24/05/2026
अरे बाप् इकडे तुम्ही अभ्यास अभ्यास करत बसले आणि तिकडे लाखो रुपयांना पेपर विकले गेले…
लाखो रुपये फी घेऊन क्लासेस चालवले गेले…
हे पैसे देणारे सर्वसामान्य कुटुंबातील लोक नव्हतेच, तर आपल्या मुलाला “काहीही करून डॉक्टर बनवायचं” या हव्यासापायी पैसा ओतणारे उच्चभ्रू लोक होते.
आणि दुसरीकडे सामान्य माणूस काय करतोय..?
कोणी 10-20 हजारांच्या नोकरीत आयुष्य झिजवतोय,
कोणी राजकारण्यांच्या मागे घोषणाबाजी करत स्वतःचं भविष्य संपवतोय…
तरुणांमध्ये अभ्यासापेक्षा क्रिकेट, रील्स आणि सोशल मीडियाचं वेड वाढत चाललंय.
ड्रग्सच्या आहारी गेलेली पिढी आणि मोबाईलमध्ये हरवलेलं वास्तव…
महिलांना 1500 रुपयांची योजना मिळाली की प्रश्न विचारणं बंद…
आणि अनेक वृद्धांना मोदींपलीकडे देशात काहीच दिसेनासं झालंय.
याच गोंधळात मोटेगावकर, खरात यांसारखे लोक “यश” विकत असल्याचा आव आणून करोडोंची माया जमवत आहेत…
विद्यार्थ्यांचं भविष्य, पालकांची स्वप्नं आणि सामान्यांच्या भावना — सगळं बाजारात विकलं जातंय.
आज शिक्षण हा सेवा क्षेत्र राहिलेला नाही, तो मोठा व्यवसाय बनलाय.
ज्याच्याकडे पैसा आहे तो सिस्टम वाकवतो…
आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो आयुष्यभर स्पर्धा परीक्षांच्या रांगेत उभाच राहतो.
ही परिस्थिती फक्त एका व्यक्तीमुळे निर्माण झालेली नाही…
तर समाज म्हणून आपण प्रश्न विचारणं बंद केलं, तिथून ही अधोगती सुरू झाली.
धर्म, पक्ष, नेता” यावर भांडण्यात आपण इतके गुंतलो आहोत की
आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य कोण लुटतंय हेच दिसेनासं झालंय.
अशी सध्या राज्याची आणि देशाची वाटचाल सुरू आहे…