
03/08/2025
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना
बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माजी खासदाराचा ड्रायव्हर कार्तिक एन. याने न्यायालयात सांगितलं की,
त्याला प्रज्वलच्या मोबाईलमध्ये 2,000 हून अधिक अश्लील फोटो आणि 40-50 लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओज आढळले होते.