Proper News Network

Proper News Network Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Proper News Network, Media/News Company, parli, Parli.

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन; देशमुख परिवारावर शोककळापरळी वैजनाथ,(Proper News...
27/08/2026

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन; देशमुख परिवारावर शोककळा

परळी वैजनाथ,(Proper News Network):- परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख (वय ८७) यांचे गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देशमुख कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

रंजनाबाई देशमुख या प्रेमळ, आपुलकीच्या स्वभावाच्या तसेच धार्मिक वृत्तीच्या म्हणून परिचित होत्या. कुटुंबातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जपत त्यांनी संस्कार आणि माणुसकीची परंपरा जपली. त्यांच्या जाण्याने देशमुख परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रंजनाबाई देशमुख यांच्या निधनाने देशमुख परिवारावर कोसळलेल्या दुःखात PNN न्यूज परिवार सहभागी आहे.

🎉 Facebook recognized me as a consistent post creator this week!
27/08/2026

🎉 Facebook recognized me as a consistent post creator this week!

कृष्णेचे पूरपाणी मांजरा धरणात; मराठवाड्याच्या तहानलेल्या भूमीला मोठी आशा!खासदार बजरंग सोनवणे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री...
27/08/2026

कृष्णेचे पूरपाणी मांजरा धरणात; मराठवाड्याच्या तहानलेल्या भूमीला मोठी आशा!

खासदार बजरंग सोनवणे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकारात्मक आश्वासन!

बीड,(Proper News Network) : दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी पाण्याच्या बाबतीत मोठी आशादायक घडामोड समोर आली आहे. सांगली-कोल्हापूर परिसरातील कृष्णा नदीचे अतिरिक्त पूरपाणी उचलून ते मांजरा धरणात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना दिले आहे.

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कृष्णा नदीतील अतिरिक्त पाण्याचा उपयोग करण्याबाबत खासदार सोनवणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अतिरिक्त पूरपाणी मांजरा धरणाकडे वळविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय तसेच तांत्रिक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

ही योजना प्रत्यक्षात आली तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी पाण्याचा मोठा आधार निर्माण होण्याची शक्यता आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते.
राज्य शासनाने प्रकल्पासाठी ५० टक्के निधी सहभागाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्राची मंजुरी मिळवून पुढील कार्यवाहीला वेग देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली.

दरम्यान, सध्याची टंचाई लक्षात घेता शेतकरी आणि पशुपालकांना तातडीने दिलासा देण्यासाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही खासदार सोनवणे यांनी केली.
कृष्णेचे अतिरिक्त पाणी मांजरेत आले, तर मराठवाड्याच्या पाण्याच्या लढ्याला नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे बीडसह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

हिरवाईने नटला कपिलधार घाट; निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ!बीड, कपिलधार,(Proper News Network): पावसाळ्याच्या दिवसांत हि...
27/08/2026

हिरवाईने नटला कपिलधार घाट; निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ!

बीड, कपिलधार,(Proper News Network): पावसाळ्याच्या दिवसांत हिरवाईची शाल पांघरलेला कपिलधार घाट सध्या निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. डोंगररांगा, दाट हिरवाई, वाहते झरे आणि धुक्याची चादर यामुळे कपिलधार परिसराचे सौंदर्य खुलून दिसत आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधार हे धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.

संतपरंपरेशी जोडलेले कपिलधार येथील धार्मिक स्थळ, तसेच परिसरातील डोंगर-दऱ्या आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे भाविकांसह पर्यटकांची येथे वर्षभर वर्दळ असते. विशेषतः पावसाळ्यात परिसराचे रूप अधिकच मनमोहक होते.
कपिलधार घाटातून प्रवास करताना हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला प्रसन्न करणारे ठरते. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर कपिलधारला अधिक प्रभावीपणे विकसित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

27/08/2026

पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !

विद्यार्थ्यांच्या फी व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांवरील दडपशाही थांबवण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे

बीड ,( Proper News Network ):-एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सीओईपी (COEP) येथील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज दि.२७ गुरुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी “पत्रकारांवरील दडपशाहीचा धिक्कार असो ” लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला सहन करणार नाही" " हुकुमशाही चालणार नाही " अशा घोषणा देत पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, पोलिस महासंचालक तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), हनुमान घोडके, भीमराव कुट , प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे , आण्णासाहेब मतकर (जिल्हाध्यक्ष रासप बीड), शेषेराव वीर ( जिल्हाध्यक्ष प्रबुद्ध रिपाई बीड), प्रविण आनेराव ( जिल्हाध्यक्ष मायक्रो ओबीसी महासंघ बीड), जयसिंगराजे वीर ( गायरान हक्क अभियान बीड )आदी सहभागी झाले होते.

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर* *कार्यकारिणीत समाजातील...
27/08/2026

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर*

*कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न*

बीड ,(Proper News Network) - राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे. युवा मोर्चाच्या या नव्या दमदार टीममध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या युवकांना प्राधान्य देऊन एक चांगला संदेश देण्यात आला आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक फळी मजबूत करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय दिला आहे. नव्या कार्यकारिणीत समाजातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय आदी विविध जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. यात ७ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १५ सचिव, १० सदस्य आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.

*प्रत्येकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू - ना. पंकजाताई*
--------
संघटनेत असंख्य कार्यकर्ते असताना प्रत्येकांना पदं देणं, यात सामावून घेणं माझ्यासाठी कठीण होतं, तरी देखील प्रत्येकांना संधी दिली आहे. भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांस न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

*अशी आहे नवी कार्यकारिणी*
--------
युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे *सरचिटणीस* – चंद्रकांत देवकते (परळी), संग्राम बांगर (बीड), युवराज वायबसे, किशोर खोले (आष्टी), विष्णू आगे (माजलगाव), विकास पवार (गेवराई), उत्तरेश्वर र्निगुळे (केज), *उपाध्यक्ष –* संतोष सोळंके (परळी), विलास काचगुडे (अंबाजोगाई), ॲङ.नागेश तांबारे, पियुष सवई (बीड), विवेक पाखरे, संभाजी झांबरे (आष्टी), सुरज घुले (केज), रणजित रुपनर (धारुर), भिष्माचार्य दाभाडे (गेवराई), शहाजी सोळंके (माजलगाव), विनोद बांगर (पाटोदा), *कोषाध्यक्ष –* केशव बडे (बीड), *सचिव –* गोविंद मुंडे (परळी), मनोज कोरडे (माजलगाव), भुषण पवार, सुशिल जाधव, आनंद राऊत (बीड), माऊली पानसंबळ, सचिन वारे, आशिष जायभाये (शिरुर), मनोज गुंड, करण काळे (गेवराई), वैजनाथ देशमुख (केज), गणेश बडे (धारुर), महादेव लटपटे, शंभुराज महारनोर (आष्टी), सय्यद अन्सार (अंबाजोगाई), *सदस्य –* इश्वर भांगे, सुनिल चादर, श्यामसुदर पाटील (गेवराई), सुधीर सोनवणे (पाटोदा), अमोल वाघमारे, सुधाकर मुळे (बीड), तुकाराम हंडे (माजलगाव), रुपेश लगड, बाळासाहेब तिडके (धारुर), संतोष गडदे (अंबाजोगाई)
••••

27/08/2026

कुठला व्हिडिओ आहे.? बॅनर सोबत कार्यकर्ता हवेत कसा उडाला पहा... सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ.

26/08/2026

मुंबईत आंदोलन होण्याचे संकेत; ‘मराठे मुंबईत येणारच’ – मनोज जरांगे पाटील

जालना, (Proper News Network ) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टच्या आंदोलनाचे ठिकाण अद्याप जाहीर केलेले नसले, तरी आंदोलन मुंबईतही होऊ शकते, असे संकेत दिल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार असताना सरकारकडून आंदोलनावर विविध निर्बंध लादले जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मोठे झेंडे, जड वाहने, मुक्काम तसेच सुट्टीच्या दिवशी आंदोलनासंदर्भातील नियमांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सरकारचे दडपशाहीचे धोरण असून, “काहीही झाले तरी मराठे मुंबईत येणारच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपसरपंचाचा मृत्यू; पहाटे रस्त्यावर मृतदेह, अपघाताच्या संशयाने खळबळ?बीड,दिंद्रुड, (PNN NEWS) : गावच्या कारभारात सक्रिय अस...
26/08/2026

उपसरपंचाचा मृत्यू; पहाटे रस्त्यावर मृतदेह, अपघाताच्या संशयाने खळबळ?

बीड,दिंद्रुड, (PNN NEWS) : गावच्या कारभारात सक्रिय असलेल्या तरुण उपसरपंचाचा अचानक मृत्यू झाल्याने श्रीक्षेत्र बाभळगाव हादरून गेले आहे. बाभळगावचे उपसरपंच वैजनाथ विठ्ठल लाटे (वय ३५) यांचा मृतदेह बुधवारी (२६ ऑगस्ट) पहाटे भोपा-बाभळगाव रस्त्यावर आढळून आला. त्यांच्या शेजारीच मोटारसायकल अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने हा अपघात असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मध्यरात्रीच्या सुमारास वैजनाथ लाटे हे मोटारसायकलवरून भोपा-बाभळगाव मार्गे जात असताना अज्ञात कारणाने अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणांना रस्त्यावर लाटे यांचा मृतदेह निदर्शनास आला. जवळच त्यांची मोटारसायकल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अवस्थेत पडलेली होती. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास बाभळगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैजनाथ लाटे हे गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजात सक्रिय होते. अल्पवयातच त्यांचा असा अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? मोटारसायकलवरील नियंत्रण कसे सुटले? यासह मृत्यूमागील अन्य शक्यतांचाही पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, मोटारसायकलची अवस्था आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सिरसाळ्याचा आकाश रोडे यांची परभणी पोलीस प्रशासनात निवड  सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या नालंदा अभ्यासिकेच्या माध्यमातून गाठ...
26/08/2026

सिरसाळ्याचा आकाश रोडे यांची परभणी पोलीस प्रशासनात निवड

सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या नालंदा अभ्यासिकेच्या माध्यमातून गाठले यशाचे शिखर

बीड/सिरसाळा, ( Proper News Network): अफाट जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्य राखल्यास गरिब परिस्थिती कधीही यशाच्या आड येऊ शकत नाही, हेच सिरसाळ्यातील युवक आकाश रोडे याने दाखवून दिले आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील आकाशने आपल्या प्रयत्नांच्या जोरावर परभणी पोलीस प्रशासनात चालक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे परिसरातून त्याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर ग्रामीण तरुणांसाठी त्याचे हे यश नक्कीच एक नवी उमेद आणि मोठी प्रेरणा ठरणार आहे.आकाशची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, मात्र अशाही परिस्थितीत त्याने कधीही आपले मनोबल कमी होऊ दिले नाही. आई-वडिलांनी अतोनात कष्ट करून, घाम गाळून आकाशच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना बळ दिले.

आपल्या आई-वडिलांच्या याच कष्टाचे चीज करायचे, हा एकच ध्यास मनात ठेवून दहा वर्षा पुर्वी पासुन आकाशने पोलीस भरतीचा खडतर प्रवास सुरू केला. बीड , लातूर येथील पोलीस निवड प्रक्रियेत तो प्रतिक्षा यादीत होता. त्या ठिकाणी यश मिळाले नाही परंतु प्रयत्न सोडले नाहीत. सिरसाळ्यातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथील नालंदा अभ्यासिका ही त्याच्या या अभ्यासाची मुख्य केंद्रस्थान ठरली. कोणत्याही महागड्या क्लासचा आधार न घेता, नालंदा अभ्यासिका येथे उपलब्ध झालेल्या शांत आणि पोषक वातावरणामध्ये त्याने दिवस-रात्र एक करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मैदानी चाचणीचा सराव आणि लेखी परीक्षेची जय्यत तयारी या दोन्ही आघाड्यांवर त्याने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळेच आज त्याची परभणी पोलीस दलात चालक म्हणून शासकीय सेवेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाची बातमी सिरसाळा गावात धडकताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

आपल्या गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या मोठ्या यशाचा सार्थ अभिमान व्यक्त करत, ग्रामस्थांच्या वतीने गावातून त्याची वाजत-गाजत आणि मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते. एका कष्टकरी बापाच्या आणि माउलीच्या डोळ्यात आपल्या मुलाचे हे यश पाहून आलेले आनंदाश्रू संपूर्ण गावाला भावूक करून गेले. एका सामान्य ग्रामीण भागातून, गरिबीशी दोन हात करत आकाशने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर परिसरातील प्रत्येक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची नवी दिशा देणारे ठरले आहे.

त्याच्या यशाबद्दल सम्राट अशोक बुद्ध विहार येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या वतिने भव्य सत्कार करण्यात आला. दरम्यान मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

Address

Parli
Parli
431515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Proper News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share