23/04/2025
जम्मु काश्मीरमधे तैनात असलेल्या जवानाचा लेख…
#पहलगाम_दहशतवादी_हमला
मुळात दहशतवाद्यांना हा हमला फौज वर करायचाच नव्हता , कारण 370 संपल्या पासून काश्मीर खूप बदलून गेले आहे,2009,2016, 2019आणि आता 2025 चौथी वेळ माझी काश्मीर ला आहे.
यात 2009 आणि 2016 चा काळ खूप भयानक होता,तिथले लोक सुद्धा फौज ला इंडियन डॉग तोंडावर म्हणत असत,2019 यात थोडा बदल झाला, दगड फेक बंद झाली, आणि आता 2025 ला मी काश्मीर ला आलो, काश्मीर बघितले, आणि फिरलो सुद्धा, पहिले फौज ला कॅम्प च्या बाहेर निघता येत नाही होते, पण आता फौज ही फिरायला लागली,काश्मीर हे पूर्ण पणे बदलून गेले आहे, तिथले लोक, तिथल्या लोकांची मानसिकता, ही ही बदलून गेली आहे.
हेच दहशतवाद्यांना सहन होत नव्हतं, या वर्षी काश्मीर ला तीन कोटी पर्यटकांची बुकिंग आहे , काश्मिरी याच लोकांच्या जीवावर आपली रोजी रोटी चा गुजारा करत आहेत , काश्मीर लोकांनी दहशतवाद्यांना सपोर्ट करणे बंद केले आहे, म्हणून च दहशतवाद्यांनी या वेळी फौज सोडून पर्यटकांना टार्गेट केले, जेणे करून पर्यटक येणे बंद करतील, लोकांचा रोजगार सुटल आणि बेरोजगार लोक हे पुन्हा दहशतवादी बनतील.
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, की मोदीजी काय निर्णय घेतील, कारण कुठला ही देश आपल्या निष्पाप नागरिकांची हत्या पचवून घेत नाही.
israel ने हमास सोबत जे केले तेच मोदींनी POK मध्ये लपलेल्या दहशतवाद्यान सोबत केले पाहिजे.
बाकी आपल्या देशाची फौज ही कायमच आदेश ची वाट बघत असले.
"पहलगाम मध्ये बळी गेलेल्या निष्पाप लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली."
#राकेश_पाटील