18/04/2021
आज सर्वसाधारणपणे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर 90- 95 टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आहेत, याचं कारण एकमेव म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थ्याकडे स्पर्धा परीक्षेत शिवाय दुसरा पर्याय नाहीये, म्हणून हे विद्यार्थी जिल्हा परिषद भरती व वेगवेगळ्या खात्यामार्फत होणारे सरळ सेवा भरती, एमपीएससी आणि यूपीएससी करण्यासाठी तयार होतात. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागात येतो व शहरी भागात त्याला राहणे, खाणे यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आम्ही अनेक विद्यार्थ्यांना विचारले की तुम्ही ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाहीत का ?
त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांचे एकमेव उत्तर होतं की आम्हाला ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे साहित्य विशेषता अद्ययावत पुस्तके , मासिके उपलब्ध होत नाही. त्यामुळे आम्हाला शहरी भागात वास्तव्य करावं लागतं.
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढती महागाई चा विचार करतात त्याला पुस्तके पण अपवाद नाहीत पुस्तकाची पण किमती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे . त्यासाठीच विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक दरात पुस्तके घरपोच मिळावी,
म्हणून आम्ही विचार केला की ग्रामीण भागात जर आपण स्पर्धा परीक्षेची साहित्य विशेषता अद्ययावत पुस्तके , मासिके ते पण माफक दरात उपलब्ध करून दिल्यास निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल म्हणूनच खास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही माफक दरात घरपोच पुस्तके उपलब्ध देत आहोत. तरी गरजू विद्यार्थ्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. https://wa.me/c/917588055599