08/04/2025
खरंच!! महाराष्ट्रात होणार नवीन जिल्हे? जाणून घ्या..
आपले महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. जिथे सध्या 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. मात्र राज्यात नवीन जिल्ह्यात तयार करण्याचा निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा 26 जानेवारी 2025 रोजी होणार होती, मात्र काही तांत्रिक बाबीमुळे ते पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमकी यामागे काय सत्यता आहे? ते आपण जाणून घेणार आहोत..
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली. तेव्हा महाराष्ट्र मध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. मात्र काही काळ गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा राज्यात 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. सुरुवातीला 1981 मध्ये जालना व सिंधुदुर्ग जिल्हा, 1982 मध्ये लातूर व गडचिरोली जिल्हा 1990 मध्ये मुंबई उपनगर जिल्हा, 1998 मध्ये वाशिम आणि नंदुरबार जिल्हा, 1999 मध्ये हिंगोली व गोंदिया जिल्हा आणि 2014 मध्ये पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची कोकण-पुणे-नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती आणि नागपूर अशा एकूण सहा विभागात विभागणी केलेली आहे. मात्र महाराष्ट्रात आणखी 21 जिल्हे निर्माण होणार असल्याचा माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. मग महाराष्ट्र मध्ये नेमके कोणकोणते जिल्हे अस्तित्वात येणार? असला तरी याची माहिती आपण पुढे पाहूया..
लातूर आणि नांदेड जिल्यातुन उदगीर जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्या नगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे जिल्हे, जळगाव मधून भुसावळ जिल्हा, बीडमधून अंबेजोगाई जिल्हा, नाशिक मधून कळवण आणि मालेगाव जिल्हा, नांदेड मधून किनवट जिल्हा, ठाण्यातून कल्याण व मीराबाई हे जिल्हे, सांगली सातारा व सोलापूर मधून मानदेश हा जिल्हा, बुलढाणातुन खामगाव जिल्हा तर पुण्यातून बारामती हा जिल्हा, यवतमाळमधून पुसद जिल्हा, अमरावतीमधून अचलपूर जिल्हा, भंडारा साकोली हा जिल्हा, रायगड मधून महाडा जिल्हा तर गडचिरोलीमधून आहेर या जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, कायदेशीररीत्या एक जिल्हा निर्माण करण्यासाठी गव्हर्मेंटला त्यासाठी करोडो रुपये करावे लागतात. कारण साधारणपणे नवीन जिल्ह्यात आरटीओ कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय कृषी कार्यालय, महावितरण व परिवहन परिमंडळ कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राज्य परिवहन मंडळ कार्यालय आणि अतिरिक्त सत्र कार्यालय याव्यतिरिक्त अनेक कार्यालय सरकारला निर्माण करावी लागतात. तसेच कार्यालय कोणत्या ठिकाणी होतील? यावर अनेक मतभेद देखील होत असतात. तसेच दुसरीकडे काही लोक असे देखील वाढत आहेत की नवीन जिल्हा निर्मिती बाबत त्यावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नाही.
तर यावर तुमचे काय मत आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..