16/08/2025
ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार करणार नाही..! स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
धाराशिव 'ज्येष्ठ नागरिकांवर कोणताही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही', या आशयाची शपथ १५ ऑगस्ट रोजी राज्यभरातील विद्यार्थी घेणार आहेत. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पत्राला अनुसरून या संबंधीचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी मंगळवारी दिले होते त्याचे औचित्य साधून आज 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार करणार नाही, करू देणार नाही, अशी शपथ दिली गेली तर शालेय
जीवनापासूनच जागरूकता वृद्धिंगत होईल, अशी भूमिका महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने मांडली होती. त्याची सुरुवात यावर्षी १५ ऑगस्ट रोजी करावी व यानंतर प्रत्येक वर्षी १५ जूनला पहिली ते बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून शपथ दिली जावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी मंगळवारी निर्गमित केले. ज्येष्ठांना उतारवयात सन्मानाने जगता यावे, यासाठी राज्यशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात आणखी एक चांगला निर्णय घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी,यासाठी शालेय जीवनापासूनच संस्कार रूजावेत, अशी भूमिका महासंघाने मांडली.