17/11/2025
स्वामी समर्थांचे आपणास आलेले काही विशेष अनुभव सांगू शकता का?
आम्ही 5 मित्र एस टी च्या "आवडेल तेथे प्रवास " या योजनेचा लाभ घेत महाराष्ट्रात प्रवास करीत होतो. आम्ही सकाळी अक्कलकोट येथील बस स्थानक मध्ये पोहचलो. आमच्याकडील बॅगा एस टी च्या पार्सल रूम मध्ये ठेऊन गाणगापूर येथे दर्शन घेऊन नंतर मुक्कामी अक्कलकोट येथे येऊ असे ठरविले. पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 5 वाजेच्या आत आलात तर तुमचे सामान भेटेल नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता च मिळेल. आणि आपण प्रथम स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जावे अन्यथा आपणास काहीही विघ्न येऊ शकते. आम्ही त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करून स्वामी चे दर्शन न घेता गाणगापूर साठी रवाना झालो .
परतीच्या प्रवासात आम्हाला कर्नाटक डेपोची बस मिळाली. तिच्यात काहीतरी बिघाड होता म्हणून ती अत्यंत हळू चालत होती. आणि आम्हाला 5 वाजेपर्यंत पोहचणे कसे गरजेचे होते ते चालकाला सांगून वाहन जोरात चालविण्याची विनंती केली. मात्र त्याने बस मधील यांत्रिक दोष सांगून असमर्थता दर्शविली. दुपारी 2 वाजेपासून सुरू केलेला प्रवास रात्री 8 वाजेला अक्कलकोट येथे संपला. आमच्या बॅगा , स्वेटर, ब्लॅंकेट हे सर्व पार्सल रूम मध्ये अडकलेले होते . कडाक्याच्या थंडीत आम्ही स्वामी च्या मंदिरात गेलो , दर्शन घेतले व तेथे रूम घेतली. रुम मध्ये केवळ अंथरूण म्हणून एक सतरंजी मिळाली होती. रात्रभर थंडीत कसेतरी झोपलो.
सकाळी नग्न होऊन थंड पाण्याने अंघोळ केली व स्वामींचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली.
आमचा एक मित्र गंमतीने म्हणाला की , स्वामींचे दर्शन न घेता पुढे गेलो म्हणून स्वामींनी आपल्याला पूर्ण नंगे केले ।
हा आमचा अनुभव 1995 चा होता. त्यावेळी जास्त हॉटेलही नव्हते आणि सुविधाचा लाभ घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती देखील नव्हती. हा अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहिला .
💐 श्री स्वामी समर्थ 💐
माझा अनुभव
आपण माझ्या लिखाणाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे याचा मला अनेक वेळा अनुभव आला , तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय स्व. श्री अण्णाजी कवीश्वर, महाल,नागपूर यांना विचारले त्यांनी पुढील प्रमाणे समजावून दिले, अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला संगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुमहाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक ज
मी मुंबईला कामाला असताना 1995 च्या सुमारास मला कावीळ झाली होती.
सर्व प्रकारची औषधे घेऊनही आराम पडत नव्हता व दिवसेंदिवस मी शरीरने व मनाने खचत चाललो होतो. मला माझ्या कुटूंबाची काळजी वाटत होती की माझ्यानंतर त्यांचं कस होणार.
माझ्या कंपनीतच कामाला असलेला एक कर्मचारी म्हणाला तु हिंदू नसला तरी एकदा अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच दर्शन घेऊन ये तुला नक्कीच बर वाटेल.
लगेच मी तिकीट बुक केल व दर्शन घेऊन परत आलो , पण महाप्रसाद असतो हे मला ठाऊक नव्हतं. परत आल्यावर त्याने विचारलं महाप्रसाद घेतला का , नाही म्हणताच त्याने मला परत चार दिवसांतच दर्शन घेऊन महाप्रसाद घ्यायला लावला.
महाप्रसाद घेऊन परत येत असताना रेल्
मला श्री स्वामी समर्थांचा आलेला अनुभव या ठिकाणी सांगतो.
मी बाराव्या वर्गात असताना मी शिकवणी कलासवरून घरी येत होतो.मी सायकल वर होतो वाटेत अचानक एक कुत्र माझ्या मागे लागलं. ते माझ्या इतकं माग लागली की आता हे माझ्या पायाचा लचका तोडते की काय असे मला वाटू लागले व मी माझया सायकल चा स्पीड वाढवला पण सायकलच ती धरून धरून किती स्पीड धरणार.मी खूप घाबरलो होतो.
मी स्वामी समर्थांना मनोमन प्रार्थना केली व मनापासून म्हटले समर्था वाचवं आता मला.आणि आपला कदाचित विश्वास बसणार नाही मी असे म्हणताच काही वेळात तो कुत्रा मला अचानक दिसेनासा झाला.मी मनोमन स्वामींचे आभार मानून घरी आलो.परत असा प्रसंग माझ्यावर कधीही आला नाही.
"अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
"अशक्य ही शक्य करतील स्वामी"
"श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
धन्यवाद।
स्वामी समर्थांच्या महिमेची तुम्हाला प्रचिती आली आहे का?
स्वामी समर्थ ह्यांना लोक एवढे का मानतात? काही विशेष अनुभव असेल तर नमूद कराल का?
'अशक्य ही शक्य करतील स्वामी', हे कधी अनुभवले आहे का?
दत्तमाला मंत्राचे काही आलेले अनुभव सांगाल का?
मी स्वामी समर्थांच्या मंदिरात स्वामींसमोर प्रार्थना करताना खूप रडू येते असे का होते?
श्री स्वामी समर्थ !
माझा अनुभव खालील विडीयो मध्ये ऐका आणि तुम्हाल काय वाटते, ते कळवा .
श्री स्वामी समर्थ !
स्वामी समर्थ ह्यांना लोक एवढे का मानतात? काही विशेष अनुभव असेल तर नमूद कराल का?
"इरादे लाखों बनते है और तूट जाते हैं, अक्कलकोट वो हि आते हैं जिन्हें स्वामी बुलाते हैं"
हे वाक्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोट येथे गेलो तेव्हा वाचले आणि तेव्हापासून स्वामींबद्दल माझी श्रद्धा वाढतच गेली. मी तेव्हा रूम करून राहत होतो पुण्याला . नोकरी करत असल्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टी असायची. पण एकदा लागून सुट्टी आली. मी दुपारी जेवण करून आलो आणि माझ्या खोलीत बसलो होतो. इतक्यात माझा रूम पार्टनर आला आणि म्हणाला उद्या सुट्टी आहे तेव्हा आम्ही अक्कलकोटला जातोय, तू येणार का? मी कसलाही विचार न करता त्याला होकार दिला.
मध्यरात्री अक्कलकोटला पोचलो, बसस्टॅन्डवर उतरलो. बसमधून उतरलेले प्रवासी सो
स्वामी समर्थ ह्यांना लोक एवढे का मानतात? काही विशेष अनुभव असेल तर नमूद कराल का?
मला ३/४ वर्षांपूर्वी आलेला हा अनुभव आहे. वयाच्या १९ ते २३ वर्षांपर्यंत मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते. एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला, तिने मला २/३ वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस का? मी नकार दिला तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही.. मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली..
दुसऱ्याच दिवशी माझे शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड आले. जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल..मी ७/८ दिवस डॅाक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी काहीच फरक नाही…मला बरोबर १० दिवस काहीही खाताना किंवा पिताना खूप त्रास व्हायचा..नंतर मग माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली.. मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे वचन दिले. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्ववत झाले. त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही.. मला सुध्दा पहिले स्वामींवर तितकासा विश्वास नव्हता पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले.
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻