Dharashiv Times

Dharashiv Times The intention of starting this page is to provide a platform where we can put the issues and news on this page and discuss the same!!

16/06/2026
08/06/2026

*पिंपरी-चिंचवड : आर्थिक व्यवहार व मोटारसायकल संदर्भात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार *
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
व्यावसायिक अंगद मोरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, *हरिदास शाहाजी काळदाते* याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार व मोटारसायकल संदर्भातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आंबा विक्री व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये काही रोख रकमेबाबत तफावत आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराच्या मालकीची *Yamaha FZ (MH12HE8402)* मोटारसायकल संबंधित व्यक्तीकडे गेल्यानंतर ती अद्याप परत मिळालेली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणासंदर्भात संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारदार अंगद मोरे यांनी काही इतर व्यक्तींनाही या प्रकरणाबाबत माहिती असू शकते, असे नमूद केले असून त्यामध्ये *विशाल माने* यांचे नावही उल्लेखिले आहे. तक्रारदाराने संबंधित सर्व बाबींची व सर्व संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सध्या हे प्रकरण संबंधित यंत्रणांकडे असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.
*नागरिकांना आवाहन*
कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना, व्यवसायिक जबाबदाऱ्या सोपविताना किंवा मालमत्ता वापरासाठी देताना आवश्यक कागदपत्रे, नोंदी व पडताळणी करूनच व्यवहार करावेत. तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तत्काळ कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.
*महत्त्वाची सूचना*
वरील वृत्त हे तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार तयार करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून कोणत्याही व्यक्तीविरुद्धचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी मानू नये.

05/04/2026

या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं?

धाराशिव जिल्ह्यात संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. गावात भोंगा वाजून या वेळेची सूचना दिली जाईल. तसेच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेख ही ठेवली जाणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतीचा यामध्ये सहभाग करून घेणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी घोषित केले आहे

12/02/2026

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२० पीकविम्यासंदर्भात मोठी आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर सकारात्मक निर्णय झाला असून विमा रकमेच्या वितरणाची प्रक्रिया मार्गी लागली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपयांचा निधी धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्याकडे वर्ग करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

खरीप २०२० हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मात्र विविध तांत्रिक कारणांचा आधार घेत विमा कंपनीकडून नुकसानभरपाई थांबवण्यात आली होती. याविरोधात शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयीन लढा उभारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या आदेशांनुसार विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार शासनाने ११ फेब्रुवारी रोजी संबंधित निर्णय जाहीर केला आहे.

ही १३४.११ कोटींची रक्कम कृषी आयुक्तालयाच्या एस्क्रो खात्यातून थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांच्याकडे वर्ग केली जाणार आहे. तसेच Bajaj Allianz General Insurance कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये व त्यावरील व्याज देखील पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी वापरले जाणार आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी लवकरच होणार असून सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता प्रत्यक्ष निधी वर्गाच्या निर्णयामुळे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “हक्काचा विमा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,” असा ठाम संदेशही आमदार पाटील यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी ही केवळ आर्थिक मदत नाही, तर न्याय मिळाल्याची भावना आहे. 🌾

05/02/2026

EVM मशीन मध्ये काहीही घोटाळा नाही, असता तर मी निवडून आलो असतो का?
- खा. ओमराजे निंबाळकर

05/02/2026

ओमराजेंना अर्चना पाटलांना निवडून आणायच आहे का?
- सक्षणा सलगर

31/01/2026

मा.सुनेत्रा ताई पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री!!

Address

D. I. C. Road
Osmanabad
413501

Telephone

+919082580929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share