24 taas Goa

24 taas Goa 24 Taas Goa

01/08/2026
श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरीडिचोली येथील श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेत दि. १ ऑगस्ट २०...
01/08/2026

श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

डिचोली येथील श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेत दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. प्रीती अमोल नाईक या होत्या. यावेळी विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय सरदेसाई, खजिनदार श्री. राजेश धोंड तसेच शिक्षक प्रभारी सौ. निलिक्षा राजेश धोंड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख पाहुण्या सौ. प्रीती अमोल नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकमान्य टिळक यांच्या बालपणीचा प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच त्यांच्यातील देशप्रेम, धैर्य, प्रामाणिकपणा, नेतृत्वगुण आणि शिक्षणाविषयीची तळमळ या गुणांचे अनुकरण करून जीवनात यशस्वी होण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीचा विद्यार्थी कुमार निखिल नेने याने उत्कृष्टरीत्या केले. तर आभार प्रदर्शन इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. अनिका मसुरकर हिने केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

28/07/2026

Shri Hari Sanstha pedne return from Pandharpur.

20/07/2026

The residents of Saligao, present in large number for inspection of an alleged illegal construction project in the village.The inspection carried out by the Village Panchayat of Saligao

Address

Pernem
Panjim
403512

Telephone

+917769080878

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24 taas Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 24 taas Goa:

Shortcuts

Share