Dainik ALP

Dainik ALP "लोकशाहीचा निर्भीड आवाज"

07/06/2026

"Sunday On Cycle" with Parbhani Police
#परभणी

04/06/2026

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परभणीत घेतली महायुतीतील नेत्यांचे भेट, कुठेही नाराजी नाट्या नाही, तर सर्वांचा पाठिंबा सईद खान यांना...

🔗https://youtu.be/5Nk1BRJVQXs

🎥 परभणीतील अश्या राजकीय मुलाखती, बातम्या, घडामोडी पाहण्यासाठी "दैनिक आजचा लोकप्रश्नच्या" यूट्यूब चॅनलला SUBSCRIBE करा! 🙏🏼

04/06/2026

महायुतीतील बंडखोर काका- पुतणे विजयराव जामकर आणि संग्राम जामकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आज अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी परभणीच्या राजकारणात अजून कोण कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार याची प्रतीक्षा स्थानिक स्वराज्यातील मतदार बघत आहे...
#परभणी

01/06/2026

स्थानिक स्वराज्यातून कोण होणार आमदार?
#परभणी

29/05/2026

परभणीच्या मानवत शहरानजीक असलेल्या अंधारवड मारुती जवळ ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकलचा भीषण अपघात..
अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती.
ट्रॅव्हल्स परभणीवरून पुणे कडे जात असतांना मानवत शहराजवळ झाला अपघात, अपघातानंतर संतप्त जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड...

28/05/2026

पाथरी उपविभागात मान्सून पूर्वतयारी अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पूर परिस्थितीवरील रंगीत तालीम संपन्न

गतवर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम (Mock Drill) आयोजित करण्यात आली.

या रंगीत तालमीत आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर, लाइफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव व प्राथमिक उपचार यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. संजयसिंह चव्�

27/05/2026

परभणीच्या पाथरी रोडवर दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा जोरदार अपघात झाला आहे या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाथरी रोड परिसरातील या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक परेशान झाले असून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जिल्हाभरातून नागरिक करत आहेत...
#परभणी

25/05/2026

परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांच्या या सन्मानामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

24/05/2026

23-5-26: परभणी शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर नागरिकांनी गोंधळ घातला, ऍम्ब्युलन्सला डिझेल न दिल्यामुळे झाला गोंधळ, डिझेल शिल्लक नसल्याच पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात आल्यानंतरही ऍम्ब्युलन्स चालकाकडून डिझेलची केली मागणी, तर डिझेल असूनही पंप चालकांकडून डिझेल दिले जात नसल्याचा जमावाचा आरोप.

अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने दुसऱ्या पंपावरून ऍम्ब्युलन्स ला डिझेल उपलब्ध करून देण्यात आलं, ऍम्ब्युलन्स मधून डेड बॉडी घेउन जात असल्याने डिजल घेणे अनिवार्य असल्याचे वाहन चालकाने सांगितले... पोलिसांच्या मध्यस्थी नंतर वाद मिटला परंतु इतर हुल्लड घालणाऱ्या नागरिकांशी पोलिसांची झाली होती बाचाबाची..
#परभणी

Address

Nehru Road, Opp. To LIC Of India Branch Office
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik ALP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share