Marathi All Update

Marathi All Update About- Marathi All Update is a Youtube channel. New Video is posted E

Where you will find Technological Video, Books Reading, News, Tech News, Health Tips, Biography Videos, Inspiration Video, Entertainment News, Funny Clips, Motivational Clip in Marathi.

Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नकापारमी कपिल पठारे हिला दोन दिवस १०४ ताप आल्या कारणास्तव मी आणि माझी पत्नी तेजश्री...
08/07/2025

Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका
पारमी कपिल पठारे हिला दोन दिवस १०४ ताप आल्या कारणास्तव मी आणि माझी पत्नी तेजश्री पठारे आम्ही पारमीला
डॉ. प्रफुल्ल शहानबाग यांच्याकडे नेले त्यांनी तिला काही medicines लिहून दिले. Medical acharya donde road parel opp K.E.M Hospital आम्ही medicines विकत घेतले शंकर या कामगारने आम्हाला ते दिले यांवेळी store समोर गर्दी नव्हती, शंकर या समोर डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग याची फाईल होती. आणि ते लहान मुलाची डॉक्टर आहेत जे जवळच्या सर्वच medical stores ला माहित आहे. याशीवाय त्या फाईलवर लहान मुलांचे चित्रे आहेत. मी आणि मुलगी त्याच्यासमोर उभे राहून हि medicines विकत घेतले. मुलीला ताप असल्यामुळे आम्ही तिला घरी घेवून गेलो तिला medicines दिले. थोड्यावेळाने पारमी गळूनच पडली. ती सारखी झोपून होती. आम्हाला वाटलं तापामुळे ती झोपली आहे. रात्री तिला उठवत हि नव्हते तिला रात्रीची medicines डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे फाईलमधे पाहून दिले. आणि तिला झोपी घातले. आम्हाला वाटले नीट जेवण नाही आणि अशक्तपणा यामुळे ती अशी करत असावी. रात्री आम्ही जागी राहिलो पण ती झोपली तिला पुम्हा ताप भरला तेव्हा आम्ही तिला मीठ पाण्याने पुसून काढले. तीने यावेळी काहीच केले नाही एरवी झोप मोडली असता ती रडायला लागते. सकाळी 5 ला आम्ही तिला हॉस्पिटला admit करावे असा विचार करीत होतो. कारण तिची तबेत खूपच खराब झालेली दिसत होती. तिचा आवाज बारीक झालेला होता, सकाळी 8 उठून मी तीच्यासाठी जूस घेण्यासाठी बाहेर गेलो असता माझ्या पत्नीचां mobile call आला तेव्हा ती मोठ्याने घाबरून रडत होती. मोठ्या आवाजात ओरडत होती medicalवाल्याने चुकीचे medicine दिले आहे, तु लवकर ये पारमीला डोळे खोलता येत नाही आहे. मी घाबसरून घरी गेलो तेव्हा पारमी बेशुद्धावस्थेत दिसत होती. मी आणि माझी पत्नी रडत होतो. पत्नीने मला medicine दाखवले ते Schizophrenia या रोगासाठी होते. याशिवाय लहाणमुलासाठी नव्हेतेहे कळताच मला डोक्याला विजेचा झटका बसावा तसे झाले. माझी पत्नी मुलीला कवटाळून रडत होती. मी घाईत डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग यांच्या दावाख्यांत गेलो ते बंद होतो. त्यांच्या संपर्क केला असता त्यांच्या asisitant ने उचलला त्यांना झालेला प्रकार सांगितला “अरे चुकीच medicine दिल आहे तुम्ही, तिला emargecy मधे Hospital admit करावे लागेल, आम्ही तुम्हाला RICONIA Syurp लिहून दिले होते, जे maltivitm होते कारण तिचे वजन वयापेक्षा खूप कमी आहे.” त्यांनी medical storeचे नाव विचारले असता आम्ही Medical आणि त्याचे location सांगितले असता ओरडले आरे ते मूर्ख आहेत, या आगोदरही त्यांनी असेचं चुकीचे medicine देऊन एकाला सिरीयस केलं होत. त्यांनी डॉक्टर प्रफूल शानबाग यांचा मोबाईल क्रमांक दिला त्यांना call केला तेव्हा त्यांनी लगेच hospitalise करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले “is used in the treatment of schizophrenia (a mental disorder that can result in hallucinations or delusions and also adversely affects a person’s ability to think and behave) and mania.
हे खुप Heavy dose आहे. आम्ही RICONIA Syurp समजून तिला डॉक्टरच्या सांगीतलेल्या dose प्रमाणे 3.5ml असे दोनवेळा दिल.
हे सगळ एकूण माझी पत्नीला चक्कर आली ती जागीच खाली पडली. तिच्या तोंडावर पाणी मारून मी तिला उठवले. पारमीला उचलून घेतल तेव्हा ती डोळे बंद अवस्थेत म्हणाली “ मम्मा मी मरते आहे असं वाटत आहे”.

मी Medical मधे गेलो शंकर तिकडे नव्हता. इतर कर्मचारीना हा प्रकार संगतीला तेव्हा ते मला medicin बदलून देत होते. काही नाही थोडी झोपत येते तुम्ही हे maltivitm घेऊन जा. इतक्या थंड प्रतिक्रिया एका कर्मचां-याची होती. मी त्यांना चिडून सांगितले तिला hospitalis करण्यास सांगितल आहे तेव्हा त्यांनी मला medicine चे बिल आणि कर्मचा-याचे माहिती पुरवली. मी मोठ्याने रडत होतो पण त्याचा manager वेळेवर नव्हता.

आम्ही तातडीने तिला आमचे family डॉक्टर घाटकोपर admit केल. डॉक्टरने तिला तपासले असता तिची pulse rate 145 पेक्षाही जास्त होता. नर्सने पारमीला IV लावले असता तिने काहीच प्रतिक्रिया केली नाही Doctor, nurse आम्ही घाबरून गेलो डॉक्टरने तुम्हाला बघवाणार नाही तुम्ही बाहेर जा आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले. आम्ही बाहेर गेलो. नंतर डॉक्टर यांनी सागितले ती केव्हा शुद्धीवर येईल काहीच सांगता येणार नाही. Schizophrenia रुग्णापेक्षा जास्त dose तिला झाला आहे. केवळ लघवीवाटे हे बाहेर पडेल दुसरा काहीच मार्ग नाही.
पारमीला डायपर घालून ठेवले. 6 तास झाले तरी तिला लघवी झाली नाही ना ती बोलत होती. नुसती डोळे मिटून होती.
तिच्या मानेची नस खूप जोरात उडत होती. तिचे तोडं उघडे पडले होते नीट पाहिलं तेव्हा कळल तिची जीभ वाकडी आणि मागे गेली आहे ती जड झाली आहे. तिच्या छातीमध्ये जास्त दुखते आहे अस बोलून ती परत बेशुद्धावस्थेत गेली. दुस-या दिवशी रात्री तिने स्व;ता पाय उचलला आम्ही तिला जबरदस्तीने लघवी ला नेल तेव्हा तिला बसतही येत नव्हते. काही मिनिटांनी तिला लघवी आली. पण ती बोलत होती मला कळत नाही कस बाहेर करू. 10 मिनिटांनी तिने ती केली. आम्हा दोघासाठी हे खुप भयानक होते की मुलीला लघवीला आले आहे पण तिला कळत नाही आहे. काही केल्या तिचे heart pulse rate normal होत नव्हते. आमच्याकडे रडत तिच्याकडे बघण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता. मंगळसूत्र गहाण ठेऊन आम्ही hospital चे बिल भरले. तीन दिवसांनी माझी मुलगी थोडी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लघवीच्या जागी इन्फेक्शन झाले होते. तिचा घसा ते ओठ सोलून निघाले होते. तिला साध पाणी पितानाही त्रास होत होता. तीन दिवस तिच्या पोटात अन्नाचा दाना पान्याचा कण नव्हता. तिला तहान होती पण तिच्या ओठातून पाणी गळून bedsh*t भिजत होते. आम्ही तीन दिवसांनी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होत. ती तहानलेली होती पण पाणी गिळता येत नसल्याने ती दुखत्या छाती,घशातून रडत नव्हती. तिच्या डोळ्याच पाणी एक-दोन थेंब येवून डोळ्याच्या कडा ओल्याकरन्याशिवाय काहीच करत नव्हत. तिचे अश्रू खाली ओरघळत नव्हते कारण तिची बॉडी आतून dry झाली. त्यात तिला पाणी पीता येत नाही. हा त्रास पाहण म्हणजे आम्ही जिवंत असून मेलो आहोत अस वाटत होत.
Droper आम्ही तिला थेंब- थेंब पाणी तिच्या घश्यात ओतून पाजलं तेव्हा तिने आईच्या मांडीवर डोक ठेऊन परत झोपी गेली. दोने दिवस आमची मुलगी भूक,तहान लागली म्हणून तोताल्या भाषेत बोलत होती रडत होती. पण तिला नीट खाता पीता येत नव्हते. डोक्यात मुंग्या का चावत आहे?
चक्कर का येते आहे? असं वाटतय खूप fast झोक्यात बसले आहे असं का वाटत आहे? हे प्रश्न कोरड्या डोळ्याने विचारत होती. बरी होशील तु. अस रडत बोलण्या शिवाय आम्ही काय करू शकत होतो.

The side effects of Risnia 1 MG Syrup include headache, drooling, drowsiness, nausea, and light-headedness, a feeling of restlessness or weight gain. These mild symptoms normally go away in a few days, but in case it is persistent, a consultation with your doctor may be required. However, there may be certain side effects that will require immediate medical attention:
Uncontrolled movements of the muscles in the face like frowning, tongue movement and lip smacking
High fever, sweating, tremors, uneven heartbeats and a faint-like feeling
purple spots under the skin (she had blue coloration under the eyes and swollen eyelid) - which is an indication of low platelet levels in the blood

इतका भयानक त्रास सहा वर्षाची मुलगी Paarmi Kapil Pathare ने
केवळ Medical आणि त्यांचा कामगार शंकर यांच्या
निष्काळजीपनामुळे सहन केला आहे. माझ्या पत्नीने वेळवर पाहिलं म्हणून हा मोठा घात होता होता वाचला. आज आम्ही continue 5 दिवस हे medicine देत गेलो असतो तर आज आमची मुलगी या जगात नसती. आता ती खुप बारीक झाली आहे, तीच वजन खूप कमी झाले आहे. माझी पत्नी आणि माझी मानसिक स्थिती आजही ठीक नाही. माझी पत्नी या धक्कयाने सावरलेली नाही. ती रात्री अचानक झोपेतून उठून घाबरते रडू लागते. आम्ही KEM Hospital quarters मधे काही महिनापुर्वी राहण्यास आलो होतो. ती आता त्या रूमधे जाण्यास ही घाबरते
आम्ही आपणास हात जोडून विनती करतो कुठलेही Medical मधून Medicin घेताना नीट तपासून घ्या. Medical वर आंधळा विश्वास ठेवू नका
- शरद शृंगारे

चंद्रभागेत पाप धुणाऱ्या गर्दीत सोडून गेलेल्या जीवाची वारी करून देणं कसलं भाग्य म्हणावं..❤️✌️आजच्या दिवसातला काळजाला स्पर...
07/07/2025

चंद्रभागेत पाप धुणाऱ्या गर्दीत सोडून गेलेल्या जीवाची वारी करून देणं कसलं भाग्य म्हणावं..❤️✌️

आजच्या दिवसातला काळजाला स्पर्श करणारा फोटो!

Click by -shivaji dute

कुणी लिहील ते ठाऊक नाही पण वेदनादायी आहे हे सगळ...    AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव (श्रीमंत डब्यातील गरीब माणसं)आयुष्...
06/07/2025

कुणी लिहील ते ठाऊक नाही पण वेदनादायी आहे हे सगळ...

AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव (श्रीमंत डब्यातील गरीब माणसं)
आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमलेला पोरगा आला. त्याने पाणी आणून दिले. उशी आणून दिली.. रेल्वेने AC डब्याच्या दिमतीला नेमलेला हा पोरगा मनापासून कामे करीत होता. डब्यात गर्दी नसल्याने जेवणवाला आला नाही. त्याने खाली उतरून खाद्यपदार्थ ही आणून दिले. त्याला खायला बोलावलं तरी येईना, बळेच बसवले.. एकत्र खाताना सहज त्याची चौकशी केली. तेव्हा त्या थंड वातावरणात ही उकडू लागले.

तो भोपाळचा. दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आणि आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्यासाठी रेल्वेत पुन्हा दाखल. रेल्वे हेच त्याचे घर होते. इथपर्यंत ठीक होते पण पुढे त्याने जे सांगितले ते फारच वेदनादायक होते. मी त्याला विचारले की आठवडाभर या २४ तास duty चा पगार किती? त्याचा चेहरा उदास झाला. तो म्हणाला “कोणता सांगू l?” मी विचारले “म्हणजे?”. तो म्हणाला “कागदावर आमची २०,००० रुपयेवर सही घेतात आणि प्रत्यक्षात फक्त ५००० रुपये देतात“ प्रवासात असताना फक्त २०० रुपये रोज मिळतो. त्या २०० रुपयात दिवसाचा चहा, नाश्ता आणि जेवण भागवायचे. काहीच परवडत नाही. पैसे वाचवायचे म्हणून घरून पोळ्या घेवून येतो. त्याच दोन दिवस खातो. आणि उरलेले दिवस वडा पाव खाऊन राहतो. मला त्याच्या नजरेला नजरच देता येईना.

तो वेदनेने म्हणाला “साहेब, अहो या रेल्वेत फक्त driver नोकरीत कायम आहे आणि सगळे सगळे आता तात्पुरते आहेत. overtime मिळतो पण ते आम्हाला नेमणारा आमचा मुकादम घेतो. त्यामुळे आम्हाला फक्त २०० रुपये रोजच मिळतो. मी सुन्न झालो. तो म्हणाला भोपालमध्ये आम्ही असे २००० लोक आहोत. पण संघटना केली की ते कामावरून काढून टाकतात."

मी उतरताना तो हसला. दिलेले पैसे घेत म्हणाला साहेब अजून सगळ्यात climax तर सांगायचाच राहिला. मी विचारले कोणता? तो म्हणाला “प्रवासी उतरताना चोरी करतात. जेव्हा प्रवासी छोटा टॉवेल घेवून जातात तेव्हा आमचे ५० रुपये, बेडशीट नेतात तेव्हा २०० रुपये आणि पांघरूण चोरी जाते तेव्हा १००० रुपये कापून घेतात. आठवड्यातून एक दोन घटना होत्तातच. डोळ्यासमोर दिसते पण या शरीफ लोकांना बोलू शकत नाही ते शिव्या देतात... मी सुन्न झालो. त्याचा फोटो काढला म्हटले लिहितो तुझ्यावर . तो हात जोडून म्हणाला “नका टाकू माझा फोटो, मालकाने बघितले तर काढून टाकील.“ मी म्हणालो “अरे मी मराठीत लिहीन तुझा मालक हिंदी वाचतो. तो म्हणाला “ वो कुछ भी कर सकता है." मालकाविषयीची ही तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता ? कंत्राटीकरणाचा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघत होतो.. श्रीमन्त डब्यातील ही गरीब माणसे... कोणाच्याच खिजगणतीत नाहीत.

खाजगीकरन पाहिजे ना हे एकदा नक्की वाचा. असेच सगळ्याच आफिसचे आहे. हा काही बोटावर मोजन्या इतके कर्मचारी खूप शिकले असल्याने साहेब झाले पण ते एकदम कमी प्रमाणात आहेत. पण करोडो शिकलेल्या विद्यार्थ्यांना खाजगीकरणाचा चांगलाच फटका बसला आहे व पुढे ही फटका बसणार आहे.😢

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील वाळवंटात भरला वैष्णवांचा मेळा..
06/07/2025

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील वाळवंटात भरला वैष्णवांचा मेळा..

आज सकाळी ऑफिसला जाताना या नीटनेटक्या चुणचुणीत मुलाशी भेट झाली....ट्रेन मध्ये बॉलपेन विकायचा व्यवसाय करणारा हा मुलगा २ ता...
04/07/2025

आज सकाळी ऑफिसला जाताना या नीटनेटक्या चुणचुणीत मुलाशी भेट झाली....ट्रेन मध्ये बॉलपेन विकायचा व्यवसाय करणारा हा मुलगा २ तास काम करून ८०-१०० रुपये कमावतो. खूप पालक सांगतात आज मुलांना दिवसाला ५०-१०० रुपये फक्त पॉकेट मनी म्हणून द्यावे लागतात.

या मुंबई मध्ये पैसा उडतो आणि मेहनत करणाऱ्याच्या खिशात जाऊन बसतो....कारण देणाऱ्यांना हजार कारणे असतात. वयाच्या १२-१३ व्या वर्षी ८०-१०० रुपये दिवसाला कमावणे खरच स्तुत्य असा उपक्रम...

पालक म्हणून आपण मुलांना पैसा पुरवायचा कि पैसा निर्माण करायचा आत्मविश्वास हे आपल्या हातात आहे. याच्या हातावरील गोंदणातच त्याच्या या व्यवसायिक उपक्रमाचे मूळ दडलेले आहे.

समाजातील मानसिकता तोडण्याचे काम या सुमित सारखी मुले करतात ..👍💐🎂💐🎂💐🎂

नाव :सुमित बामणे
वय : १३ वर्षे
शिक्षण : सध्या ७ वी मध्ये
शाळा : नामदेव भगत विद्यालय नेरुळ
व्यवसाय : सकाळी १०-१२ या वेळेत वाशी ते पनवेल ट्रेन मध्ये पेन विकणे.
विक्री : दररोज ४०-५० पेन
नफा : ८०-१०० रुपये
(प्रत्येक पेन मागे २-३ रुपये)
अनुभव : फक्त २ महिने. सुरुवातीला लाज वाटायची पण आई बोलली आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसे भेटतात मग लाजयचे कशाला? आता काही वाटत नाही.

महेश चव्हाण

पोस्ट साभार - #दर्जेदार

एका सामान्य ओबीसी मुलीची असामान्य गोष्ट.भाग्यश्री नैकेले, युपीएससी सिव्हिल सेवा रँक 737.दिल्ली अथवा पुण्यात न जाता,कोणते...
04/07/2025

एका सामान्य ओबीसी मुलीची असामान्य गोष्ट.
भाग्यश्री नैकेले, युपीएससी सिव्हिल सेवा रँक 737.

दिल्ली अथवा पुण्यात न जाता,कोणतेही क्लासेस न लावता, वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून टेस्ट सीरिज स्वतः केली व नागपुरातच घरी अभ्यास करून भाग्यश्री ने युपीएससी परीक्षा पास केली.

भाग्यश्रीचा जन्म टिमकी नागपूर येथील आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण नागपुरातच पूर्ण केले. वडिलांना जयपूर राजस्थान येथे काम मिळाल्याने 3 वर्ष संपूर्ण परिवार जयपूरला वास्तव्यास होते. तिथे भाग्यश्रीने ग्रॅज्युएशन केले. घरची परिस्थित जेमतेम आहे,वडिलांना मदत व्हावी म्हणून तिने 2 वर्ष डिजिटल मार्केटिंगचे काम केले. परंतु मुलीचा IAS बनण्याचा स्वप्न आहे म्हणून वडिलांनी तिला नोकरी सोडायला लावली. 2 वेळा परीक्षा दिली त्यात पूर्व परीक्षा पास होऊ शकली नाही.परंतु परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता कमीत कमी संसाधनामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा वेळी परीक्षा दिली यात 737 रँक ने परीक्षा पास केली.

भाग्यश्री सध्या परिवारासोबत दिघोरी परिसरात किरायच्या घरात राहते. त्यांचे स्वतःचे घर नाही. वडील इलेक्ट्रिक चे काम करतात. कधी काम असतो कधी नाही. म्हणून मागील 4 महिन्यापासून त्यांनी घराचा किराया सुद्धा दिला नाही. मागील 2 वर्ष मुलीकडे लॅपटॉप नव्हता मुलीला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अभ्यास करता यावा तिचा अभ्यास बुडू नये म्हणून वडीलांनी मासिक किस्तीवर लॅपटॉप खरेदी केले. 2 महिने किस्त भरली नाही म्हणून फायनान्स कंपनीवाले घरी येऊन लॅपटॉप परत नेण्याची भाषा करू लागले. वडिलांनी त्यांना विनवणी करून 3 दिवसात पैसे भरतो असे सांगून कसातरी लॅपटॉप वाचविला. हा परिवार गरीब आहे म्हणून बरेच नातेवाईक त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नव्हते. याचे दुःख त्यांना व्हायचे.

पुस्तके खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून मोजक्या लागतील तितक्याच किंवा त्याहीपेक्षा कमी पुस्तके,नोट्स वर तिने अभ्यास केला. अभ्यासिकेसाठी खर्च होईल म्हणून भाग्यश्रीने घरीच एका खोलीत अभ्यास करण्याचे ठरवले.
10 लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये येणे हेच खूप आहे.
भाग्यश्रीला यावेळी IRS (Income Tax) ही पोस्ट मिळेल. परंतु पुन्हा परीक्षा देऊन IAS भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे ती नक्कीच पाहिजे ते यश संपादन करेल .
युपीएससी ची परीक्षा पास करणे खूप कठीण आहे.
खूप संसाधन लागतात दिल्ली अथवा पुण्यासारख्या ठिकाणी राहुल अभ्यास करावा लागतो दिल्ली आणि पुण्यातील राहण्याचा,क्लासेसचा खर्च खूप जास्त आहे.
बरेच हुशार परंतु गरीब विद्यार्थी युपीएससी साठीचा खर्च खूप जास्त आहे म्हणून त्याक्षेत्राकडे जात नाहीत.
परंतु भाग्यश्रीने दाखवून दिले की जिद्द आणि विश्वास असेल तर कमीत कमी संसाधनामध्ये सुद्धा कितीही मोठी परीक्षा पास करता येते. प्रत्येकाने युपीएससी केलीच पाहिजे असे नाही. परंतु छोटे स्वप्न बघणे गुन्हा आहे. आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आपण मोठ करण्याचे स्वप्न बघितले पाहिजे.

काल तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. तिच्या यशात आईवडिलांचा सुद्धा मोठा वाटा आहे म्हणून तिच्यासोबत तिच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार केला.
पुढील परीक्षेत कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन तर्फे तिला मदत करण्याचे ठरवले आहे. इतक्या बिकट परिस्थितीत ती तीन वर्ष टिकून राहिली एक ध्येय समोर ठेवून तिने हे यश संपादन केले आहे. भाग्यश्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

- उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.

- पीयूष आकरे- संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच

30/06/2025

"फक्त एका मोबाईलमुळे उघड झाला पुण्यातील बाबाचा सेक्स स्कँडल!"

25/06/2025

सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स अंत्यसंस्काराला फक्त तीन लोक!! 😢 fans Marathi All Update

24/06/2025

"मम्मी गेली..." | १४ वर्षांच्या मुलीचा आक्रोश | कल्याण slab दुर्घटनेमुळे शहर हादरलं..

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई क्रॉसकन्ट्री स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर द...
22/06/2025

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई क्रॉसकन्ट्री स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.

त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे.

त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?"

इव्हान ने सांगितले, "माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही."

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ?"

यांवर इव्हान म्हणाला, "तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती !"

पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास !"

"त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला असतां ? माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?"

"दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे."

 #लाज_वाटती_मला_या_समाजाची ! बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी ...
22/06/2025

#लाज_वाटती_मला_या_समाजाची !

बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी लॅपटॉप बाजूला सारला आणि तिच्याकडं पाहत विचारलं,
"काही बिनसलं का स्कुलमध्ये ?''
त्यावर कोरड्या डोळ्यांनी गॅलरीकडं पाहत म्हणाली,
"काही बिनसलं नाही रे, पण एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं.''
हिच्या स्कुलमध्ये नक्की काहीतरी झालं असणार, असा विचार करत मी तिच्याकडं खुर्ची वळवली. तशी ती बोलू लागली,

"अरे मी स्कुलमधून निघाले, तोच कॅम्पमध्ये एक सैनिक उभा दिसला. अंगावरच्या कपड्यांवरुन ते लक्षात येत होतं. त्याच्या पाठीवर एक आणि हातात दोन बॅगा होत्या. येणाऱ्या गाड्यांना तो हात करत होता. पण, त्याच्या हातातलं सामान पाहून कुणीच थांबत नव्हतं. नेमका तो अशा ठिकाणी उभा होता, की तिथं बस येण्याचा प्रश्‍न नव्हता. म्हणून मी त्याच्यासमोर जाऊन थांबले. तर शेजारच्या गाड्यांवरुन जाणारे पुरुष आणि बायाही माझ्याकडं तिरक्‍या नजरेनं पाहू लागल्या. मी थांबलेली पाहून त्या सैनिकानं विचारलं,
"दिदी कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही ?''
मी म्हणाले, "तुम्हाला त्या कॅनॉलपर्यंत सोडू शकते. तिथून तुम्हाला बस मिळेल."
स्मित करत तो गाडीवर बसण्यास तयार झाला. त्यानं दोन्ही बॅगा स्वत:च्या मांडीवर अशा पद्धतीने घेतल्या की मला त्याचा धक्काही लागणार नाही. तो गाडीवर बसला. पण, रेस वाढवूनही गाडी पुढं सरकत नव्हती. तर त्यानं एका पायानं जोर देत गाडी पुढं ढकलली.

"कुठून आलात'' असं मी त्याला विचारलं, तर म्हणाला,
"श्रीनगरवरुन आलोय. स्टेशनवरुन आमची गाडी होती. त्या ट्रकमध्ये कॅन्टोन्मेंटपर्यंत आलो. पण, इथून पुढं जायला बस, रिक्षा काहीच मिळत नव्हतं. म्हणून गाड्यांना हात करत होतो.''

माझी गाडी आता बऱ्यापैकी धावत होती. स्पीडब्रेकर आल्यावर मी ब्रेक दाबत होते. पण, तो थोडाही पुढं येत नव्हता. उलट त्यानं गाडीचं कॅरियर पकडून धरलं होतं. कॅनॉल येताच मी गाडी थांबवली. तसं मी त्याला स्वत:हून विचारलं की तुम्हाला नेमकं कुठं जायचंयं ?
तसा तो म्हणाला,
"मी सासवडचा आहे. अडीच वर्षानंतर आलोय. मला हडपसरला जायचंय. तिथुन एसटी मिळेल मला."
त्यावर मी त्याला म्हणाले की चला मी तुम्हाला हडपसरला सोडते. त्याला मोठा आनंद झाला आणि तो पुन्हा त्याच आत्मियतेने गाडीवर बसला. तो बसत असताना मात्र आजुबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने माझ्याकडं पाहत होते. काहींना माझा अभिमान वाटत असावा. काहीजण मात्र, गालातल्या गालात कुत्सित हसत होते. एका तरण्याबांड जवानाला मी गाडीवर बसवतीये, अशी काहीतरी घाणेरडी भावना साऱ्या लोकांच्या डोळ्यात होती. तो बिचारा अडीच वर्षांनी त्याच्या घरी आलाय. त्याला लिफ्ट द्यायला एक माणूस थांबत नव्हता. तो तिकडं आपल्या देशाच्या सीमेवर बिनधास्त उभा राहतो, म्हणून आपण हितं निवांत झोपतो आणि मी त्याला लिफ्ट दिली तर हे हरामखोर लोक माझ्याकडं पाहून हसत होते.

काय चुक केली होती रे मी ?

असं म्हणत बायको रडायलाच लागली. तिला सावरणेही शक्‍य नव्हते. तशी रडक्‍या डोळ्यांनी पुढं बोलू लागली,
"मी त्याला हडपसरला सोडलं, तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, दिदी आम्हाला चालायची सवय असते. पण, जेव्हा आम्ही चालून थकतो, तेव्हा इथल्या बायातर सोडा, पुरुषही आम्हाला लिफ्ट देत नाहीत. असो.''

असं म्हणत त्यानं नमस्कार केला आणि बसस्टॉपच्या दिशेने निघून गेला.

खरोखरच लाज वाटतीये मला या समाजाची !

असं म्हणत पुन्हा पंधरा मिनिट बायको फक्त मुसमुसत राहिली. अशा प्रसंगाच्या अनुभवानंतर समजूत तरी घालणार कशी ?
-नितीन थोरात

हे एका सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड श्री कुणाल शर्मा आहेत. आज मी लिफ्टने खाली आलो तर ते काहीतरी वाचन करीत होते. जिज्ञासेपो...
21/06/2025

हे एका सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड श्री कुणाल शर्मा आहेत. आज मी लिफ्टने खाली आलो तर ते काहीतरी वाचन करीत होते.
जिज्ञासेपोटी चौकशी केली की, कसला अभ्यास करता? तर त्याचे उत्तर ऐकून मी अचंबीत झालो. कारण ते म्हणाले IAS.
मी पुढे चौकशी करता कळले की, त्यानी B Com. MBA (Finance) केले आहे आणि चौथ्यांदा IAS attempt करीत आहे. तसेच रात्रीची सिक्युरीटीची नोकरी केल्याने अभ्यास चांगला होतो.
मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचा फोटोही घेतला.
असा प्रयत्न आपली मुल/मुली करतील का? आणि केल्यास मराठी मुलां/मुलींची नावे IAS मधे हमखास झळकतील...
एक आशा करू या!!

कोणी लिहिली माहिती नाही, पोस्ट जुनी आहे पण फारच प्रेरणादायक तरुणांना प्रेरणा देणारी आहे म्हणून पुन्हा एकदा आपणाशी शेअर केली आहे. यातून प्रेरणा घेऊन कोणीतरी अभ्यास करून चांगल्या पोस्टवर जाऊ शकतो

Address

Pandharpur
413315

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi All Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi All Update:

Share

Category