03/06/2023
निसर्गाची अद्भुत रचना,
सह्याद्रीतील एक अत्यंत कठीण किल्ला,
🚩 मोरोशीचा भैरवगड 🚩
"ठाणे" जिल्ह्यातील "मुरबाड" तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी "मोरोशी" हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव आहे, दुरवरून पाहिल्यास एका उंच पठारावर निसर्गाची राकट परंतु सुंदर कलाकृती नजरेस पडते ती भैरवगडाच्या रूपाने, निसर्गाने निर्माण केलेली ही आगळीवेगळी भिंतचं,तिन्ही बाजूनी ताशीव कातळकडे
पूर्वेकडील बाजूस कातळात रचनात्मक पायऱ्या असलेला,यातल्या काही पायऱ्या आज उध्वस्थ स्वरूपात पहायला मिळतात,या पायऱ्यांवरून चढणे-उतरने मोठे आव्हान आहे, (येथे आपल्या साहसाची खरी परीक्षा होणार आहे) गडाच्या काही पायऱ्या तुटक स्वरूपात असल्यामुळे आपल्याला दोराच्या सहाय्याने जीव मुठीत घेऊनचं चढाई करावी लागते, एक-एक पायरी चढतांना मन इतिहासात रमतं आणि सह्याद्रीतल्या या अशा उंच ठिकाणी या निसर्ग भिंतीवर पूर्वजांनी कशाप्रकारे आपल्या कला-कौशल्याचे दर्शन घडवून आणले याबद्दल जाणून घेण्यासाठी मन अधिकचं उत्साहित होतं,परंतु खंत एव्हढीचं की त्या कलाकारचं नाव अज्ञातचं.
भैरवगडाच्या पायऱ्या कोणत्या काळात व कोणी उध्वस्थ केल्या याबद्दल अधिक माहिती मिळत नाही,पायऱ्या चढतांना अनेक गुहा बनवलेल्या आहेत, त्यांचा उपयोग विश्राम करण्यासाठी होतो,गडापर्यंत जाणारी वाट संपूर्ण झाडा-झूडूपांनी व्यापलेली असल्यामुळे चुकार वाटांचे दर्शन घडण्याची शक्यता असते.
थरारक आणि साहसिक अनुभवाचे दर्शन घडवणारा
किल्ला "मोरोशीचा भैरवगड" 🚩