31/08/2026
परळी तालुक्यातील मिरवट गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावात करंट लागून एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादा मिया अलाउद्दीन शेख (वय अंदाजे १९ वर्षे) हा युवक तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता ठिकाणी गेला असताना त्याला करंट लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत युवकाला बाहेर काढले.
त्यानंतर त्याला तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. युवकाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.