KADAK RAO

KADAK RAO We Provide Valuable Content !! Just Follow US

08/06/2026

Manya Surve च्या Encounter नंतर त्याच्या Girlfriend चे पुढं काय झालं ? | Mumbai Underworld | Kadak Rao



20/05/2026

जशी Narendra Modi यांची इमेज बनवली आता BJP तेच Devendra Fadnavis यांच्यासाठी करतंय | Kadak Rao

देवेंद्र फडणवीस हे वरून खाली आलेलं नेतृत्व आहे. तळगाळातून वर गेलेलं नाही. त्यांना विशिष्ट जातीचं प्रीव्हीलेज मिळालंय. त्यांचं राजकारण महाराष्ट्रात जास्त काळ तग धरू शकत नाही. असा आरोप २०१४ पासून महाराष्ट्रातले अनेक राजकीय जाणकार करत होते. तिथपासून आता देवेंद्र फडणवीस देशाचे नवे पंतप्रधान होतील इथपर्यंतचा प्रवास घडवून आणला फडणवीसांनी. ते महाराष्ट्राच्या राजकीय बुद्धिबळाचे 'खेळाडू' नाहीत तर 'ग्रँडमास्टर' आहेत असं त्यांचे समर्थक म्हणतात. नो डाऊट त्यांच्या दिमतीला शासकीय यंत्रणा आहेत, केंद्रसरकारच पाठबळ आहे पण फक्त एवढ्या गोष्टींच्या जीवावर शरद पवार यांच्यासारख्या महाबलाढ्य राजकारण्याला चार चार वेळा शह देणं आणि सध्या महाराष्ट्रातील कित्येक पक्ष, नेते, संस्था, त्यांचे कारभार आपल्या अधिपत्याखाली आणणे ही खायची गोष्ट नाही. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तुकडे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक मोठा भूकंप हा फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावरच डिझाईन झाल्याचं राजकीय तज्ञ सांगतायत. आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं पानही त्यांच्या मर्जीशिवाय हलत नाही. ही एवढी ताकद महाराष्ट्र भाजपमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर फक्त फडणवीसांना मिळालेली आहे. शरद पवार कधीकाळी याच स्टेजवर होते. यामुळेच आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण हा प्रश्न पडला तेव्हा एकच नाव ताकदीने समोर यायला लागलं. खरं तर हा प्रश्न संघाने मागच्या चार वर्षात सोडवलेला आहे. काय म्हणालात ? अमित शाह ? योगी आदित्यनाथ ? अंहं, देवेंद्र गंगाधर फडणवीस. भविष्यातील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतला 'डार्क हॉर्स. पण असं का ? एक ब्राह्मण नेता जो मराठा बहुल महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनतो, ५ वर्षे टिकतो आणि त्यानंतर संपूर्ण राजकारण आपल्या बोटांवर नाचवतो. आपल्याभोवती सेंट्रलाईज करतो. फक्त इतकंच नाही, याव्यतिरिक्त ही त्यांच्यात असं खूप काही आहे जे त्यांना थेट पंतप्रधानपदाचे दावेदार बनवू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टींच्या तळाशी जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

16/05/2026

त्यादिवशी बाळासाहेबांनी राज ठाकरेंना मातोश्रीवर म्हणजे शिवसेनेतच थांबवून घेतलं असतं तर ? एक प्रश्न. फक्त एक प्रश्न. ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलली असती.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले असते का ? बंडखोरी झाली असती का ? उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेला जो बॅकफायर बसला तो बसला असता का ? महाराष्ट्रात तीन - तीन सेना अस्तित्वात आल्या असत्या का ? महाराष्ट्राला इतक्या युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या असत्या का ? दोन तळगाळात पोहोचलेले महाराष्ट्राचे तगडे पक्ष नेस्तनाबूत होऊन आज भाजपच्या वळचणीला गेलेले दिसले असते का ? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न — आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असते ? या प्रश्नाची उत्तर शोधताना आपल्याला जावं लागेल मातोश्रीच्या त्या बंद दरवाजांमागे. जिथं बाळासाहेबांसमोर काही घटना घडल्या होत्या आणि त्या एका रात्रीने महाराष्ट्राचं राजकारण १८० डिग्रीत चेंज झालं. ज्याचे परिणाम आजच्या महाराष्ट्राला भोगावे लागतायत. मित्रांनो हा फक्त एक साधा राजकीय किस्सा नाहीये. ही गोष्ट आहे त्या रात्रीची जिने महाराष्ट्राचे दुसरे बाळासाहेब घडू दिले नाहीत, अनेक राजकीय जाणकार सांगतात शिवसेना राज यांच्या ताब्यात असती तर कधीच फुटली नसती, त्यांनी भाजपवर पण बाळासाहेबांसारखाच वचक ठेवला असता. पण कसा, चला पहिल्यापासून सुरू करू... व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत...

13/05/2026

मराठी पोरं बिंदासपणे Corporate नोकऱ्या सोडून गावाकडे राहायला का येऊ शकतात ? त्यांच्यात हिंमत येते कुठून ? | Kadak Rao

" आरं गरज नाही तुझ्या कामाची, लग्नाचा प्रश्न नसता तर तुझ्याकडं कामच केलं नसतं. आजच्या आज आपला हिशोब मांडायचा. घरी जाऊन शेण काढीन पण तुझा तोरा ऐकून घेणार नाही. " हे असे डायलॉग अन महाराष्ट्राची पोरं हे तिखाटजाळ समीकरण. युपी बिहाऱ्यासारखे मान मोडून आपल्या पोरांना जगता येत नाही. गुजरात्यांसारखं लांगूलचालन करून फुशारक्या मारता येत नाहीत. आपलं पोरगं मुंबई आसू, पुणे आसू निदान दिल्ली बँगलोर, कदाचित फॉरेन सुद्धा, ऑफिस ते एमआयडीसी त्यो एकदम ताठ मानेनं राहतं, इज्जत द्याल तर इज्जत घ्याल या तत्वावर प्रामाणिकपणे काम करतं. जोवर सहन होतंय तोवर तो ऑफिसमधले सगळे अपमान, बॉसचे टोमणे, ऑफिस पॉलिटिक्स, लफडी, ओव्हरटाईम सगळं मुकाट सहन करतं. पण जेव्हा गोष्ट स्वाभिमानावर येते तेव्हा एका झटक्यात नोकरीवर लाथ मारून गावची वाट धरण्याची तयारी ठेवतंय. ह्यो असतोय अस्सल महाराष्ट्रीयन तोरा. आता भले त्याचे काहीही फायदे तोटे असोत पण ह्यो स्वाभिमान कुठं इकत मिळत नाही. त्यो पिढ्यानपिढ्या मराठी पोरांच्या डीएनएमध्ये मुरलेला आहे छ. शिवाजी महाराजांच्या रूपात. हा स्वाभिमान आणि भिडस्तपणा गावच्या काळ्या मातीशी दोन हात केल्यावर येतो. बाप नावाचा आधार आपल्यामागं, आपल्यासाठी आहे हा विश्वास असल्यावर येतो. म्हणून तर खिशात पुढच्या महिन्याचं भाडं देण्याचे पैसे नसताना, मोबाईलचे हफ्ते थकलेले असताना सुद्धा तो एका दणक्यात राजीनामा देऊन बाहेर पडतो. पण ही अशी एका फटक्यात 'नोकरीला लाथ मारण्याची' हिंमत मराठी पोरांच्यात येते कुठून ? हा केवळ त्यांचा रागीटपणा किंवा रगेलपणा नाहीये, यामागं शेकडो वर्षांचा इतिहास, एक विशिष्ट प्रकारची सामाजिक जडणघडण, शेतीची नाळ आणि रक्तात भिनलेला 'मराठी बाणा' आहे. आता हे सगळं कसं बैजवार समजावून घेऊ....

01/05/2026

शारदाबाई पवार शरद पवारांपेक्षा धुरंदर राजकारणी होत्या....

एका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानंतर आणखी काही वर्षांनी हातातोंडाशी आलेल्या तिसऱ्या मुलाचा ऐन पस्तीशीत खून, अशा एखाद्या आईच्या काळजावर वार करणाऱ्या घटना. पण यातून ही स्वत:ला सावरत एक बाई जिद्दीनं शिकते, लोकल बोर्डात सलग 14 वर्षे सदस्य राहते, वेगवेगळ्या कमिट्यांचं नेतृत्व करते, शेती करते, अकरा-बारा मुलांना प्रसंगी अंगावरचे दागिने विकून शिकवते. इतकं शिकवते की तिचा एक पोरगा गेली 60 वर्षे भारताच्या राजकारणात राहून वेगवेगळे कायदे संमत करण्यासाठी पुढाकार घेतो. शेतकऱ्यांचं जगणं सुखकर करतो. कुणालाही वरवर ही एखाद्या सिनेमाची संघर्षमयी कथा वाटेल. पण हे जगणं जगलंय, अविरत भोगलंय त्या आईनं. शारदाबाई गोविंदराव पवार हे नाव आहे त्या रणमर्दिनीचं जिने शरद पवार नावाचं झंझावाती वादळ या देशाला बहाल केलं. शरद पवार कधीच त्यांच्या आई इतके धुरंदर राजकारणी होऊ शकत नाहीत. पण हे सुद्धा खरं आहे की शरद पवार खऱ्या अर्थाने त्यांच्या आईचे लेक शोभतात. ही गोष्ट आहे त्या रणरागिणीची जिने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी आणि विकासवादी विचार जनमाणसांत रुजवला. शारदाबाई फक्त शरद पवार यांच्या आई होत्या म्हणून ग्रेट ठरत नाहीत. शारदाबाई म्हणजे ती तळपती तलवार जिच्या उजेडात अनेकांना आपल्या आयुष्याचे मार्ग दिसले. चला तर मग त्यांचा प्रवास सुरुवातीपासून सुरू करू...

भावाचा शो हाय..उपस्थिती अनिवार्य आहे.....शो चुकवाल तर फसाल चांगभलं - The Voice of Dakkhan
28/04/2026

भावाचा शो हाय..
उपस्थिती अनिवार्य आहे.....

शो चुकवाल तर फसाल

चांगभलं - The Voice of Dakkhan

26/04/2026

रिजर्व बँक ऑफ इंडिया ते महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड Babasaheb Ambedkar यांनी देशातल्या कोणकोणत्या संस्था उभ्या केल्या ? | नेमकी कशाकशावर बाबासाहेबांची सही आहे ?

बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिलं नाही. बाबासाहेबांनी एका सामान्य कामगाराच्या मताला देशाच्या पंतप्रधानाच्या मताएवढी किंमत मिळवून दिली. एका चहावाल्याला पंतप्रधान होण्याचा फक्त कॉन्फिडन्स नाही तर हक्क दिला. डॉ. बाबासाहेबांचा ग्रेटनेस फक्त एका पुस्तकात कैद केला जाऊ शकत नाही. बाबासाहेब ही क्रांतीची, विद्रोहाची, हक्काची, जिद्दीने लढणाऱ्याची, शिकून आपली परिस्थिती बदलणाऱ्या प्रत्येकाच्या मनातली आगय. अशी माणसं धर्म वाचवण्यासाठी अवतार घेत नसली तरी जन्मल्यावर माणूसकी वाचवण्यासाठी नक्की प्रयत्न करतात. आता खरं तर लोकशाहीमध्ये राहत असलेल्यांना बाबासाहेब आंबेडकर का ग्रेट होते असा प्रश्न पडला नाही पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा इम्पॅक्ट ग्लोबलय. पण बाबासाहेबांना एका समाजापुरतं बांधून ठेवणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ, बाबासाहेब का ग्रेट होते ? चला तर मग सुरू करू....

25/04/2026

उपवर्गीकरण कुणासाठी घातक, महार की मांग ?

महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आणि महाराष्ट्रात महार विरुद्ध मातंग असा संघर्ष उभा राहिलाय. त्याचं झालं असं सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (ST) आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल दिला. मात्र, या निर्णयानंतर महाराष्ट्रात एक मोठा 'उद्रेक पाहायला मिळत आहे. विशेषतः बौद्ध समाजामध्ये तीव्र असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने बौद्ध समाजात SC आणि ST या दोन्ही प्रवर्गांसाठी परवानगी दिली असताना, महाराष्ट्र सरकार केवळ अनुसूचित जातींच्याच (SC) उपवर्गीकरणाचा अट्टाहास का करत आहे ? असा सवाल तज्ञ लोक करत आहेत. या निर्णयामुळे हा असंतोष केवळ भावनिक नसून त्यामागे आरक्षणाच्या मूळ संविधानिक संरचनेत होणारे बदल आणि भविष्यातील धोके कारणीभूत आहेत असं अभ्यासक सांगत आहेत. परिणामी महाराष्ट्रात 'उपवर्गीकरण' म्हणजे नेमकं काय, हे विभाजन संविधानाला धरून आहे का, आणि यामुळे सामाजिक ऐक्याला तडा जाणार का ? बौद्ध समाजातील मुलांचं भविष्य धोक्यात आलंय का ? आधी ब्राम्हण विरुद्ध मराठे लढवून झाले, मराठे विरुद्ध ओबीसी लढवून झाले, मराठे विरुद्ध धनगर देखील लढवून झाले आणि आता बौद्ध विरुद्ध मातंग अशी नवी संघर्षाची लाट महाराष्ट्रात उभी केली जातेय का ? आपली खुर्ची राखण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा सरकार अवलंब करताना दिसतंय. आता या प्रश्नाच विश्लेषण आज आपण एका घटनात्मक दृष्टिकोनातून करणार आहोत..

मित्रांनो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजावरील जन्मजात गुन्हेगारीचा ठपका पुसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणलं त्या बाबासाहेबांचे विचार सोडून मातंग समाजातील अनेक तरुण तरुणी आता पुन्हा एकदा वैदिक धर्माचं समर्थन करणाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसलेला दिसतोय. असो हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. तर हा वाद सुरू कसा झाला त्याची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊ. महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केलाय. सरकारने आता त्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन केली आहे. मांग किंवा मातंग समाजाची 'लहुजी शक्ती सेना' अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे की आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा एकाच जातीने घेतला असून आम्ही अजूनही वंचित आहोत. मातंग आणि इतर छोट्या समाजाच्या मते ​'गेल्या ७० वर्षात १३% आरक्षणातील ८०% पेक्षा जास्त जागा केवळ एकाच प्रगत जातीने घेतल्या.' ​त्यांच्या मते, जे 'अति-मागास' आहेत, ज्यांची शैक्षणिक अवस्था आजही बिकट आहे, त्यांना स्वतंत्र आरक्षणाशिवाय संधी मिळणार नाही. 'ज्यांची लोकसंख्या जास्त, त्यांना जास्त वाटा' हे सूत्र त्यांनी मांडलं." पण बौद्ध समाजाला हे उपवर्गीकरण म्हणजे निव्वळ फुटीच राजकारण वाटतय....

24/04/2026

महार समाज नसता तर महाराष्ट्राचं काय झालं असतं ?
महारांनी महाराष्ट्राला काय काय दिलं ?

महार एक असा समाज जो एकेकाळी इथला राजा होता. तमाम जमिनीचा, जंगलाचा मालक होता. इथला खरा भूमिपुत्र होता. हे सर्व नागवंशी म्हणजेच मूळनिवासी लोक गणराज्य चालवत होते. त्याच्या शब्दाला धार होती आणि समाजात मान होता. त्याच्याशिवाय गावचं भांडण मिटायचं नाही. भले भले लोक त्याच्या नादाला लागताना 10 वेळा विचार करायचे. ते समता आणि मानवतावादी धम्माचं रक्षण करायचे. पण पुढं त्याच्यासोबत मोठा दगाफटका झाला आणि हा शक्तिशाली महार समाज थेट गावाच्या वेशीबाहेर फेकला गेला ? पण त्याला गावकुसाबाहेर काढण्यासाठी कुणी आणि कसं षडयंत्र रचलं होतं ? दरम्यान अगणित अत्याचार सोसून, गळ्यात मडकं, कमरेला झाडू बांधून हिंडणाऱ्या या समाजाने पुन्हा कसा या भारतभूमीला एकसंध ठेवणारा संविधाननिर्माता युगपुरुष दिला ? कसं या समाजाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं रक्षण केलं ? कसं या समाजाने भीमा-कोरेगावच्या रणांगणात पेशव्यांना धूळ चारली ? हा महार समाज कसा तयार झाला ? त्याने महाराष्ट्रासाठी काय काय केलं ? महाराष्ट्राला त्याने काय काय दिलं ? त्याची उत्पत्ती काय ? संघर्ष काय ? आणि स्वराज्य ते महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान काय ? महाराष्ट्राचं नाव महार समाजावरून पडलंय का ? मराठा आणि महार यांचे संबंध काय ? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून…

22/04/2026

साताऱ्यात पहिल्यांदाच !!!

हा आस्वाद परत मिळणार नाही...

श्रीकृष्णाच्या नजरेतून

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KADAK RAO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share