24/08/2015
जाणून घ्या बोधचिन्हामागच्या (लोगो) कल्पना!
एखाद्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या बोधचिन्हाद्वारे (लोगो) त्यांच्या सेवेची किंवा उत्पादनाची नेमकी कल्पना येते. त्यासाठी विशेष प्रयत्नाने लोगो विकसित केले जातात. हे लोगोच पुढे कंपनीची ओळख निर्माण करतात. अशाच काही लोकप्रिय कल्पक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने आपल्या सेवेची किंवा उत्पादनाची माहिती देण्याऱ्या लोगोंविषयी-
ऍमेझॉन नावाचे ऑनलाईन शॉपिंगसाठीचे संकेतस्थळ आहे. "ऍमेझॉन'च्या लोगोमध्ये इंग्रजीतील "ए' या अक्षरापासून "झेड' या अक्षरापर्यंत जाणारा बाण दर्शविला आहे. या अर्थ आमच्याकडे ए पासून झेडपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत असा होतो.