Palghar District

Palghar District Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palghar District, Digital creator, Palghar.

वाढवण बंदरविरोधी टी-शर्ट घातलेल्या तरुणींना नाईकांच्या जनता दरबारात रोखले। #पालघर      #वाढवण
12/02/2026

वाढवण बंदरविरोधी टी-शर्ट घातलेल्या तरुणींना नाईकांच्या जनता दरबारात रोखले।

#पालघर #वाढवण

Pav bhaji...😋😋😋😋😋😋😋
21/11/2025

Pav bhaji...😋😋😋😋😋😋😋

वसईत सुरू झाली मीटर रिक्षा सेवा 🛺❗❗❗📍 वसई रेल्वे स्टेशन, एस.टी. बस डेपो📅 १५/११/२०२५ ⏰ सकाळी १०:३० वाजताआज वसईत शेअरींग र...
16/11/2025

वसईत सुरू झाली मीटर रिक्षा सेवा 🛺❗❗❗

📍 वसई रेल्वे स्टेशन, एस.टी. बस डेपो
📅 १५/११/२०२५ ⏰ सकाळी १०:३० वाजता

आज वसईत शेअरींग रिक्षा सेवा 🛺 सोबतच मीटर रिक्षा सेवा सुरू झाली असून, दैनंदिन प्रवासात होणारी धावपळ आणि गैरसोयी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.

दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत, सर्वांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाची नवी सुविधा आता उपलब्ध झाली आहे.

🛺 शेअरींग रिक्षा सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून आता त्यात मीटर रिक्षांची भर पडल्याने नागरिकांसाठी अधिक पर्याय निर्माण झाले आहेत.🚦

🤝 स्थानिक नागरिक, पत्रकार बंधू-भगिनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे हा शुभारंभ अधिक अर्थपूर्ण ठरला.

🚥 वसईतील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारे हे पाऊल नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.

#पालघर

   :-  #पालघर -  #मनोर -  #विक्रमगड -  #जव्हार  महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमु...
18/10/2025

:- #पालघर - #मनोर - #विक्रमगड - #जव्हार महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नावझे गावातील 47 वर्षीय अनिता अनिल पाटील या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरजवळील चहाडे नाका परिसरातील सज्जनपाडा येथे घडली आहे. अनिल पाटील आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघेही मोटरसायकलवरून पालघरहून घरी जात असताना रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात मोटरसायकल आदळली. या धडकेनंतर अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, सहादिवस उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू :-
जखमी अवस्थेत अनिता पाटील यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र सहा दिवस उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच महामार्गावर मासवनजवळ समृद्धी संतोष पाटील ह्या देखील खड्ड्यामुळे मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तब्बल 12 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे मात्र कायम असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. पालघरहून घरी जात असताना रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात मोटरसायकल आदळली. या धडकेनंतर अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवस या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर या महिलेचाउपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे.

रस्त्यावरील खड्डे नेमके कोण भरून काढणार ?
नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर निधी हडपल्याचा आरोप करत सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुणबी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून, ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे नेमके कोण भरून काढणार? आणि अशा निष्पाप बळींचं मोल कोण देणार? असा सवाल संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि शासनाला विचारला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्यावरुन नागरिक दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

17/10/2025
पालघर मधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून तातडीच्या उपाययोजना... पूर्ण बातमी कॉमेंट मध्ये... 👇🏼
16/10/2025

पालघर मधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून तातडीच्या उपाययोजना... पूर्ण बातमी कॉमेंट मध्ये... 👇🏼

कधी कधी अशा लोकांकडूनही खरेदी करावे 🙏 आणि खरेदी करताना मोलभाव करू नये, ह्यांच्याकडे मॉल पेक्षा कमी किमतीत अतिशय चांगले क...
21/09/2025

कधी कधी अशा लोकांकडूनही खरेदी करावे 🙏 आणि खरेदी करताना मोलभाव करू नये, ह्यांच्याकडे मॉल पेक्षा कमी किमतीत अतिशय चांगले क्वालिटीचे वस्तू असतात ते पण एकदम ताज्या ताज्या 😊

Somewhere in     roadside,
07/08/2025

Somewhere in roadside,

अहिंसा परमो धर्मः माधुरी उर्फ महादेवी हत्तीनी वरील प्रेम. शिरोळ तालुक्यात गेल्या 18 तासांत 6,529 जिओ ग्राहकांनी नंबर एअर...
31/07/2025

अहिंसा परमो धर्मः माधुरी उर्फ महादेवी हत्तीनी वरील प्रेम. शिरोळ तालुक्यात गेल्या 18 तासांत 6,529 जिओ ग्राहकांनी नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केला आहे.

30/07/2025
दिव्या देशमुख बुद्धिबळाची 'राणी' 👑 वर्ल्ड कप स्पर्धेत कोनेरू हम्पीवर मात करून मिळविले विजेतेपद.
29/07/2025

दिव्या देशमुख बुद्धिबळाची 'राणी' 👑
वर्ल्ड कप स्पर्धेत कोनेरू हम्पीवर मात करून मिळविले विजेतेपद.

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share