तेरणेचा छावा - Ternechachava

तेरणेचा छावा - Ternechachava News
(1)

15/07/2025

धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांचा व शाळेतील पुरवठा अन्नामध्ये आळ्याचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात गाजला.

जिल्हा परिषद शाळेमध्ये विषय शिक्षक देण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी तर शिक्षण मंत्र्यानी शिक्षक देण्याचे दिले आदेश
धाराशिव: जिल्हा परिषद शाळेमध्ये विषय शिक्षक मिळावा, शालेय पोषण आहारामध्ये आळ्या आढळूनही गुत्तेदारावर कारवाई करावी या मागण्या आमदार कैलास पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. त्यावर मंत्री भुसे यांनी तत्काळ शिक्षक देऊ व शासकीय शाळामध्ये सुविधा देण्याचा शब्द यावेळी दिला.
आमदार पाटील म्हणाले की, शहरातील शाळामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा विचार होतो. तसेच ग्रामीण भागात सुद्धा सीसीटीव्ही बसवणे गरजेचं आहे. त्या अगोदर शाळामध्ये शौचालयची व्य्वस्था करणं आवश्यक आहे. याशिवाय जिल्ह्यात 54 जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी नववी व दहावीचे शिक्षण घेतात. पण या शाळेमध्ये विषय शिक्षक दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका बाजूला अतिरिक्त शिक्षक असताना दुसरीकडे आवश्यक ठिकाणी ते मिळत नाहीत असा विरोधाभास पाहायला मिळत आहे. याशिवाय आमदार पाटील यांनी एका गंभीर विषयाकडे सभागृहाच लक्ष वेधले. विद्यार्थी वर्गासाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क आळ्या आढळून आल्या आहेत. तरीही त्या गुत्तेदाराचे कंत्राट रद्द केलेलं नाही. एका बाजूला आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये निकृष्ट जेवण दिल्यावरून एका आमदारानी तक्रार दिली तर तिथं दुसऱ्या दिवशी ती कॅन्टीन बंद करून त्याची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी होते. मात्र सामान्य विद्यार्थी यांच्या आहारात थेट आळ्या येऊनही त्याची गंभीर दखल घेतली जात नसेल तर असा भेदभाव का असाही मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळामध्ये आवश्यकता व पटसंख्येनुसार विषय शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. पोषण आहाराबाबत मी स्वतः वृत्तवाहिनीवरून हा प्रकार पाहिल्यावर अधिकारी यांना योग्य सूचना दिल्या होत्या. यापुढेही असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा परिषद शाळामध्ये सर्व भौतिक सुविधेसह अन्य चांगल्या सोयी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका वर्षानंतर हे चित्र बदलेल दिसेल असा शब्द मंत्री भुसे यांनी सभागृहात दिला.

15/07/2025

मोहा ग्रामपंचायत मध्ये घनकचरा व्यवस्थापन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू

14/07/2025

मा. मनोज जरांगे पाटील मुंडेगाव आंबेजोगाई लाईव्ह

14/07/2025

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी धाराशिव मध्ये संत्रप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून केली घोषणाबाजी.

11/07/2025

महामार्ग रस्त्यावरील कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा आमदार कैलास पाटील यांनी वेधले लक्ष!
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही घेतली दखल

तेरणेचा छावा/धाराशिव:-महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात आज महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनीही आमदार पाटील यांच्या प्रश्नाची दखल घेतली. याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री शिवेंद्र राजे यांनी दिले.
यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, राष्ट्रीय क्रमांक 52 येडशी - संभाजीनगर रस्त्यावर गुत्तेदारानी अंडरपासची व उड्डाणंपुलाची कामे घेतली आहेत मात्र गुत्तेदार काम करत नाहीत त्यामुळे अपघात वाढतात. धाराशिव शहराजवळ एका शाळेजवळ जुना उपळा रोडवर अंडर पास मंजूर होऊन त्याची निविदा झाली आहे. तिथे मध्यंतरीच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ही कामे वेळेत न झाल्याने हा मृत्यू झाला.
रस्ते सुरक्षा समितीची बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत ज्या सूचना दिल्या त्याबाबत पुढे काहीच झाले नाही, या बैठकीला सहा महिने झाले तरीही याबाबत कोणतीही कारवाई होत नाही याबद्दल आमदार पाटील यांनी सवाल उपस्थित केला.
महामार्गाच्या गतीच्या संदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, खामकरवाडी येथे वाहनाचा वेग इतका कमी होती की, चोर चालत्या गाडीत चढतात आणि चोरी करतात. या भागात गाडीचा वेग कमी होत असल्याने लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी वेग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि काही ठिकाणी कमी होती आणि वाहनांची वाटमारी होते याचीही माहिती आमदार पाटील यांनी सभागृहात दिली. या घटनांचे रस्ता सुरक्षा समितीत निर्देश देऊन देखील ६ ते ७ महिने झाले याच अद्याप पर्यंत कुठलही काम केले गेले नाही. कुठला भुयारी मार्ग केला जातोय.. ना सिंदफळ येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले. याशिवाय धाराशिव शहरातील भुयारी मार्ग पूर्ण नाही. येडशी येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण नाही कधीपर्यंत सुरू होतील हे सांगाव असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
चौकट :-
यावर मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले की, आमदार पाटील यांनी सांगितलेल्या तिन्ही कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन ज्या ठिकाणी गुत्तेरारानी कामे घेऊन सुरू केली नसतील त्यांना दंडात्मक कार्यवाही करणे किंवा वेळ पडेल तर ब्लॅकलिस्ट देखील करण्यात येईल अस मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटल आहे.

11/07/2025

आर्थिक देवाणघेवाणीतून 55 वर्षीय इसमास गावातून , किडनॅप करून उचलले. मारहाणीत मृत्यू नातेवाईकांचा आरोप.

11/07/2025

श्री तुळजाभवानी मंदिरातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडे, चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची पत्रकार परिषदेत मागणी.

👇तेरणेचा छावा👇          11वी. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट. युवा सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन        ...
11/07/2025

👇तेरणेचा छावा👇
11वी. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट. युवा सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ही बातमी पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा व चॅनल सबस्क्राईब ,फॉलो करा..

*http://www.ternechachava.in/2025/07/blog-post_11.html*

*बातम्या व जाहिरातीसाठी*
*संपादक पांडुरंग मते 94046774 21, 9284867607 वर संपर्क करा.*

११वीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट – युवासेनेचा शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन

11/07/2025

LIVE 11 जुलै पावसाळी अधिवेशन 2025

11/07/2025

पोलीस स्टेशनमध्येच मायलेकानी घेतल विष, महिलेची प्रकृती चिंताजनक!

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when तेरणेचा छावा - Ternechachava posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to तेरणेचा छावा - Ternechachava:

Share