23/07/2025
आ.सुरेश आण्णा धस यांची मराठा आरक्षणासाठी कोरोना काळातील काढलेल्या मोर्चाच्या केसमधून निर्दोष मुक्तता.
बीड: शिवजागृत्ती न्यूज
आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. कोरोना काळात रस्त्यावर यायला बंदी होती त्यावेळी समाजहित डोळ्यासमोर ठेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी शासनाच्या विरोधात मोर्चा काढला म्हणून लोकांविरुध्द कलम 188,279,280 भादवी सह कलम 51(ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 2,3,4 साथीचे रोग कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला. आमदार सुरेश अण्णा धस यांच्या सह पाटोदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव ,सुखदेव अप्पा सानप, श्री माऊली जरांगे,सचिन उबाळे,यशवंत खंडागळे,शेख वसीम यांच्यावर केस करण्यात आली होती. आज दिनांक २३ जुलै रोजी बीड न्यायालयाने आमदार सुरेश अण्णा धस यांच्यासह नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव ,सुखदेव अप्पा सानप, श्री माऊली जरांगे,सचिन उबाळे,यशवंत खंडागळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस हे समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे लोकप्रतिनिधी आहेत. आतापर्यंत मराठा मोर्चात त्यांनी सतत आवाज उठवला आहे. मराठा आरक्षणसाठी विधानसभेपासून रस्त्यावरच्या लढाई मध्ये सतत समाजासोबत दिसून आले आहेत प्रसंगी त्यांच्यावर केसेस झाल्या पण हा समाजकार्याचा वसा आणि वारसा त्यांनी जोपासला आहे.