Pune Crime News

Pune Crime News पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यातील ?

13/11/2022

सासवड लोकअदालतीत ४२४ खटले निकाली काढले

सासवड दि. 13, (पुणे क्राईम न्यूज) सासवड, ता. पुरंदर येथील न्यायालयात शनिवारी दि. १२.११.२०२२ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी प्रकरणे, प्रलंबित तडजोडपात्र व गुन्हा कबुलीची फौजदारी प्रकरणे, सर्व दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ४२४ खटले निकाली काढण्यात आले आहेत. यात एकूण २ कोटी ५१ लाख चाळीस हजार रुपयांची वसुली झाली आहे. सासवड न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश ताहीर बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश डी. एम. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एम. एस. भरड हे पॅनलप्रमुख होते. त्यांना ॲड. प्रसाद किकले, ॲड. पल्लवी भोसले, ॲड. राहुल काळे यांनी सहाय्य केले. या वेळी सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय भोईटे, उपाध्यक्ष ॲड. रूपेश ताकवले, ॲड. एन. के. जाधव, ॲड. अण्णासाहेब खाडे, ॲड. कलाताई फडतरे, ॲड. गणेश लेंडे, ॲड. अनुश्री भारंबे, ॲड. गायकवाड, ॲड. दिगंबर पोमण, ॲड. सौरभ वढणे, ॲड. तेजस खाडे आदी उपस्थित होते.

*‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद*  *बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक*  चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या...
22/10/2022

*‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद*
*बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक*
चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार
पुणे : ‘कोथरूड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पहाट दोन दिवसीय कार्यक्रमास रसिकांचाा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘कोथरूड सुरोत्सवाच्या पहिल्या दिवशी 20 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केलेे होते. तर दुसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबर 2022 रोजी सांयकाळी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी सदाबाहर गाणे सादर केली. यावेळी बेला शेंडे यांच्या गाण्यावर रसिक थिरकले होते. कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् पाहिले होते.
‘कोथरूड सुरोत्सव’ कार्यक्रमात पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महारांजाची मुर्ती भेट देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

*'सुरोत्सवा'ने रसिक झाले मंत्रमुग्ध*  *राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने* पुणे :   सुप्रसिद्ध शास्त्...
20/10/2022

*'सुरोत्सवा'ने रसिक झाले मंत्रमुग्ध*

*राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने*

पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्र सिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले होते.
�कोथरूड सुरोत्सव� उत्सव सुरांचा दिवाळी पहाट आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् यांनी पाहिले.
कार्यक्रम सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांच्यावतीने राहुल देशपांडे, अमृता नातू यांच्या शास्त्रीय गायन, सदाबाहर गाीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिकली. काल रात्री जोरदार पाऊस झाला असतांना देखील आज पहाटे पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. 1600 पेक्षा अधिक रसिक कार्यक्रमास उपस्थित होत तर ऑनलाईन सुमारे 2000 नागरीक सहभागी झाले होते.
तसेच 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 05:30 वाजता सुरांच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सदाबाहर गाणे सादर करणार असून सूत्रसंचालन समीरा जोशी करणार आहेत. यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

कॅन्सरग्रस्तांसोबत दिवाळी विथ परपजपुणे दि. ९ : (पुणे क्राईम न्यूज प्रतिनिधी) केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉ...
09/10/2022

कॅन्सरग्रस्तांसोबत दिवाळी विथ परपज
पुणे दि. ९ : (पुणे क्राईम न्यूज प्रतिनिधी) केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पीटलने आज कॅन्सर रुग्णांसोबत दिवाळी कमांड हॉस्पिटल के चरक सभागृहात साजरी केली. यावेळी मेजर जनरल बी.के गोयल, व्हीएसएम कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे, ले.ज. एम. ए. तुताने, महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री सल्लागार डॉ. सुभाष. आर साळुंके, सकाळचे संपादक सम्राट फडणविस, संस्थेचे संचालक एन.एस. न्यायपथी सोबत कॅन्सर रुग्णांचे नातेवाईक, नर्स, मावशी आदी उपस्थित हेाते.
मोफत रुग्णांवर सर्वोत्तम उपचार करणार्‍या केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटलचे कार्य अतुलनीय आहे, ही संस्था म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी देव आहे, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. दिवाळी विथ परपज कार्याक्रमात रुग्णांच्या नातेवाईक भावोत्कट झाले होते. रुग्णांची याठीकाणी एक आई जशी करते त्याप्रमाणे केली जाते, विश्रांती हे एक मंदीरच आहे, ही भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
कर्करोगाच्या उपचारात रुग्णाला तीव्र वेदना होतात. त्यासाठी वेदना व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अनेकदा मृत्यू अटळ असतो. त्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदनारहित देण्याचा प्रयत्न संस्था करते. मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांला आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे महत्वाचे कार्य संस्था करते. त्याबद्दल नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Breaking news....लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आ...
18/09/2022

Breaking news....

लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Breaking News .....अन्न व औषध प्रशासनद्वारे मे.जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉ...
18/09/2022

Breaking News .....

अन्न व औषध प्रशासनद्वारे मे.जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचा मुंबईतील मुलुंड यंथील उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील ( डॉ ) . एम . एस . जाधव यांना शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या ...
18/09/2022

पुरंदर तालुक्यातील ( डॉ ) . एम . एस . जाधव यांना शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या योगदानाबद्दल आसाम विद्यापीठाची मानद डी.लीट पदवी प्रदान

पुणे (18) : सीए . ( डॉ ) एम . एस . जाधव यांना मानद डी.लीट् . पदवी प्रदान शुक्रवार , दि . १६ सप्टेंबर २०२२ रोजी आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ , गुवाहटी , आसाम या विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये प्रा . सीए ( डॉ ) . एम . एस . जाधव यांनी शैक्षणिक , ग्रामीण विकास , सहकार इत्यादी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाच्या योगदानाबद्दल विद्यापीठाने प्रा . जाधव यांना मानद डी.लीट ही पदवी आसामचे राज्यपाल व विद्यापीठाचे व्हीजीटर श्री . जगदीश मुखी , आसाम राज्याचे शिक्षण व आदिवासी विकास मंत्री डॉ . रानौज पेगु व शास्त्रज्ञ डॉ . शेखर मेडगे , विद्यापीठाचे कुलपती डॉ . एन . एन . दत्ता , कुलगुरु प्रा . डॉ . नारा तालुकदार यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली . भारतातील ३,५०,००० सनदी लेखापाल आहेत त्यातील २,००,००० हे इंडस्ट्रीजमध्ये से करतात १,५०,००० हे खाजगी प्रॅक्टीस करीत आहेत . विद्यापीठाने डॉ . जाधव यांनी सदस्य अध्य बोर्ड , भारतीय सनदी लेखाकर संस्थान , नवी दिल्ली म्हणून केलेले काम सावित्रीबाई फुले ! विद्यापीठामध्ये १ ९९ ६ ते २००६ या काळात वित्त व लेखा अधिकारी अंतर्गत हिशोब तपासणी प्रभारी कुलसचिव म्हणून केलेले कौतुकास्पद काम व विद्यापीठामध्ये नवनवीन प्रयोग करून पद्धती यंत्रना निर्माण करून विद्यापीठाला आर्थिक शिस्त व आत्मर्निभर बनविण्यासाठी केलेल योगदानाबद्दल , पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडख , सासवड , दौं शिक्षण प्रसारक मंडळ , सासवड , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे या संस्थांच्यामार्फत शैक्षणि क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल , महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे विश्वस्त म्हणून गेली ३० काम करीत आहेत . पर्यावरण विकास ग्राम विकास , घर तिथे शौचालय इत्यादी प्रकल्प राबविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे व गांधी विचार प्रसारासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केलेली आहे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आदर्श वित्तीय प्रणाली सुरू करून देशात २००१ मध्येच ISO 9000-2001 प्रमाणपत्र प्राप्त करणेमध्ये महत्त्वाचे योगदान होते , त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक शिस्त व स्थिती भक्कम करणेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे . शरद कृषी पर्यावरण विकास प्रतिष्ठान , सासवड या संस्थेमार्फत आदर्शगाव , पाणी अडवा पाणी जिरवा , जल संधारण , वनराई बंधारे असे विविध प्रकल्प राबविले आहे त्याचा फायदा आजही या गावांना मिळत आहे . शैक्षणिक विकास , विद्यार्थ्यांना मागदर्शन , उद्योजकता निर्माण करणे , आर्थिक शिस्त व प्रशासकीय प्रक्रिया उत्तम ठेवण्याचे महत्त्वाचे काम विविध विद्यापीठे , महाविद्यालये , विद्यालयांमध्ये केलेले आहे . आपले ज्ञान हे समजासाठी आहे त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे . या भावनेने गेली ३५ वर्षे या क्षेत्रात प्रा . एम . एस . जाधव काम करीत आहेत याचा गौरव ही मानद डी . लीट् . पदवी देऊन करण्यात येत आहे असे गौरवउद्गार मा . राज्यपाल यांनी आपल्या भाषणात केले . शिक्षणमंत्री , कुलपती , कुलगुरु यांनी डॉ . जाधव यांच्या कार्याचा गौरव केला मानद डी . लीट ही पदवी प्रदान केली . भारतातील सीए ( डॉ ) एम . एस . जाधव हे पहिलेच सीए आहेत त्यांना मानद डी . लीट् . ही पदवी प्राप्त झाली आहे . पुरंदर तालुक्यातील मा . डॉ . राम ताकवले यांचे नंतर प्रा . सीए . डॉ . एम . एस . जाधव यांना हा बहुमान मिळाला आहे . पुरंदरच्या मातीत वाढलेला पुरंदर मध्ये बालपण व पदवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मानद डी . लीट् ही पदवी मिळू शकते हे केवळ हा मातीचा गुण हे कन्ऱ्हेचे पाणी आहे आणि कष्ट करणेची तयारी त्याचे योग्य नियोजन आणि उद्दीष्टापासून न भटकणे की असे यश व अशा पदव्या मिळू शकतात आणि ही माजी मानद डी . लीट् पदवी माझे दैवत माझी आई . माझे आदरणीय ना . डॉ . पतंगराव कदम , मा . चंदुकाका जगताप व शरदतात्या ढमढेरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वीकारतो . आता माझी जबाबदारी वाढलेली आहे यापुढे यापेक्षा मोठ्या कौशल्यतेने शैक्षणिक कार्य व सामाजिक विकासाचे कार्य करीत राहील असा विश्वास प्रा . सीए , डॉ . एम . एस . जाधव यांनी व्यक्त केला . की पदवी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीस व ' मुळ ' जो व्यक्ती विसरला नाही त्याला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे . हे शैक्षणिक कार्य करताना माझे कुटुंब माझी धर्मपत्नी सौ . निशा जाधव हिने मोठ्या शिताफीने सांभाळली . मुलांचे संस्कार व जडणघडण करण्यामध्ये मोठे योगदान दिले त्याबद्दल सौ . निशा जाधव यांचे ऋण व्यक्त केले , मुलगा लंडन मध्ये संशोधन करीत आहे . मुलगी उत्तम पद्धतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे . या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो व मला ही मानद डी . लीट् पदवी प्राप्त होण्यामागे ज्या सर्व ज्ञान अज्ञात व्यक्ती माझ्या कार्यात सहभागी झाले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे . मी काम करू शकलो कारण ते सर्वजण माझे समवेत होते त्यांनी मला सहकार्य केले म्हणूनच हे घडू शकले हे मी कधीही नाकारणार नाही . त्यामुळे सर्व सहकारी सर्व महाविद्यालयातील व विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक या सर्वांचा मी आभारी आहे व यापुढेही असेच सहकार्य करावे व विश्वास माझ्यावर ठेवावा ही नम्र प्रार्थना , ही मिळालेली मानद डी . लीट पदवी माझ्या पुढील आयुष्यासाठी एक प्रेरणा म्हणून कार्य करेल असा मला विश्वास वाटतो असे मनोगत प्रा . सीए . ( डॉ . ) एम . एस . जाधव यांनी केले . कार्यक्रमास आसाम सरकारमधील वरिष्ठ अधिकारी , राजभवन मधील वरिष्ठ अधिकारी , विद्यापीठाचे सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी राष्ट्रगीत होऊन पदवीप्रदान समारंभाची सांगता झाली .

Breaking news.......माननीय विशेष न्यायालयाने (पीएमएलए), रांची यांनी एका बनावट प्रकरणात मेसर्स नव निर्माण बिल्डर्स अँड डे...
16/09/2022

Breaking news.......

माननीय विशेष न्यायालयाने (पीएमएलए), रांची यांनी एका बनावट प्रकरणात मेसर्स नव निर्माण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे 80 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत." अशी माहिती ED ने ट्विट केली आहे.

Breaking news.....लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या तैलचित्राचे रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात अनावरण करण्यात आले. क...
14/09/2022

Breaking news.....

लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या तैलचित्राचे रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात अनावरण करण्यात आले. कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे विचार याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

14/09/2022

गुळुंचे (जिल्हा पुणे ) येथील तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी

जेजुरी , दि . १४ : महाराष्ट्र नागरी सेवा नियम १ ९ ७ ९ नुसार तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी केला आहे .गुळुंचे येथील मतदारांची कुठलीही नोटीस न देता नावे वगळली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच चौकशी करून मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचा आदेश केला आहे .
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावच्या ३३ मतदारांना पूर्वसूचना न देता तलाठ्यांनी त्यांना मतदारयादीतून वगळ होते तर वेळेत नावे देऊनही ४७ नव मतदारांची नावे समाविष्ट केली नव्हती . २६ जानेवारीच्या ग्रामसभेत यावरून मतदार
संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यासंबंधी ठराव घेतले . मतदारांची नावे वगळताना रीतसर १३ व १४ क्रमांकाच्या नोटिसा बजावणे बंधनकारक असते . मात्र तलाठ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब न करता खोटे पंचनामे केले . हेतूपुरस्सर नावे वगळली असे तहसीलदार यांना आढळल्याने त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना दिला होता . तलाठ्यांची बाजू योग्य असल्याचा नितीन निगडे यांचा युक्तिवाद व कोतवाल नारायण भंडलकर यांचा अनुकूल जबाबही तलाठ्यांना वाचवू शकला नाही . दुसऱ्या गावी राहणाऱ्या काही मतदारांची नावे कुठलीही नोटीस न देता परस्पर वगळण्याप्रकरणी गुळुंचे ( ता . पुरंदर ) गावचे तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काढला आहे . तसेच वगळलेल्या मतदारांना चौकशी करुन पुन्हा समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही तहसीलदारांना दिले आहेत .

Breaking news......ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांवर शोध घेतला.  मेसर्स पारेख अल्युम...
14/09/2022

Breaking news......

ईडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांवर शोध घेतला. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लि.च्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. ₹ 47.76 कोटी मूल्याचे 91.5 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आले आहे.

14/09/2022

हडपसर जवळील शेवाळवाडी येथे दोन मैत्रिणीची आत्महत्या

पुणे : जिल्ह्यातील हडपसरमध्ये दोघा मैत्रिणींनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे हद्दीत ही घडना घडली. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यापैकी एका मैत्रिणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं तर दुसऱ्या मैत्रिणीने थेट पाचव्या मजल्यावरुनच उडी घेतली.

हडपसर जवळील शेवाळवाडी इथं दोन मैत्रिणीनी आत्महत्या केली. मंगळवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आत्महत्या केलेल्या दोन्ही मैत्रिणींचं वय अवघं 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मैत्रिणीचं नाव आकांक्षा औदुंबर गायकवाड आहे. तर दुसऱ्या मैत्रिणीचं नाव सानिका हरिश्चंद्र भागवत आहे.

सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली. तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी मारली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.

पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे आकांक्षा हीचा जागीच मृत्यू झाला. आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन जेव्हा उडी टाकली, तेव्हा ती वरुन थेट एका रुग्णवाहिकेच्या जवळच कोसळली. पाचव्या मजल्यावरुन कोसळल्यामुळे आकांक्षाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती.

दोन्ही मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलंय. दरम्यान, हडपसर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेत पाठवण्यात आले आहेत. याआत्महत्याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

Address

Pune
Pune

Telephone

+919405094926

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Crime News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Crime News:

Share

Category