19/03/2023
श्री देव भैरी बुवाच्या पालखीला पोलीसांची सलामी
रत्नागिरीतील बारा वाड्यांचे दैवत श्री देव भैरी बुवाचा शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलिस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलिस एलएलआर बंदुकीच्या सहाय्याने पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली हि परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत आजही अनुभवायला मिळते.भैरीच्या पालखीला.रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 1 वाजता पोलिस कर्मचार्यांनी शस्त्रसलामी दिली. यानंतर रंगमपंचमीचा रंग खेळण्यासाठी पालखी शहरात रवाना झाली.