Just Statue

Just Statue Blogging and updating current issues

31/01/2022

प्रभाग प्रारूप रचनांची नावे जाहीर -

पुणे महानगरपालिका आगामी निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप रचना उद्या दि. १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. आज पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळवरून प्रभाग प्रारूप रचनेच्या ५८ प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या नावानेही १० प्रभाग तयार झाले आहेत.

प्रभाग प्रारूप रचनांची नावे खालीलप्रमाणे ;

1. धानोरी – विश्रांतवाडी

2. टिंगरेनगर – संजय पार्क

3. लोहगाव - विमान नगर

4. वाघोली – इऑन आयटी पार्क

5. खराडी – चंदननगर

6. वडगावशेरी

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ

8. कळस – फुलेनगर

9. येरवडा

10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ

12. औंध – बालेवाडी

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

14. पाषाण – बावधन बुद्रुक

15. पंचवटी – गोखलेनगर

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड

21. मुंढवा – घोरपडी

22. मांजरी – शेवाळवाडी

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

25. हडपसर गावठाण – सातववाडी

26. भीमनगर – रामटेकडी

27. कासेवाडी – हरकानगर

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

30. जयभवानी नगर – केळेवाडी

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

34. वारजे – कोंढवे धावडे

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

36. कर्वेनगर

37. जनता वसाहत – दत्तवाडी

38. शिवदर्शन - पद्मावती

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क

41. कोंढवा खुर्द - मिठानगर

42. सय्यदनगर – लुल्लानगर

43. वानवडी – कौसरबाग

44. काळेपडळ – ससाणेनगर

45. फुरसुंगी

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

48. अप्पर सुपर इंदिरानगर

49. बालाजीनगर – के के मार्केट

50. सहकारनगर – तळजाई

51. वडगाव – पाचगाव पर्वती

52. नांदेडसिटी – सनसिटी

53. खडकवासला -नऱ्हे

54. धायरी – आंबेगाव

55. धनकवडी – आंबेगाव पठार

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

58. कात्रज – गोकुळनगर

शाहीद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा बहुप्रतिक्षित 'जर्सी' चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी प्रदर्...
28/12/2021

शाहीद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा बहुप्रतिक्षित 'जर्सी' चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट पुढे ढकलले आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाणार आहे.

विशाल निकम ठरला कलर्स मराठीवरील “बिग बॉस मराठी सिझन 3” चा विजेता...
26/12/2021

विशाल निकम ठरला कलर्स मराठीवरील “बिग बॉस मराठी सिझन 3” चा विजेता...

१८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना मिळणारमोफत लस.१ मे पासून उपलब्ध होणार लस..!राज्यसरकारची मोठी घोषणा..!
25/04/2021

१८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना मिळणार
मोफत लस.
१ मे पासून उपलब्ध होणार लस..!

राज्यसरकारची मोठी घोषणा..!

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई य...
23/01/2021

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आले.

सीरम इन्स्टिटयूटला आकस्मिक लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एक पुण्यातला मुलगा होता. अवघ्या एकवीस वर्ष...
23/01/2021

सीरम इन्स्टिटयूटला आकस्मिक लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एक पुण्यातला मुलगा होता. अवघ्या एकवीस वर्षांचा.
नाव प्रतीक पाष्टे.

नुकतंच इंजिनिअरिंगचं डिप्लोमा पुर्ण झालं होतं. डिग्रीला प्रवेश घेण्यापूर्वीच काळाने घाला घातला. अन २१ वर्षाच्या मुलाला हे जग सोडावं लागलं. आगीत होरपळून प्रतीकचा मृत्यू झाला. मृतदेहासोबत असणाऱ्या वस्तूंवरून कुटुंबियांनी मृत प्रतीकची ओळख करावी लागली.

प्रतीकचं फेसबुक प्रोफाईल पाहिलं. नुकतंच उमलतं वय. मित्रांसोबतचे काही फोटो. शेवटी खाली एका धावत्या कारचा फोटो आहे.

प्रतीकचं स्वप्नं असेल आपली परिस्थिती बदलायची. चांगलं जीवन जगायची. भविष्यात एखादी कार घ्यायची.

बस..
आता त्याचा स्वप्नासोबत त्यानेही जगाचा कायमचा
निरोप घेतला..!!

१००, १० आणि ५ रूपयांच्या च्या जुन्या नोटा होणार बंद...मार्च - एप्रिल महिन्यांपर्यंत १००, १० आणि ५ रूपयांच्या जुन्या सिरी...
22/01/2021

१००, १० आणि ५ रूपयांच्या च्या जुन्या नोटा होणार बंद...

मार्च - एप्रिल महिन्यांपर्यंत १००, १० आणि ५ रूपयांच्या जुन्या सिरीजच्या नोटा बंद होणार आहे. आरबीय कडून बँकांना तसे आदेश देण्यात आल्याचे समजते आहे. जुन्या सिरीजच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. बँकांकडे जसजसे १०० च्या जुन्या नोटा जमा होतील, पुन्हा ते चलनात आणण्यात येणार नाही. म्हणजेच बँकांकडून आता १००, १० आणि ५ च्या जुन्या नोटा लोकांना मिळणार नाही. ते बँकेकडेच राहतील. लोकांना नवीन चलनी नोटा मिळतील.

१० रूपयाची नाणी बद्दल अनेक गैरसमज आणि ते बाळगण्यबद्दल उदासीनता दिसून येते. १० रूपयाची नाणी यापुढे चलनात अधिक प्रमाणात आणून, त्यासाठी प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.

ओला - उबेरच्या ड्रायव्हर पासून सावधान...विशाल (प्रातिनिधिक नाव) - विशालला स्वारगेटहून लवकरात लवकर डिएसके विश्व धायरीला ज...
15/01/2021

ओला - उबेरच्या ड्रायव्हर पासून सावधान...

विशाल (प्रातिनिधिक नाव) -
विशालला स्वारगेटहून लवकरात लवकर डिएसके विश्व धायरीला जायचं होतं. पहिल्यांदाच तो या मार्गाने प्रवास करत होता. PMPML च्या सिटी बसने तो नऱ्हे गावात पोहचला. तिथून ठरलेल्या पत्त्यावर पोहचायला जास्त वेळ लागू नये म्हणून त्याने Ola ची आॅटो बूक केली. ग्रामपंचायत नऱ्हे ते डिएसके धायरी ४.५ किमी. अंतर होतं आणि प्रवासखर्च ६१ रूपये असा तपशील विशालला अॅपने दाखवला.

विशाल रिक्षात बसला, ड्रायव्हरला ओटीपी दिला. तेवढ्यात बॅटरी संपल्याने फोन बंद पडला. मार्गस्थ होताच ड्रायव्हरने आॅनलाईन पेमेंट करायला सांगितलं. 'बॅटरी डाऊन झाल्याने आपण आॅनलाईन पेमेंट करू शकत नाही.' असं विशालनं सांगितलं. पुढे ड्रायव्हर ने त्याला सबंधित एरियाबाबत विचारले असता, 'मी इथे नवा आहे' असं विशालनं सांगितलं.

साहजिकच ओला ड्रायव्हरला 'सावज' सापडलं आणि त्याने त्याचा रंग दाखवला. विशालला त्याने दोन अडीच किलोमीटर जास्तीचं अंतर फिरवलं. अडचणीच्या गल्ल्यातून आणि सर्व्हिस रोडनं रिक्षा चालवली. शेवटी विशाल आपल्या इच्छित स्थळी पोहचला तेव्हा ८८ रूपये झाले. कोणताही वाद न घालता त्याने ९० रूपये कॅश दिले. घरी आल्यानंतर विशालन ओलाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीनंतर ओलाने २७ रूपये कूपनच्या स्वरूपात विशालला परत केले आहेत.

परंतु असे ग्राहकांना फसवणारे ड्रायव्हर ग्राहकांसाठी तसेच ओलासाठीही धोकादायक असून, त्यांच्यात विश्वासार्हता नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशा आशयाचं सविस्तर ई - मेल विशालनं ओलाला लिहीलं आहे. तो ओलाच्या उत्तराची वाट पाहतोय पण अजूनही ओलाकडून उत्तर आलेलं नाही. ओलाला तिच्या ग्राहकांची खरंच काळजी आहे का ?

व्हॉट्स अॅपला फटका;टेलिग्रामच्या युजर्समध्ये मोठी वाढ... नवीन प्रायवसी पॉलिसी आणि युजर्सना गृहीत धरण्याचा उद्दामपणा व्हॉ...
14/01/2021

व्हॉट्स अॅपला फटका;
टेलिग्रामच्या युजर्समध्ये मोठी वाढ...

नवीन प्रायवसी पॉलिसी आणि युजर्सना गृहीत धरण्याचा उद्दामपणा व्हॉट्स अॅप च्या चांगलंच अंगलट येताना दिसत आहे. आपल्या नव्या प्रायवसी धोरणांबाबत व्हॉट्स अॅप ला वारंवार खुलासे करावे लागत आहे. अशा स्थितीत मात्र टेलिग्राम ने मोठी मजल मारली. टेलिग्रामच्या अॅक्टीव्ह युजर्स मध्ये झपाट्याने वाढ घडून आली आहे. दुसरीकडे सिग्नल अॅपचे युजर्स देखील वाढताना दिसत आहेत.

टेलिग्रामचे संस्थापक पॉवेल दुरोव्ह यांनी याबाबत माहिती दिली. "जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात टेलिग्रामचे ५० कोटी अॅक्टीव्ह युजर्स होते. दुसऱ्याच आठवड्यात ही संख्या तब्बल ५२.५० कोटी इतकी झाली."
युजरकडून डाटाच्या स्वरूपात फक्त मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट लिस्ट घेतले जाते, असा टेलिग्रामचा दावा आहे.

फोटो - गुगल

खाद्यतेलांचे भडकले भाव...लॉकडाऊन नंतर खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागणीच्या प्रमाणात तेलाचा पुरवठा कमी झ...
13/01/2021

खाद्यतेलांचे भडकले भाव...

लॉकडाऊन नंतर खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागणीच्या प्रमाणात तेलाचा पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या दरात फार मोठी वाढ झाली आहे. आपल्या देशात खाद्यतेल मोठ्या प्रमाणात इतर देशांतून आयात केले जाते. आयात करण्यात येणाऱ्या तेलाचे प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. सुर्यफुल तेल रशिया, युक्रेन मधून आयात केले जाते. युक्रेन मध्ये यावर्षी पीकांचे योग्य उत्पादन न झाल्याने आणि पीकांची कमतरता असल्याने, पर्यायाने तेल दरात मोठी वाढ झालेली आहे. सोयाबीनचे तेल अर्जेंटिनातून मागविले जाते परंतु तेथे कामगारांनी बंद पुकारल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. पाम तेल मलेशियातून मागविले जाते. पण सुर्यफुल आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याने, पाम तेलाचेही भाव वाढल्याचे दिसून येते.

खाद्यतेलांचे वर्षभरात वाढलेले दर
१)सुर्यफुल तेल -
*जानेवारी २०२० - भाव १४२० रू. ते १४८० रू.
*जानेवारी २०२१ - भाव १९८० रू. ते २०४० रू.

२)सोयाबीन तेल-
*जानेवारी २०२० - भाव १४२० रू. ते १५०० रू.
*जानेवारी २०२१ - भाव १९२० रू ते २००० रू.

३) पाम तेल -
*जानेवारी २०२० - भाव १३८० रू. ते १४३० रू.
*जानेवारी २०२१ - भाव १७८० रू. ते १८२० रू.

(सर्व दर १५ लिटर तेल)

अर्थसंकल्प आता डिजिटल स्वरूपात... देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांच्या इतिहासात, पहिल्यांदाच एक परंपरा खंडित हो...
12/01/2021

अर्थसंकल्प आता डिजिटल स्वरूपात...

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांच्या इतिहासात, पहिल्यांदाच एक परंपरा खंडित होणार आहे. यंदा अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा अर्थसंकल्पाची छापील परंपरा मोडून, ते पेपरलेस म्हणजेच डिजिटल स्वरूपात सॉफ्टकॉपीच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे.

अर्थमंत्रालयाच्या प्रिंटींग प्रेस मधून दर वर्षी अर्थसंकल्पाची छपाई होते. यासाठी शंभरहून अधिक कर्मचारी एकत्रित येऊन काम करतात. परंतु या वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे आणि संसर्गाची शक्यता टळावी, यासाठी अर्थसंकल्प सॉफ्टकॉपीच्या माध्यमातून वितरीत केले जाणार आहे.

अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर www.indiabudget.gov.in आणि www.indiabudget.nic.in या संकेतस्थळावर/वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

07/01/2021

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी -

शुक्रवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत व स्थापत्यविषयक दुरूस्तीची अतिआवश्यक कामे करण्यात येणार आहेत. म्हणून शुक्रवार दिनांक ८ जानेवारी रोजी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी (शनिवार दि. ९ जानेवारीला) उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

😊

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Just Statue posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Just Statue:

Share