15/02/2025
जुन्या रूढी आणि परंपरा यांच्या अंधश्रद्धेतून समाज मुक्त व्हावा. अंधश्रद्धा आणि पशुबळी यांच्या अधीन न राहता समाजाने विवेकाच्या मार्गाने विज्ञानाकडे मार्गस्थ व्हावे यासाठी संत सेवालाल महाराज यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे पुरस्कार केला. आई-वडिलांचा आणि स्त्रियांचा आदर, निसर्ग आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याची शिकवण देणारे संत सेवालाल महाराज बंजारा समाजासाठी दैवततुल्य आहेत. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#सेवालालमहाराज #बंजारा #गोरबंजारा #गोर_बंजारा