मराठी शास्त्र - Marathi Shastra

  • Home
  • India
  • Pune
  • मराठी शास्त्र - Marathi Shastra

मराठी शास्त्र - Marathi Shastra मराठी शास्त्र, स्वामी सेवा, आरोग्य उपाय मराठी माणसांसाठी वास्तुशास्त्र, आरोग्य, जीवनशैली विषयक उत्तम लेख..
(1)

साहित्य: १/२ जुडी कोवळा पालक१ वाटी बेसन पीठ२ चमचे तांदळाचे पीठ१ छोटा चमचा ओवा१ छोटा चमचा मिरची आणि लसणाची पेस्ट१/२ चमचा ...
30/10/2025

साहित्य: १/२ जुडी कोवळा पालक
१ वाटी बेसन पीठ
२ चमचे तांदळाचे पीठ
१ छोटा चमचा ओवा
१ छोटा चमचा मिरची आणि लसणाची पेस्ट
१/२ चमचा हळद
चवीनुसार मीठ
१ चमचा तीळ (ऐच्छिक)
तळण्यासाठी तेल

कृती:

1. पालक स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्या.

2. एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मिरची-लसणाची पेस्ट, ओवा, हळद, मीठ आणि तीळ एकत्र करा.

3. थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी घालून भजीसाठी घट्टसर पीठ भिजवा. मिश्रण जास्त पातळ नसावे.

4. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापल्यावर, मिश्रणाचे छोटे

5. गोळे किंवा भजी तेलात सोडून मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

6. कुरकुरीत झालेल्या भजींना पेपर टॉवेलवर काढून घ्या, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.

7. गरमागरम पालक भजी चटणीसोबत सर्व्ह करा.

साहित्य:कोकम: सुमारे ६-७ (गरजेनुसार)नारळाचे दूध: १ कपहिरवी मिरची: १ (चवीनुसार)आले: छोटा तुकडा (ऐच्छिक)कोथिंबीर: बारीक चि...
30/10/2025

साहित्य:कोकम: सुमारे ६-७ (गरजेनुसार)
नारळाचे दूध: १ कप
हिरवी मिरची: १ (चवीनुसार)
आले: छोटा तुकडा (ऐच्छिक)
कोथिंबीर: बारीक चिरलेली, सजावटीसाठी
मीठ: चवीनुसार
साखर: चवीनुसार

कृती:

1. कोकम भिजवणे: कोकम थोड्या पाण्यात सुमारे १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर हाताने चांगले चोळून कोकमचा रस काढून घ्या.

2. मिश्रण तयार करणे: एका भांड्यात कोकमाचा रस, नारळाचे दूध, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले (ऐच्छिक) आणि चवीनुसार मीठ व साखर घ्या.

3. एकत्र करणे: सर्व साहित्य चांगले एकत्र करा. गरज वाटल्यास थोडं पाणी घालून मिश्रण एकसारखे करा.

4. तयार सोलकढी: तयार सोलकढी एका ग्लासमध्ये काढा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

महाराष्ट्रीयन थाळी: महाराष्ट्राची ओळख म्हणजे तिची समृद्ध संस्कृती, सण-उत्सव आणि विविधतेने नटलेले खाद्यजीवन. या परंपरेचा ...
30/10/2025

महाराष्ट्रीयन थाळी: महाराष्ट्राची ओळख म्हणजे तिची समृद्ध संस्कृती, सण-उत्सव आणि विविधतेने नटलेले खाद्यजीवन. या परंपरेचा सर्वात स्वादिष्ट आणि पारंपरिक भाग म्हणजे “महाराष्ट्रीयन थाळी.” ही थाळी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातील चवींचा आणि जीवनशैलीचा एकत्रित अनुभव आहे.

थाळीत दिसणारा प्रत्येक पदार्थ हा घरगुती उबदारपणाचं आणि प्रेमाचं प्रतीक असतो. या थाळीत साधेपणा आणि समृद्धी दोन्हीचा सुंदर समतोल दिसतो. महाराष्ट्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून थाळी वाढताना आदर, प्रेम आणि आत्मीयतेचा भाव दिसतो.

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाला स्वतःची खास पाककला आहे, आणि त्याचं प्रतिबिंब या थाळीत स्पष्ट दिसतं. कोकणात नारळाचा गोडवा आणि हलके मसाले जाणवतात, तर विदर्भ आणि खानदेश भागात तिखट, मसालेदार आणि दमदार चव असते. पश्चिम महाराष्ट्रात संतुलित, पौष्टिक आणि घरगुती चवींचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक थाळी हा एक नवीन अनुभव ठरतो.

या थाळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं आरोग्यदायी स्वरूप. चवींसोबतच पचनास मदत करणारे घटक वापरले जातात. त्यामुळे ही थाळी केवळ स्वादिष्टच नव्हे तर शरीराला पोषकही असते.

जेवणाची मांडणी आणि वाढणी हेदेखील एक कला आहे. थाळीतील विविध रंग, सुगंध आणि पदार्थांचे रूप पाहूनच मन प्रसन्न होतं. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नाही, तर तो आनंदाचा, एकत्रतेचा आणि परंपरेचा सोहळा आहे.

महाराष्ट्रीयन थाळी: महाराष्ट्रात जेवण ही केवळ दैनंदिन प्रक्रिया नसून ती एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा सर्वात सुंदर अविष...
29/10/2025

महाराष्ट्रीयन थाळी: महाराष्ट्रात जेवण ही केवळ दैनंदिन प्रक्रिया नसून ती एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा सर्वात सुंदर अविष्कार म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी. थाळीसमोर बसताच मनात समाधानाची आणि घरच्यांच्या प्रेमाची उब जाणवते.

ही थाळी म्हणजे चवींची रंगीत दुनिया आहे. प्रत्येक गोष्टीला थाळीत स्थान असतं आणि त्या सर्व एकमेकांना पूरक ठरतात. पोषणमूल्यांचा विचार, विविध चवींचा संगम आणि घरगुती पद्धती यामुळे ही थाळी आरोग्यासाठीही हितकारक ठरते.

महाराष्ट्रातील विविध भागांत थाळीची रचना बदलताना दिसते. कोकणात समुद्रकिनाऱ्याच्या वातावरणाचा गोडवा जाणवतो. मराठवाड्यात मसाल्यांची धाटणी आणि सुगंध मन मोहून टाकतो. खानदेश आणि विदर्भात झणझणीत आणि दमदार चव दिसते. या सगळ्यामुळे महाराष्ट्रीयन थाळी ही प्रत्येक प्रदेशाच्या ओळखीचं प्रतीक आहे.

थाळी ही फक्त पदार्थांची जोडणी नाही; तिच्यामध्ये परंपरेची शिदोरी आहे. आजी-आईकडून शिकलेल्या पद्धती भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचतात. एकत्र बसून जेवण घेताना संवाद, हशा आणि कुटुंबातील बंध अधिक मजबूत होतात. जेवणाची ही कला मनाला आनंद देते आणि नात्यांमध्ये मधुरता निर्माण करते.

थाळीची मांडणीही आकर्षक असते — विविध रंग, सुगंध आणि स्वरूप पाहूनच भूक वाढते. जेवणातील प्रत्येक घासात घरगुती प्रेमाचा स्पर्श असतो.

साहित्य:3 वाटी रवा1 वाटी तूप2 वाटी साखर1 चमचा वेलचीपूडड्राय फ्रूट आवडीनुसारकृती:1. प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग...
27/10/2025

साहित्य:3 वाटी रवा
1 वाटी तूप
2 वाटी साखर
1 चमचा वेलचीपूड
ड्राय फ्रूट आवडीनुसार

कृती:

1. प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवून त्यात तूप घाला तूप गरम झाले की त्यात रवा घाला,रवा सोनेरी रंगावर मंद आचेवर भाजून घ्या.

2. एक पातेल्यात साखर घेऊन,साखर बुडेल इतकेच पाणी घालून साखरेचा एकतारी पाक करून घ्या,मग तो पाक व वेलचीपूड भाजलेल्या रव्यात घाला.

3.ते मिश्रण 30 मिनिटे झाकून ठेवा,मग लाडू वळून घ्या व लाडूवर आपल्या आवडीनुसार सजावटीसाठी ड्राय फ्रुट लावा तयार झाले आपले रव्याचे लाडू.

साहित्य:१ वाटी भिजवलेले मूग (किंवा मोड आलेले मूग)१/४ कप तांदूळ (आवश्यक असल्यास)२ हिरव्या मिरच्या१ लहान तुकडा आले१/२ चमचा...
27/10/2025

साहित्य:१ वाटी भिजवलेले मूग (किंवा मोड आलेले मूग)
१/४ कप तांदूळ (आवश्यक असल्यास)
२ हिरव्या मिरच्या
१ लहान तुकडा आले
१/२ चमचा जिरे
चवीनुसार मीठ
थोडी कोथिंबीर
पाणी (आवश्यकतेनुसार)

कृती:

1. भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घ्या.त्यात हिरवी मिरची, आले, जिरे आणि कोथिंबीर घाला.

2. आवश्यकतेनुसार तांदूळ घालून गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत वाटून घ्या.

3. मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पिठाची कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावी.

4. एक नॉन-स्टिक तवा गरम करा. तव्यावर थोडे तेल लावा.
तयार पिठाचे डोसे तव्यावर पसरवा.

5. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

6. गरम गरम मूग डोसे चटणी किंवा सांबरसोबत सर्व्ह करा.

साहित्य: 1/2 कप प्रमाणे नाचणीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन पीठ,तांदळाचे पीठ1 कप सत्तू चे पीठ1/2 : टेबलस्पून लाल मिरची पावडर,...
26/10/2025

साहित्य: 1/2 कप प्रमाणे नाचणीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन पीठ,तांदळाचे पीठ
1 कप सत्तू चे पीठ
1/2 : टेबलस्पून लाल मिरची पावडर, धना पावडर
1 टीस्पून हळदी,जीरा धना पावडर
1 हिरव्या लसूण पातीचा ठेचा
2 टेबलस्पून दही
चवीनुसार मीठ
गरजेनुसार तेल

कृती:

1. सर्वात आधी दिल्याप्रमाणे एक एक करून सगळे पीठ पातेल्यात टाकून घेऊ.

2. आता दिल्याप्रमाणे मसाले मी टाकून पाणी टाकून बॅटर तयार करू.

3. आता दही टाकून अजून मसाले थोडे टाकून डोस्यासारखे बेटर तयार करू. आता त्यात लसूण पातीचा ठेचा टाकून मिक्स करून घेऊ.

4. तव्यावर तेल टाकून धिरडे पसरून घेऊन दोन्ही साईडने भाजून तयार करून घेऊ.

5. तयार केलेले लसूणाच्या पातीच्या चटणी बरोबर सर्व्ह करू.

साहित्य: उसळसाठी:हिरवे मटार : 2 ते 2½ कपकांदा : 1 (बारीक चिरलेला)टोमॅटो : 1 (बारीक चिरलेला)आले-लसूण पेस्ट : 1 चमचातेल : ...
24/10/2025

साहित्य: उसळसाठी:हिरवे मटार : 2 ते 2½ कप

कांदा : 1 (बारीक चिरलेला)

टोमॅटो : 1 (बारीक चिरलेला)

आले-लसूण पेस्ट : 1 चमचा

तेल : ¼ कप

हळद : ¼ चमचा

लाल तिखट : 1 चमचा (चवीनुसार)

गरम मसाला : 1 चमचा

मीठ : चवीनुसार

कोथिंबीर + पुदिना : सजावटीसाठी

वाटणासाठी:

कांदा : 1

खोबरे : ⅓ ते ½ कप (किसलेले)

काजू : ¼ कप (ऐच्छिक)

हिरवी मिरची : 2

कोथिंबीर : 1 जुडी

पुदिना : 1 जुडी

कृती

1️⃣ मटार शिजवणे

मटार धुवून प्रेशर कुकरमध्ये मीठ + थोडं पाणी घालून 2–3 शिट्ट्या द्या.
कढईत तेल गरम करून जिरे–मोहरीची फोडणी द्या.
कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

2️⃣ मसाला तयार करणे

वाटणातील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या.
हा मसाला कढईत घालून तेल सुटेपर्यंत परता.

हळद, तिखट आणि गरम मसाला घालून नीट मिसळा.

3️⃣ उसळ तयार करणे

शिजवलेले मटार + त्याचे पाणी कढईत घाला.
चवीनुसार मीठ घाला.हवी असल्यास गरम पाणी घालून एक उकळी आणा.

4️⃣ सर्व्हिंग

वरून चिरलेली कोथिंबीर + पुदिना घालून सजवा.
पाव, ब्रेड, भाकरी किंवा चपातीसोबत मजेत खा!

साहित्य: 250 ग्रॅम गव्हाचे पीठशंभर ग्रॅम मेथी1 टेबलस्पून तिखट1/2 टीस्पून हळद1/2 टीस्पून जीरे1/2 टीस्पून ओवा1/2 टीस्पून त...
24/10/2025

साहित्य: 250 ग्रॅम गव्हाचे पीठ
शंभर ग्रॅम मेथी
1 टेबलस्पून तिखट
1/2 टीस्पून हळद
1/2 टीस्पून जीरे
1/2 टीस्पून ओवा
1/2 टीस्पून तीळ
1/2 टीस्पून धने पावडर
1/2 टीस्पून आलं-लसणाची पेस्ट
मीठ
तेल

कृती:

1. मेथीची भाजी स्वच्छ धुऊन चिरून घेतली. कणकेमध्ये हळद,तिखट,मीठ, धने पावडर, जीरे, ओवा, तीळ, आलं-लसणाची पेस्ट, तेल आणि मेथी घालून मिक्स करून घेतले.

2. मेथी मिक्स केलेल्या कणकेचा गोळा तयार करून घेतला. हा गोळा दहा ते पंधरा मिनिटे रेस्ट करायला ठेवला. त्यानंतर कणकेचे छोटे गोळे तयार करून त्याची पोळी तयार करून घेतली.

3. गॅस वर तवा गरम करायला ठेवला. त्यावर ही पोळी तेल घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतली. या प्रकारे सर्व पोळ्या तयार करून घेतल्या.

4. तयार आहे आपले गरमागरम मेथीचे पराठे. हे पराठे लिंबूचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे त्यांच्यासोबत छान वाटतात.

दिवाळी फऱाळ थाळी: दिवाळी हा महाराष्ट्राचा सर्वात उज्ज्वल, आनंददायी आणि कुटुंबांना एकत्र आणणारा सण आहे. या सणाची खरी ओळख ...
23/10/2025

दिवाळी फऱाळ थाळी: दिवाळी हा महाराष्ट्राचा सर्वात उज्ज्वल, आनंददायी आणि कुटुंबांना एकत्र आणणारा सण आहे. या सणाची खरी ओळख म्हणजे “दिवाळी फऱाळ थाळी.” ही थाळी फक्त स्वादिष्ट पदार्थांची मांडणी नसून, ती आपल्या परंपरेचा, घरगुती प्रेमाचा आणि सणाच्या आनंदाचा जिवंत अनुभव आहे.

फऱाळ थाळी म्हणजे गोड आणि तिखट चवींचा सुंदर संगम. प्रत्येक पदार्थ घरातल्या स्त्रिया प्रेमाने आणि मेहनतीने तयार करतात. घरभर दरवळणारा साजूक तुपाचा सुगंध, तव्यावर भाजलेले पदार्थ, आणि कुटुंबाच्या गप्पांचा आवाज — हे सगळं मिळून दिवाळीचं खरं वातावरण तयार होतं.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फऱाळ थाळीची शैली थोडी बदलते. काही ठिकाणी पारंपरिक पदार्थांना महत्त्व दिलं जातं, तर काही ठिकाणी नव्या चवी आणि नव्या पद्धती वापरल्या जातात. पण प्रत्येक थाळीत समान असतं ते म्हणजे “घरचं” म्हणून मिळणारं आपुलकीचं समाधान.

फऱाळ थाळी ही फक्त खाण्यापुरती मर्यादित नसते; ती सणाची उबदार भावना दर्शवते. सणाच्या दिवशी ही थाळी आप्तेष्टांना आणि मित्रांना देऊन आनंद वाटला जातो. ती प्रेम, एकत्रता आणि परंपरेचा सुगंध घेऊन येते.

दिवाळी फऱाळ तयार करताना घरात हसू, गप्पा आणि आनंदाचे वातावरण असते. हे क्षणच सणाचे खरे सौंदर्य बनवतात. फऱाळ थाळी म्हणजे चवींबरोबरच आठवणींचाही मेळ.

साहित्य:2 कप गव्हाचे पीठ1/2 कप रवा1 कांदा बारीक चिरून1 टोमॅटो बारीक चिरून3 तिखट मिरच्या बारीक तुकडे करून1 टीस्पून जिरं1/...
22/10/2025

साहित्य:2 कप गव्हाचे पीठ
1/2 कप रवा
1 कांदा बारीक चिरून
1 टोमॅटो बारीक चिरून
3 तिखट मिरच्या बारीक तुकडे करून
1 टीस्पून जिरं
1/2टीस्पून आलं लसूण पेस्ट
चवीप्रमाणे मीठ
तेल आणि पाणी

कृती:

1. प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं लसूण पेस्ट, जिरं, आणि चवी प्रमाणे मीठ टाकून एकत्र करून घ्या. आवश्यक तेवढे पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. (खूप पातळ करू नये). मिश्रण ५ मिनिटे मरण्यासाठी ठेवून द्या. (यात तुम्ही आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या घालू शकता जसं किसलेले गाजर, कांद्याची पात, पालक इत्यादी).

2. गॅसवर एक तवा/पॅन ठेवा. गरम झाला की थोडं तेल लावून घ्या आणि पळीने मिश्रण गोल पसरून घावन घालून घ्या. बाजूने थोडे तेल सोडून २-३ मिनिटे झाकण द्या. आता दुसऱ्या बाजूने पालटून घ्या आणि२मिनिटांनी. काढून घ्या.

3. आपले गव्हाच्या पीठाचे घावने तयार आहेत. हे नुसते पण खूप छान लागतात. शक्यतो हे गरम गरमच खावेत.

साहित्य:भगर / वरई – 1 वाटीसाबुदाणा – ½ वाटीलाल भोपळा (किसलेला) – 100 ग्रॅमदही – 1 वाटीआले-मिरचीचा ठेचा – चवीनुसारजिरे – ...
22/10/2025

साहित्य:भगर / वरई – 1 वाटी

साबुदाणा – ½ वाटी

लाल भोपळा (किसलेला) – 100 ग्रॅम

दही – 1 वाटी

आले-मिरचीचा ठेचा – चवीनुसार

जिरे – ½ चमचा

कोथिंबीर – बारीक चिरलेली

मीठ – चवीनुसार

पाणी – ½ वाटी (गरजेनुसार)

तेल / तूप – आप्पेपात्रासाठी

कृती:

1️⃣ मिश्रण तयार करा:
भगर आणि साबुदाणा एकत्र २-३ तास भिजवून घ्या.
नंतर भिजवलेली भगर आणि साबुदाणा, किसलेला लाल भोपळा, आले-मिरचीचा ठेचा, जिरे, मीठ, दही आणि कोथिंबीर एकत्र करून घ्या.
गरजेनुसार पाणी घालून आप्प्यासाठी घट्टसर पीठ तयार करा.

2️⃣ आप्पे बनवा:
आप्पेपात्र गरम करून प्रत्येक कप्प्यात थोडं तेल किंवा तूप लावा.
चमच्याने पिठाचं मिश्रण प्रत्येक कप्प्यात भरा.

3️⃣ शिजवा:
झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. एका बाजूने सोनेरी झाल्यावर पलटवा आणि दुसरी बाजूही खमंग भाजून घ्या.

4️⃣ सर्व्ह करा:
गरमागरम आप्पे शेंगदाण्याच्या चटणीसह किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

Address

Katraj, Pune
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी शास्त्र - Marathi Shastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share