माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari

माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari #किर्तन #भजन #प्रवचन #अभंग #भक्तीगीते #माझेमाहेरपंढरीmazemaherpandhari

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*         *शुक्रवार दि- २५ जुलै २०२५*            *🌹काकडा आरती🌹*     ...
25/07/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*शुक्रवार दि- २५ जुलै २०२५*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*         *गुरूवार दि- २४ जुलै २०२५*            *🌹काकडा आरती🌹*      ...
24/07/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरूवार दि- २४ जुलै २०२५*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे...
21/07/2025

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूलसूक्ष्म एक गोविंदुरे ॥२॥
तुज आकार म्हाणों की निराकररे । साकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्यरे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥
निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥५॥

अर्थ:-

हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तु दोन्ही ही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेती नेती म्हणुन थांबते व तुलाच दाखवते. तुला स्थुळ म्हणायचे की सुक्ष्म म्हणायचे तु मला दोन्ही रुपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचे की निराकार मानायचे तु दोन्ही पध्दतीने मला दिसतोस. तुला दृष्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तु दृष्य होऊन दिसतोस व अदृश्यरुपी जाणवतोस.निवृत्तिनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणुनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात.

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥ब...
21/07/2025

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥
जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥
बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्र...
21/07/2025

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥
हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तिहीं गुणां वेगळा । शक्ति नव्हे दादुला गे माये ॥२॥

अर्थ:-

तोच ब्रह्मा रुपाने सृष्टीची चतुर निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरुप झाला.तोच हरिपणाने हरि अंग झाला हे जर एकत्व असले तरी हे जिवरुपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही. असा तो तिन्हीगुणाहुन निराळा असणारा रखुमाईचा पती हा शक्ती नसुन माझा नवरा आहे. असे माऊली सांगतात.

बरवा वो हरि बरवा बो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥सावळा वो हरि सावळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥पाहतां वो हरि ...
21/07/2025

बरवा वो हरि बरवा बो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सावळा वो हरि सावळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥
पाहतां वो हरि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिये वो । बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥३॥

अर्थ:-

जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरि म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत; तोच श्रीहरि सर्वोत्तम आहे हो ! ॥१॥ तो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा; परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे. ॥धृ॥ काय सांगावे ! त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो ! ॥२॥ तोच श्रीहरि मनाला वारंवार आवडतो हो ! असे त्या श्रीहरीचे रूप आहे. ॥३॥ जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥ ।

आतसिकुसुमकोशशामघनु । तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥जलधीशयन कमलालयाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठलु ...
21/07/2025

आतसिकुसुमकोशशामघनु । तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥
जलधीशयन कमलालयाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठलु घनानंदुमुर्ति ॥१॥

अर्थ:-

तो तुळशीवृंदावनात असलेला अतिषय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे. तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे. त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखमुदेवीचा पती आहे असे माऊली सांगतात.

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटी...
21/07/2025

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥
गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥
आडत्रिपुंड्र शोभत दूमिळ भारेंसि जे जात । नागर केशरिचीं पुष्पें कैसा खोप मिरवत ॥२॥
हिरिया ऐशा दंतपंक्ति अधर पोंवळ वेली । श्रवणीं कुंडलें ब्रह्म रसाचीं वोतलीं ॥३॥
विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियलें । योगी ध्याती ध्यानीं ब्रह्म तेंचि गोकुळासि आलें ॥४॥
आजि धन्य धन्य जालें राया कृष्णासि देखिलें । निवृत्तिमुनिरायप्रसादें ध्यान तें ह्रदयासि आलें ॥५॥

अर्थ:-

डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणु व वक्षःस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे. तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर तिनरेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्णरुप उभे आहे. त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत.जे विश्वाचे जीवन आहे ते रुप मी साररुपाने पाहिले ज्या रुपाला योगी ध्यातात तेच रुप गोकुळात अवतरले आहे. आज मी धन्य झालो निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ते रुप पहिले माझ्या ध्यान्यात व नंतर हृदयत स्थापित झाले असे माऊली सांगतात.

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥ब...
21/07/2025

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥
जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥
बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा...
21/07/2025

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥
सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥

अर्थ:-

मांडी, गुडघा व पाऊल या तीन ठिकाणी वाकडा झालेला, पाय दुसऱ्या पावलाजवळ ठेवल्यामुळे जो देहुडा म्हणजे दीड पाय झाला आहे, अशा स्वरूपाची ठेवण मांडून ( मुरलीधराचे स्वरूप धारण करून ) कल्पवृक्षाखाली वेणू वाजवीत उभा आहे. जो अंतर्बाह्य परमानंदरूप आहे, व जो मंगवान श्रीकृष्ण, ज्याला गोविंद, गोपाळ अशीं अनेक नांवें आहेत, तो मी पाहिला गे माय ! असें तें सावळें सगुण रूप सर्व जीवांचें जें जीवन आहे व केवळ आनंदाची मूर्तिच आहे, अशा त्या श्रीकृष्णाला पाहून माझें मनच हरपून गेले. तो आकाशादि स्थावर जंगम सर्व वस्तूंत व्यापलेला असूनहि, मौज अशी की, त्याचे स्वरूप कोणाला कळत नाहीं.

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुस...
21/07/2025

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥
अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥
तेथ रात्र दिवस नेणिजे । सोहं प्रकाश सहजे । नाचविसी पंचभूतें वोजे । कवतुक तुझें तूं पाहसी ॥२॥
भानु निसियेचा कुवासा । येक राहिले याचिये आशा ॥
येक ह्मणति अढळ धुरु कैसा । तयाचा भरंवसा त्यासिं नाही ॥३॥
ऐसीं तयाचीं बोलणीं । अंगीं राहिलीं खेळणीं । साही पावटणी करुनि । सातावरि घातु मांडिला ॥४॥
करीं घेऊनि आळवणी । करु नेणें वोवाळणी । बाप रखुमादेविवरा विठ्ठला चरणीं । चौघी जणी निमालिया ॥५॥

अर्थ:-

मनाची दोरी करुन त्याला बांधायला गेले तर तो नीट दिसतच नाही.तो अकळ आहे. असे अवघड अवडंबर तु रचले आहेस.हृदयातील अष्टदळ कमळ व २१ खण म्हणजे पंचप्राण, पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय व एक चित्त जरी असले तर त्याची विपरित अशी त्याची कुसरी आहे. त्याच्या ठायी रात्रंदिवस दिसत नाही,सोहं प्रकाश सहज दिसतो, पंचमहाभूतांना तो नाचवत असतो त्याचे कौतुक मी पाहात आहे. सुर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले अढळस्थान हे एकच राहिल याचा भरवसा त्यांना ही नाही. असे याचे बोलणे आहे व सहा शास्त्रांची त्याने खेळणी केली आहेत. ती सहा शास्त्रे त्याला वर्णु शकत नाहीत पण त्याच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात.जशी एखादी सवाषिण हातात निरांजन घेऊन ओवाळणी करते तशी परा, पश्यंती मध्यमा वैखरी ह्या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात.

सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा व...
21/07/2025

सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥
यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥
पांवयाचेनि नादें । कृष्णाचेनि वेधें अमृतघनु वोळला । आकाश वोळुनि वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आलारे ॥२॥
कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेविती अनिवाररे आयो ॥३॥
चंदनादिटिळकुलल्लाटीं जया साजे मोर विसावेटी रेआयो । सुरतरु कुसुमें कबरीं भारुरे कुंडलें झळकति कपोळीं रे आयो ॥४॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे । त्रिभुवनजनमोहन रे आयो ॥५॥

अर्थ:-

जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचा ही बदलत असतो. तोच कृष्ण पावा वाजवत यमुनेच्या तटावर उभा आहे. त्या पाव्याच्या सुरु मुळे तो अमृतघन अनावर होऊन आकाशातुन वर्षाव करत आहे त्यामुळे ब्रह्मरसाचा पुर आला आहे. त्या सुंदर मुखकमळावर भक्त लुब्ध असुन ते भ्रमर बनुन त्याचा स्वाद चाखत आहेत. त्यांने सुगंधी चंदन टिळा रेखला असुन केसा मध्ये मयुरपुच्छ खोवले आहे. सुंदर सुरतरुंची फुले घातली असुन त्याच्या कानातील कुंडल झळाऴत आहेत. रखुमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्यांने जगावर मोहनास्त्र चालवले आहे. असे माऊली सांगतात.

Address

Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share