02/09/2022
सत्ता गेल्यावर माणूस सैरभैर होतो असे म्हणतात. एवढ्या सरळसाध्या गोष्टी न कळणे, हा त्यातुनच आलेला अस्वस्थपणा असावा. एवढे तकलादू पुरावे म्हणजे 'खोटे बोल रेटून बोल' हा प्रकार आहे. असे पुरावे गृहीत धरले जातील असे समजणे हे सुद्धा बालिश आणि हास्यास्पद आहे.
तत्कालीन बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना तुमच्या पत्राच्या वीस दिवस आधीच 4-11-2021 रोजी रस्त्याच्या मागणीचे पत्र दिले आणि विधिमंडळातही त्या बद्दल मागणी लावून धरली. त्या वर सकारात्मक भूमिका घेऊन मंत्री महोदयांनी या कामाला बांधकाम विभागाचे सचिव यांच्या मार्फत मंजुरी दिली.
खाली दिलेली राज्याच्या बजेटची प्रत तुमच्या श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना क्लीन बोल्ड करणारी आहे. त्यात Demanded By MLA Meghna Bordikar Sakore असा अतिशय स्पष्ट उल्लेख आहे. आपले हलक्या दर्जाचे राजकारण पुढे नेण्यासाठी आणखी कुठले बाळबोध पुरावे देणार आहात ?
आमदार असताना याच रस्त्याचे काम 2018-19 या वर्षी 4 कोटी रुपये आणून केवळ कागदोपत्री करून पूर्ण रस्ता घशात घालणारे कोल्होबा अवघ्या जिंतूरकर जनतेला माहीत आहेत. या भ्रष्टाचाराला जिंतूर-सेलूचा मतदार कंटाळला होता. अनेक विकासकामांना मुकलेल्या जिंतूर व सेलूकरांना खरा विकास काय असतो हे दाखवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. याच प्रयत्नांतून मंजूर झालेला मुख्य शहरातुन जिंतुर करीता १५ कोटी व सेलु शहर मुख्य रस्ता ३० कोटी सुशोभीकरण व विकासकामांचा निधी याचा पुरावा आहे.
सत्ता असताना तूमचे नेते अर्थमंत्री म्हणून गुत्तेदारांना वेठीस धरून त्यांच्याकडून टक्केवारी घेणारे महाभाग वैधानिक पदावरील लोकप्रतिनिधीने मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या या राजकारणात मला बिलकुल रस नाही. पुराव्यांसह सत्य बाजू मांडायची होती, ती मी मांडली. तुम्हाला आता यापुढे आमचे लोक उत्तर देतील आणि सगळ्या काळ्या बाजू हळूहळू पुढे आणतील.
सत्ता गेल्यावर झालेली तुमची सैरभैर मनस्थिती आणि अस्वस्थपणा दूर होवो.
👇🏻अनुक्रमांक .२