29/05/2026
हा व्हिडीओ नीट बघा…
भेदरलेली चिमुकली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोपऱ्यात लपत आहे, आणि समोर एका महिलेला तब्बल चार मिनिटांहून अधिक काळ अमानुष मारहाण केली जात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — इतका गंभीर प्रकार घडूनही संबंधित इसमावर कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई होणार नसल्याचे सांगितले जात आहे. कारण हा प्रकार “अदखलपात्र गुन्हा” असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पीडित महिलेने अधिकृत तक्रार दिलेली नसल्याने पोलिस केवळ मध्यस्थी करू शकतात, गुन्हा दाखल करू शकत नाहीत, अशी भूमिका घेतली जात आहे.
मग आता प्रश्न उभा राहतो…
चूक नेमकी कोणाची?
कायद्याची?
कायद्याचे रक्षक असलेल्या व्यवस्थेची?
की अन्याय सहन करूनही गप्प राहणाऱ्या महिलेची?
एका लहान मुलीसमोर घडणारी ही हिंसा केवळ कौटुंबिक वाद म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. अशा घटनांचा मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो. समाज म्हणून आपण याकडे फक्त व्हायरल व्हिडीओ म्हणून पाहणार आहोत का?
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज थेट मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल.
CMOMaharashtra