
20/09/2024
'एक देश, एक निवडणूक' : राष्ट्राला अधिक बलशाली करण्याकडे एक सक्षम पाऊल!
माजी राष्ट्रपती श्री.रामनाथजी कोविंद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'एक देश एक निवडणूक'या ऐतिहासिक धोरणाला मान्यता देण्यात आली आहे..
सदर धोरण कितपत व्यवहार्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या समितीने या धोरणाबाबत अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सादर केला. त्याला मान्यता मिळाली आहे.
या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास दरवर्षी विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका, त्यासाठी लागणारी निवडणूक यंत्रणा, आचारसंहितेच्या काळात रखडणारी कामे, या सर्व अडचणी दूर होतील आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करु शकेल, असा विश्वास वाटतो..
ेशन_वन_इलेक्शन