26/10/2025
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा 'मन की बात’ कार्यक्रम...!
देशाचे प्रेरणादायी नेतृत्व करणारे आणि प्रत्येक भारतीयाशी थेट संवाद साधणारे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज ‘मन की बात’ या संवादात्मक कार्यक्रमाच्या १२७व्या भागातून देशवासियांना संबोधित केले. हा प्रेरणादायक कार्यक्रम सहकाऱ्यांसमवेत पाहिला. या कार्यक्रमातून मा. मोदीजींनी समाजातील सकारात्मक बदल, जनसहभाग आणि राष्ट्रविकासासाठी चालू असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.
यासोबतच मा. मोदीजींनी आपल्या संवादात स्वच्छता, पर्यावरण, जैवविविधता, भाषा, संस्कृती, स्वदेशी उद्योग आणि आत्मनिर्भर भारत या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाचा विशेष उल्लेख करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सक्रीय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच देशभर स्वदेशी उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने होत असलेले प्रयत्न यांचे कौतुक केले.
यावेळी मा. मोदीजींनी ओडिशामधील कोरापुट कॉफी या स्थानिक उत्पादनाच्या जागतिक यशाचा उल्लेख करत भारतातील स्थानिक उद्योगांनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, येत्या ७ नोव्हेंबरला ‘वंदे मातरम’ राष्ट्रगीताच्या १५०व्या वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
येत्या ३१ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. तसेच, येत्या ७ नोव्हेंबरला आपल्या राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने, मा. मोदीजींनी या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे स्मरण करत, या ऐतिहासिक प्रसंगी देशभर आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रेरणादायी संवादातून मा. मोदीजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात नवचैतन्य जागवले असून त्यांच्या विचारांतून देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा, जबाबदारी आणि अभिमानाची भावना पुन्हा एकदा दृढ झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती संघटन सरचिटणीस श्री मोरेश्वर शेडगे, विकासभाऊ डोळस,वैशाली ताई खाड्ये,अजय पाताडे, संजय पटनी,संकेत चोंधे,अजित कुलथे हे उपस्थित होते
ी_बात