पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .


धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन, लोकमत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.♦️ राज्यातील बळीर...
17/06/2025

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन, लोकमत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

♦️ राज्यातील बळीराजा व पशुधन हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

♦️ हा कणा सुरक्षित ठेवायचा असेल तर त्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणावीच लागेल.

♦️ देशाचे नेते आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांची शिकवण सतत डोळ्यासमोर ठेवून बळीराजाच्या जीवनात चांगलं काही करता येते का याचा सतत प्रयत्न करत असतो.

#धाराशिव

जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प; एकाच दिवशी करण्यात येणार १५ लक्ष वृक्षांचे रोपण
17/06/2025

जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प; एकाच दिवशी करण्यात येणार १५ लक्ष वृक्षांचे रोपण



धाराशिवचं नवीन बस स्थानक 🌿धाराशिवचं नवीन बस स्थानक 🌿       📷
05/06/2025

धाराशिवचं नवीन बस स्थानक 🌿
धाराशिवचं नवीन बस स्थानक 🌿


📷

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!        🍀🙏
12/10/2024

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

🍀🙏

आपल्या घरातील गणपती बप्पा व गौरी पूजन सजावटीचे फोटो कॉमेंट्समध्ये पाठवा
13/09/2024

आपल्या घरातील गणपती बप्पा व गौरी पूजन
सजावटीचे फोटो कॉमेंट्समध्ये पाठवा


धाराशिव शहरात बुधवारी मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीवाहतूक मार्गात बदल    दि.10.07/2024 रोजीचे 08.00 ते 16.00 वा. दर...
09/07/2024

धाराशिव शहरात बुधवारी मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅली

वाहतूक मार्गात बदल


दि.10.07/2024 रोजीचे 08.00 ते 16.00 वा. दरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास(Light& Heavy Vehicles) मनाई करण्यात येत आहे.

1. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर/ बेंबळी कडे जाणाऱ्या वाहतुकीला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक > छत्रपती शिवाजी महाराज चौक > देशापांडे स्टँड चौक > आण्णाभाउ साठे चौक > अहिल्यादेवी होळकर चौक > व पुढे बेंबळी टी पॉईट/ फील्टर टाकी पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

2. तुळजापूर फील्टर टाकी/ बेंबळी टी पॉईंट ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक धाराशिव कडे येणाऱ्या वाहतुकीला बेंबळी टी पॉईट/ फील्टर टाकी > अहिल्यादेवी होळकर चौक > आण्णाभाऊ साठे चौक > देशपांडे स्टँड > छत्रपती शिवाजी महाराज चौक > व पुढे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

3. आर्य समाज चौक धाराशिव ते सांजा कडे जाणाऱ्या वाहतुकीला आर्यसमाज चौक > संत गाडगे महाराज चौक > डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक > छत्रपती शिवाजी महाराज चौक > व पुढे SBI बॅक चौक, सांजा रोड पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

4. सांजा ते आर्यसमाज चौक धाराशिव कडे येणाऱ्या वाहतुकीला SBI बॅक चौक सांजा रोड > छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.

1. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर/ बेंबळी कडे जाणारी वाहतुक शांतीनिकेतन

चौक > वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे तुळजापूर व बेंबळी कडे पथक्रमण करतील.

2. तुळजापूर/ बेंबळी ते धाराशिव शहर कडे येणारी वाहतुक फील्टर टाकी तुळजापूर रोड पासुन >

आयुर्वेदीक महाविद्यालय समोरील हायवे ब्रीज वरुन > वरुडा रोड ब्रीज > शांतीनिकेतन चौक मार्गे

धाराशिव शहरात पथक्रमण करतील.

3. आर्य समाज चौक धाराशिव ते सांजा कडे जाणारी वाहतुक आर्य समाज चौक/ जिजाऊ चौक >

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक > शांतीनिकेतन चौक > वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे सांजा कडे

पथक्रमण करतील.

4. सांजा ते आर्य समाज चौक धाराशिव कडे येणारी वाहतुक SBI बँक चोक सांजा रोड > वरुडा रोड

ब्रीज > शांतीनिकेतन चौक >मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे पुढे आर्य समाज चौक/

जिजाऊ चौक कडे पथक्रमण करतील.

श्री कालरात्रि स्वरूप तुळजाभवानी दैव्ये नमः!नित्य दिव्य दर्शन : सातवी माळशारदीय नवरात्र उत्सवभवानी तलवार अलंकार महापूजा ...
21/10/2023

श्री कालरात्रि स्वरूप तुळजाभवानी दैव्ये नमः!
नित्य दिव्य दर्शन : सातवी माळ
शारदीय नवरात्र उत्सव
भवानी तलवार अलंकार महापूजा





होय धाराशिवच
17/09/2023

होय धाराशिवच



धाराशिव फाऊंडेशन हे व्यासपीठ निर्माण करण्याचा ध्यासधाराशिव जिल्ह्यात रोजगाराची साधने पुरेशी नसल्याने पुण्या-मुंबईसारख्या...
10/07/2023

धाराशिव फाऊंडेशन हे व्यासपीठ निर्माण करण्याचा ध्यास

धाराशिव जिल्ह्यात रोजगाराची साधने पुरेशी नसल्याने पुण्या-मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेऊन आपल्या अखंड परिश्रमाच्या जोरावर यशोशिखरे पादाक्रांत केलेले हजारो तरुण इथे आहेत. यश जरी आज त्यांच्या पायाशी लोळण घालत असले तरी आपल्या मातीशी जुळलेली नाती, ते कधी विसरले नाहीत. कामाचा व्याप सांभाळताना कायमच आपल्या धाराशिवच्या समृद्धीसाठी काय करता येईल, इथल्या मातीच्या ऋणात राहून धाराशिवकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय योगदान देता येईल, या विचारांनी पछाडलेल्या आपल्याच काही तरुण मित्रांनी त्यांच्या विचारांना कृतीशीलतेची जोड देण्यासाठी धाराशिव फाऊंडेशन हे व्यासपीठ निर्माण करण्याचा ध्यास घेतला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. काल पुण्यात झालेल्या सुंदर अशा सोहळ्यात या फाऊंडेशनची पहिली वीट रचण्यात आली.
या व्यासपीठाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, कृषी अशा विविध क्षेत्रात काम करुन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा विचार सदस्यांनी मांडला.
या सोहळ्यास फाऊंडेशनच्या मित्रांनी दिलेल्या हाकेला साद देत अनेक भूमिपुत्र उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक कार्याला सहकार्य करण्याचा शब्द दिला.
#धाराशिव_फाऊंडेशन
#धाराशिव

आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे माझ्यासह (ओमराजे निंबाळकर) आमदार कैलास दादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ.सचि...
26/06/2023

आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे माझ्यासह (ओमराजे निंबाळकर) आमदार कैलास दादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा तसेच रेल्वेसाठीचे भुसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली


Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv - धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share