Chatrapati News 24

Chatrapati News 24 Journalism - Media - Press - PR - Electronic Media - Print Media

05/11/2024
*‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार**‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपर...
13/03/2024

*‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार*

*‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत*

*३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची होणार मदत*

पुणे - प्रतिनिधी
‘पुनीत बालन ग्रुप’ आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार झाला असून ‘पुनीत बालन ग्रुप’ महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. या करारानुसार पुनीत बालन ग्रुप सिकंदर शेखला ३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची मदत करणार आहे.

देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ कायमच विविध खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत करार करून पुनीत बालन ग्रुपच्यावतीने त्यांच्या करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. नुकताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि राज्यभर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम असलेला सिकंदर शेखचा यांच्या करिअरसाठीही हातभार लावण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे. त्यानुसार युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकंदर शेख यांनाही खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर सिकंदर शेख यांचेक आता हिंद केसरी होण्याचे आणि ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ततेची सोनेरी झालर लावण्यासाठी या सहकार्याचा निश्चित उपयोग होईल.
—————
कोट
सिंकदर शेख यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं त्यांचं हिंद केसरी होण्याचं आणि ऑलम्पिक स्पर्धेतून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगातही झळकेल आणि हाच ‘पुनीत बालन ग्रुप’साठी मोठा सन्मान ठरेल.
- पुनीत बालन, युवा उद्योजक

पुणे दिनांक 12.3.2024    🚩|| छत्रपती न्यूज २४ || 🚩पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक वसंत...
12/03/2024

पुणे दिनांक 12.3.2024
🚩|| छत्रपती न्यूज २४ || 🚩
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक वसंत मोरे उर्फ तात्या यांचा राज साहेबांना लोटांगण घालून केला अखेरचा जय महाराष्ट्र, का ? घातले त्यांनी लोटांगण नजीकच्या काळात कळेलच,परंतु मनसेला लागलेली ही घरघर राज ठाकरे का? रोखू शकत नाही, हे मनसैनिकांना हे मात्र कळेनासे झाले आहे,

भावी खासदार म्हणून अनेक पोस्टर तात्यांची झळकत होती,ती तर त्यांच्याबरोबरच्या नेत्यांना, तात्यांची ही गोष्ट रुचली नाही की काय? व पुढे काय?

असाही प्रश्न निर्माण होतो गेली अनेक वर्ष तात्यांनी मनसेला मनापासून साथ दिली होती,मनसेचे नाव मोठं करण्यासाठी तात्यांनी जिवाचे रान केले होते, विधानसभा ही लढवली होती, आणि आता पुणे शहराचा खासदार होण्याची स्वप्न पाहु लागला म्हणून काय झालं, काय चुकलं तात्यांच ?

आपणास उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
~~~~~~~~~~~~~~~~~
ब्युरो रिपोर्ट छत्रपती न्यूज २४
~~~~~~~~~~~~~~~~~

कै.विठ्ठलराव शिवरकर यांचा 39 वा स्मृतीदिन संपन्न हडपसर, पुणे : माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिवरकर यांच्या 39 व्या स्मृ...
11/03/2024

कै.विठ्ठलराव शिवरकर यांचा 39 वा स्मृतीदिन संपन्न
हडपसर, पुणे : माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिवरकर यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठलराव शिवरकर उद्यान, वानवडी, पुणे येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी साठे (सामाजिक कार्यकर्ते), कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री), आमदार चेतन दादा तुपे, माजी महापौर प्रशांत दादा जगताप, बापूसाहेब गानला, चंद्रकांत ससाणे सर, ॲड.अर्जुनराव खुर्पे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठलराव शिवरकर उद्यानातील कै. विठ्ठलराव शिवरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कै.विठ्ठलराव शिवरकरांनी परिसराचा विकास करीत असतानाच संस्कारही विकसित केल्याचे सांगितले. तसेच ह.भ.प. डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता सर्वांनाच असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह.भ.प. डॉ.पंकज महाराज गावडे यांनी आपल्या मार्गदर्शनात तळपणारा सूर्य जसे अनेक जीवांना अन्न जीवन देतो, तसे महान कार्य, जीवन जगतानाची निष्ठा, चरित्रांची शुद्धता असलेले कै. विठ्ठलराव शिवरकर होते, असे त्यांनी सांगितले. आज त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या प्रेरणेतून ‘असेच कोणी भविष्यात निर्माण होतील व पुन्हा वानवडीचा विकास होईल’, असा विश्वास व्यक्त केला. विचारांची सखोलता व त्यातून जन्माला येणारे पीक समाजाला देणारे हे कै.विठ्ठलराव शिवरकर होते. घराबाहेर पडताना हे लक्षात घ्या की, आपल्या आई-वडिलांना दुःखाचे अश्रू देऊ नका, त्यांना अपमानित व्हावे लागेल असे वागू नका, असे किशोरवयींना सांगितले. भविष्यात ज्ञान आणि चारित्र्य असेल तर जगाची द्वारे तुम्हाला खुली असतील. आत्म्याचे सौंदर्य हे सर्वात मोठे आहे. मनातील कचरा साफ होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मार्क्सवंत न होता, गुणवंत होणे आवश्यक आहे. शरीरावर काम करा, शरीर मजबूत ठेवा, मन मजबूत ठेवा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कारण जीवन जगण्यासाठी व जगवण्यासाठी आहे. शिवाजी महाराजांना समजून घेणे म्हणजे खरे कृतीयुक्त जीवन आहे. जीवनाचे ध्येय निश्चित करा, उद्दिष्ट निश्चित करा, व्यवसाय निर्माण करा, असे सांगितले. ध्यानधारणा, योग साधना व नियमित वाचन करा असे सांगितले. सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. “चला राष्ट्र बनवूया” या उपक्रमाची कल्पना सांगितली.

पुणे दिनांक 26.02.2042   🚩||छत्रपती न्यूज २४|| 🚩तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा ...
26/02/2024

पुणे दिनांक 26.02.2042
🚩||छत्रपती न्यूज २४|| 🚩
तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा प्रकार उपयुक्त - ना. चंद्रकांतदादा पाटील*

नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर कोथरूड श्री विजेता

तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे व निरोगी आयुष्य जगावे यासाठी नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचे ही मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात "कोथरूड श्री" ह्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भाजयुमो चे क्रीडा आघाडी चे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे यांचा विशेष सत्कार केला व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, भाजप नेते धनंजय जाधव,कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, युवा मोर्चा चे कोथरूड मंडल अध्यक्ष अमित तोरडमल,क्रीडा आघाडी चे योगेश कंठाळे, अनिश अगरवाल, मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे, राजेंद्र येडे, नितीश बराटे,सुमित दिकोंडा, स्वप्नील राजवाडे, सायंदेव देहाडराय, सूचित देशपांडे यांच्यासह महिला मोर्चा प्रभारी व कोथरूड च्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे,महिला मोर्चा सरचिटणीस विद्याताई टेमकर,पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझीरे,उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर, कविता सदाशिवे इ मान्यवर उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगलेल्या ह्या स्पर्धेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
"कोथरूड श्री" हा मुख्य किताब वर्ल्ड जिम च्या गणेश बनकर ने पटकवला तर मोस्ट इम्परुव्हडं बॉडी बिल्डर चा विजेता मोहम्मद एहराज ठरला,बेस्ट पोझर चा विजेता ठरला अतुल साळुंके तर अतिक शेख ने अप कमिंग बॉडी बिल्डर चा 'किताब पटकवीला.
राजेंद्र नांगरे, नंदू कळमकर,मुस्तफा पटेल,दिलीप धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा संयोजन प्रतीक खर्डेकर यांनी केले.
आपला,
प्रतीक खर्डेकर.
क्रीडा आघाडी प्रमुख, भाजयुमो.
मो - 8149017580

20/02/2024

प्रसिद्धीसाठी.

*आयुक्तांना 'चष्मा' देण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले.*

*संभाजी ब्रिगेडचे आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन.*

वाकडमधील तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेकडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेसमोर "बेमुदत साखळी उपोषण" करण्यात येत आहे. परंतू महापालिकेत ये-जा करणाऱ्या आयुक्तांना मात्र सदरील आंदोलन दिसत नसल्याने त्यांना आंदोलन दिसावे,आणि त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा 'चष्मा' भेट देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले.यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने' 'ठिय्या आंदोलन' करण्यात आले.
दरम्यान वाकडमधील टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू दखल घेतली न गेल्याने गेल्या दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 'बेमुदत साखळी उपोषण" करण्यात येत आहे. परंतू महापालिकेत ये-जा करणाऱ्या आयुक्तांना मात्र सदरील आंदोलन दिसत नसल्याने त्यांना आंदोलन दिसावे,आणि त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा 'चष्मा' भेट देण्यात येईल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला होता. आयुक्तांना जाड भिंगाचा 'चष्मा' भेट देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी अडवले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने' 'ठिय्या आंदोलन' करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची भेट घेत 'या घोटाळ्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून, योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानदेव लोभे जिल्हा सचिव वैभव जाधव जिल्हा उपाध्यक्ष शहर रावसाहेब गंगाधरे शहर सचिव महेश कांबळे,निलेश शेंडगे,वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदचे नकुल भोईर,सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार,विशाल सरोदे संदीप नवसुपे जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे ताई,वसंत पाटील,संतोष शिंदेअभिषेक गायकवाड,किरण खोत,प्रफुल्ल वाघमारे,जनार्दन देठे
आदी जणांनी सहभाग घेतला होता.

पुणे दि.२०.०२.२०२४     🚩|| छत्रपती न्यूज 24 ||🚩
20/02/2024

पुणे दि.२०.०२.२०२४
🚩|| छत्रपती न्यूज 24 ||🚩

पुणे दि.१४.०२.२०२४🚩Il छत्रपती न्यूज 24 ll 🚩जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद!मराठा सम...
14/02/2024

पुणे दि.१४.०२.२०२४
🚩Il छत्रपती न्यूज 24 ll 🚩

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो सहकार्यांसह मुंबईत धडकले तेव्हा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन स्थगित केले.
सगे सोयरे यांना जात दाखले देण्याचा अध्यादेश काढला त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आरक्षण आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मागणी साठी जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करत आहेत तसेच त्यांनी औषधोपचार सुद्धा नाकारलेला आहे यासाठी त्यांना पाठिंबा म्हणून पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
निघालेल्या दुचाकी रॅलीची सुरवात डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून करण्यात आली.सदर रॅली डांगे चौक,काळेवाडी फाटा, रहाटणी,पिंपरीगाव मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीयेथे आली.यावेळी डाॅ.बाबासाहेबआंबेडकर व बमहात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,निगडी मार्गे भक्ती शक्ती समूह शिल्प येथे आली.यावेळी पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळेस प्रकाश जाधव बयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व रॅलीचा समारोप करण्यात आला.जीवन बोराडे व मावळ तालुका सकल मराठा समन्वयक मुरे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रॅली यशस्वी करण्यासाठी सतिश काळे,प्रकाश जाधव,सचिन बारणे,मारूती भापकर,सुनिता शिंदे,वैभव जाधव,मीरा कदम,वसंत पाटील,गणेश देवराम,किरण खोत,संतोष शिंदे,रावसाहेब गंगाधरे,पांडुरंग परचंडराव,रमेश कदम,हरेश नखाते,ओमकार देशमुख,निलेश बदाले,सदाशिव लोभे,श्रीकांत गोरे,ज्ञानेश्वर लोभे,गणेश दहिभाते,गणेश देवराम,गणेश भांडवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

*https://youtu.be/7bhJvyIaJtY?si=qVM8rxMXDGH6ry3r* =================*Chhatrapati News*🚩 =================  🇮🇳🤝🇮🇳🤝🇮🇳🤝====...
29/01/2024

*https://youtu.be/7bhJvyIaJtY?si=qVM8rxMXDGH6ry3r*
=================
*Chhatrapati News*🚩
=================
🇮🇳🤝🇮🇳🤝🇮🇳🤝
=================
*▶️YouTube channel*
=================
*शिवाजी हुलवळे:पत्रकार*
*🙏Like | Share | 🔔Subscribe 👈💖🦚*
*Mob: 9422306342*
*9767237399*
*8087990343*
=================

Hulawale Shivaji M.

नमो महोत्सवाचे दिमाखदार उदघाटन...        नवी मुंबईत "नमो चषक" चे कोपरखैरणे येथे लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईकसाहेब यांच...
12/01/2024

नमो महोत्सवाचे दिमाखदार उदघाटन...
नवी मुंबईत "नमो चषक" चे कोपरखैरणे येथे लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईकसाहेब यांचे शुभहस्ते उदघाटन संप्पन्न झाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मा. आमदार श्री संदीप नाईक,मा. खासदार संजीव नाईक,मा.महापौर श्री.सागर नाईक,मा.सभागृह नेता तथा जिल्हाउपाध्यक्ष श्री.रविंद्र इथापे,महामंत्री श्री अनंत सुतार,उपाध्यक्ष श्री दशरथ भगत,महामंत्री सौ नेत्रा शिर्के,शुभांगी पाटील,इतर नगरसेवक,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात ६५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Address

Poona

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chatrapati News 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chatrapati News 24:

Share