
10/07/2025
अंबाजोगाई एका सरकारी रुग्णालयात एक नवजात बाळ जन्मतःच मृत घोषित केलं गेलं. डॉक्टरांनी आई-वडिलांना सांगितलं, "बाळ गेलंय."
१२ तासांनी कुटुंब बाळाला दफन करण्यासाठी गावात आलं... आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला! 👼
आजीनं शेवटचं बाळाचं तोंड पाहायचं म्हणून कपडा उघडला… आणि काय दिसलं? बाळ हलत होतं… जिवंत होतं! 😱
धावत बाळाला अंबाजोगाई रुग्णालयात नेण्यात आलं… आणि आता बाळ सुरक्षित आहे.
आईनं रुग्णालयावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. हा प्रकार मन हेलावणारा आहे, आणि वैद्यकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणारा!