15/08/2026
साताऱ्यात दुचाकीस्वार व कारचालकाचा रस्त्यावर वाद!
सातारा; अलीकडच्या काळात साताऱ्यात भलत्याच कारणावरून वाद होत असताना दिसत आहेत. कधी पाणीपुरी वरून वाद,कधी राजकीय कार्यकर्त्यांचा वाद, रस्त्यावरचे वाद तर अगदी सामान्य झाले आहेत. असाच वाद रात्री नऊ ते दहा च्या सुमारास सातारा शहरातील साईबाबा मंदिर परिसरात झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. हा वाद अगदी शुल्लक कारणावरून सुरू झाला होता. दुचाकीला चार चाकी चा धक्का लागल्याने वाद झाला. काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार मद्यधुंद अवस्थेत असल्यासारखा वाटत होता. चार चाकी वाहनातून स्वार असणाऱ्यांनीही दुचाकी चालकाशी वाद घातला. रस्त्यावर बराच वेळ तमाशा सुरू होता. याला नेमकं कारण काय? साताऱ्यात अवेळी सुरू असणारे रस्त्याचे कामे? चालक? अरुंद रस्ता? सातारा नगरपरिषदेला आली लहर केला कंत्राटदारांच्या उद्धाराचा कहर!