News Network 360 Marathi

News Network 360 Marathi news network 360 (न्यूज नेटवर्क 360) is a 24-hour Marathi news channel in India. The Pune-based company was launched on 03 November 2021.

🚨 ब्रेकिंग न्यूज
🏛️ राजकारण
🚔 गुन्हे
🏙️ स्थानिक प्रश्न
⚖️ कायदे व नागरिक हक्क

📢 तुमच्या परिसरातील बातमी, समस्या किंवा घडामोड आमच्यापर्यंत पोहोचवा.

📱 बातमी, फोटो किंवा व्हिडिओ पाठवा:
[9529028633]

📰 News Network 360 The channel is owned by news network 360. news network 360 is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories,crime, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on news network 360 in Marathi language. The vision of the channel promises to keep each individual ahead and informed. news network 360 is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

21/09/2026

पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या गणपतीची भव्य आरास!
तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाकडून यंदा तुळजापूरच्या देवीच्या मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. भक्ती, परंपरा आणि कलाकुसरीचा सुंदर संगम असलेला हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या यंदाच्या देखाव्याची खास झलक!



Keywords
Tambdi Jogeshwari Ganpati, Tambdi Jogeshwari Ganpati 2026, Manacha Dusra Ganpati, Pune Ganeshotsav 2026, Pune Ganpati Festival, Ganpati Decoration Pune, Ganpati Pandal Pune, Tuljapur Devi Temple Decoration, Tulja Bhavani Temple, Tuljapur Temple Theme, Ganpati Decoration 2026, Pune Ganpati Darshan, Famous Ganpati Mandals in Pune, Manache Ganpati Pune, Ganeshotsav Pune, Maharashtra Ganeshotsav, Pune Festival Reels

21/09/2026

मी नास्तिक आहे, आणि मला ह्या देखाव्यांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही गणेशउत्सव लांबची गोष्ट - विद्यानंद बापट



(Vidyanand Bapat, Vidyanand Bapat statement, मानाचे गणपती, पुण्यातील मानाचे गणपती, Ganpati Mandal Pune, Pune Ganpati Festival, Ganeshotsav Pune, Ganpati Visarjan Pune, Ganpati procession Pune, Pune Ganpati Mandals, Vidyanand Bapat latest statement, Bapat on Ganpati procession, Pune Ganeshotsav controversy, Ganpati immersion procession, Pune Ganpati news, Maharashtra Ganpati news, Pune festival news, Marathi news, News Network 360 Marathi)

पवना नदी प्रदूषण प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत ३ औद्योगिक युनिट्स आणि १ बांधकाम व्यावसायिक प्रद...
21/09/2026

पवना नदी प्रदूषण प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत ३ औद्योगिक युनिट्स आणि १ बांधकाम व्यावसायिक प्रदूषणासाठी जबाबदार आढळल्याचा अहवाल समोर आला आहे. संबंधितांवर सुमारे ₹२.७५ कोटींची पर्यावरण नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली असून अहवाल राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर करण्यात आला आहे.

याच धर्तीवर PCMC हद्दीतील पवना नदी प्रदूषणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक तपासणी करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी NGT समोर करण्यात येणार असल्याची माहिती अर्जदार अॅड. कृणाल घारे यांनी दिली. औद्योगिक डिस्चार्ज, सांडपाणी, STP ची कार्यक्षमता आणि प्रमुख प्रदूषण स्रोतांची तपासणी करण्याचीही मागणी करण्यात येणार आहे.



(Pawana River Pollution, Pavana River Pollution, PCMC News, PCMC Pollution News, MPCB Action, Maharashtra Pollution Control Board, NGT Pawana River Case, National Green Tribunal, Environmental Damage Compensation, Pawana River NGT Case, Pune River Pollution, Pimpri Chinchwad Pollution, Industrial Pollution PCMC,)

21/09/2026

कसबा गणपतीच्या दरबारात आकर्षक सजावट, नेत्रदीपक रोषणाई आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम पाहायला मिळतोय. शांत आणि तेजस्वी रूपात विराजमान बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला आहे.

तुम्हाला कसब्याच्या बाप्पाचं हे रूप आणि सजावट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा.



(Kasba Ganpati Pune, Kasba Ganpati Decoration, Kasba Ganpati 2026, Pune Ganeshotsav, Pune Ganpati Decoration, Ganpati Bappa Morya, Kasba Ganpati Darshan, Pune Ganesh Festival, Kasba Peth Ganpati, Pune Festival News, Ganeshotsav Pune, News Network 360 Marathi)

21/09/2026

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी इन्फ्लुएन्सर महेश मोटे याला पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. त्याच्या चेहऱ्याला काळी शाई फासून, डोक्यावर चप्पल ठेवून उठबश्या काढायला लावल्या आणि राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार घालून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले."राज साहेबांबद्दल किंवा मनसेबद्दल अशी भाषा वापरल्यास यापुढेही जशास तसे उत्तर दिले जाईल," असा कडक इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.



Mahesh Mote, Raj Thackeray, MNS Pune, Mahesh Mote Viral Video, MNS Controversy, Pune Political News, Raj Thackeray Reel Controversy, Pune Viral News, Maharashtra Politics, News Network 360 Marathi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात कौटुंबिक स्थैर्याचे आणि माणसाच्या आयुष्यात पत्नीच्या महत्त्वाची मांडणी...
21/09/2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात कौटुंबिक स्थैर्याचे आणि माणसाच्या आयुष्यात पत्नीच्या महत्त्वाची मांडणी करताना हे अत्यंत मार्मिक वक्तव्य केले आहे. बाहेरच्या जगात कितीही मोठे साम्राज्य उभे करायचे असेल, तर घरात शांतता आणि जोडीदाराची खंबीर साथ असणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या खास शैलीत पटवून दिले.



(Nitin Gadkari, Nitin Gadkari Speech, Nitin Gadkari Latest News, Nitin Gadkari Family Statement, Nitin Gadkari Wife Importance, Nitin Gadkari Marriage Advice, Family Stability, Importance Of Wife In Life, Married Life Advice, Family Values India, Life Lessons Nitin Gadkari, Nitin Gadkari Viral Statement, Maharashtra Political News, Marathi News, News Network 360 Marathi)

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने एक अत्यंत मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरिराविरुद्ध...
21/09/2026

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने एक अत्यंत मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरिराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असलेला आणि मागील दोन महिन्यांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार असलेला ५० वर्षीय आरोपी अवालु जाफर इराणी याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीवर खडकी येथील पाटील इस्टेट भागात एका फिर्यादीला घरातून ओढून आणून लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करणे, कपडे फाडणे आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पॉक्सो (POCSO) व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होता. गुन्हा केल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देऊन फिरत होता. गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, हा आरोपी सध्या पुणे कॅम्पमधील साहिल हॉटेलच्या समोर निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून थांबला आहे. बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने कॅम्प भागात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सतर्क स्टाफने त्याला कोणतीही संधी न देता जागेवरच झडप घालून पकडले. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडकी पोलीस स्टेशनच्या हवाल्यात करण्यात आले आहे.



Pune Crime Branch, Pune Crime Branch Unit 1, Khadki Police Station, Aval Jafar Irani Arrest, Pune Camp Crime News, POCSO Case Pune, Pune Police Arrest, Absconding Accused Arrested Pune, Patil Estate Khadki Crime, Pune Crime News, Crime Branch Unit 1 Pune, Deepak Lagad Pune Police, Pune Camp Sahil Hotel, Khadki Crime News, Pune Latest Crime News, Maharashtra Crime News, News Network 360 Marathi

पुणे | बालेवाडी : बालेवाडी परिसरात मैदानाजवळ कारमध्ये बसून मद्यपान करत असल्याचे पाहून एका महिलेने दोन तरुणांना हटकले. त्...
20/09/2026

पुणे | बालेवाडी : बालेवाडी परिसरात मैदानाजवळ कारमध्ये बसून मद्यपान करत असल्याचे पाहून एका महिलेने दोन तरुणांना हटकले. त्यानंतर वाद वाढत गेला आणि संबंधित महिलेच्या अंगावर कार घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बाणेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे दिनेश दशरथ बिरादार (वय 23) आणि प्रशांत नवनाथ भोंडवे (वय 25) अशी असून दोघेही बालेवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वानाला फिरवण्यासाठी गेल्या असताना वादाची सुरुवात

या प्रकरणी मनीषा संजय भंडारी (वय 46) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या आपल्या श्वानाला फिरवण्यासाठी बालेवाडीतील दसरा चौक परिसरात गेल्या होत्या.

त्या वेळी परिसरात उभ्या असलेल्या एका कारमध्ये दोघे तरुण बसले होते. भंडारी यांचा श्वान कारजवळ गेल्यानंतर संबंधित तरुणांनी तो चावतो का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी श्वान चावत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर कारमध्ये मद्यपान सुरू असल्याचे दिसल्याने भंडारी यांनी ‘ही दारू पिण्याची जागा नाही’ असे सांगून तेथून पुढे गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

परतल्यानंतर कारने धडक दिल्याचा आरोप

श्वानाला फिरवून परतल्यानंतर भंडारी जवळील एका कार्यालयाजवळ बसल्या होत्या. त्यावेळी कारमधील तरुण मोठ्या आवाजात गाणी लावत बसले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर कार चालवत ती थेट त्यांच्या दिशेने आणण्यात आली आणि त्यांना जोरदार धडक देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने शिवीगाळ करत धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हात-पायाला गंभीर दुखापत

या घटनेत मनीषा भंडारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर बाणेर पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाणे करीत आहेत.



(Balewadi Car Attack Case, Baner Police Crime News, Pune Woman Car Attack, Balewadi Pune Crime, Dinesh Biradar Pune, Prashant Bhondve Pune, Manisha Bhandari Case, Attempt To Murder Pune, Pune Crime News, Balewadi Dasara Chowk Incident, Baner Police Arrest, Pune Latest Crime News, Maharashtra Crime News, News Network 360 Marathi)

पुणे : उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करत तब्बल 5,053 पानांचे दोषारोपपत्...
20/09/2026

पुणे : उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करत तब्बल 5,053 पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनला लोहगडावर बोलावण्यासाठी ‘माही’ नावाचे बनावट Instagram खाते तयार करण्यात आले होते. सिया गोयलचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा आणि तिला सरप्राईज देण्याचा बहाणा करून केतनला लोहगडावर नेण्यात आल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोहगडावर दरीजवळ गेल्यानंतर सिया गोयल हिने केतनला ढकलले, तर चेतन चौधरी याने लाथ मारल्याने केतन दरीत कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे वाटत असताना पुढील तपासात हा प्रकार नियोजित खून असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

18 जून रोजी झाला होता केतनचा मृत्यू

उद्योजक केतन विशाल अग्रवाल (वय 25) यांचा 18 जून रोजी लोहगड परिसरात दरीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया प्रवीण गोयल आणि चेतन बाबुलाल चौधरी यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात रितेश संजय हिंगे यालाही अटक करण्यात आली.

फेक Instagram अकाउंट तपासात ठरलं महत्त्वाचं

पोलिसांच्या तपासात ‘माही’ नावाने बनावट Instagram खाते तयार करण्यात आल्याचे समोर आले. या खात्याद्वारे केतनशी संपर्क साधून त्याला लोहगडावर बोलावण्यात आल्याचा आरोप आहे.

हत्यानंतर हे बनावट खाते डिलीट करण्यात आले होते. तसेच आरोपींनी आपापसातील चॅटिंग आणि कॉल रेकॉर्ड नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

डिजिटल फॉरेन्सिकमधून डिलीट डेटा पुन्हा मिळवला

या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिलीट करण्यात आलेला डेटा पुन्हा मिळवल्याचे सांगितले आहे. त्यातून Instagram अकाउंट, चॅटिंग, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांचा माग काढण्यात आला.

या पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

सिया, चेतन आणि रितेशविरुद्ध दोषारोपपत्र

पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्याविरोधात 5,053 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात डिजिटल पुरावे, सायबर फॉरेन्सिक माहिती, तांत्रिक पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालांचा समावेश करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



(Ketan Agarwal Murder Case, Ketan Agarwal Chargesheet, Ketan Agarwal Lohgad Case, Mahi Fake Instagram Account, Siya Goyal Ketan Agarwal, Chetan Chaudhary Ketan Agarwal, Ritesh Hinge Case, Pune Rural Police Chargesheet, Lohgad Murder Case, Pune Crime News, 5053 Page Chargesheet, Digital Forensic Pune Police, Cyber Evidence Ketan Agarwal, Vadgaon Maval Court, News Network 360 Marathi)

पुणे | वाघोली : वाघोली परिसरातील बहुतांश गणेश मंडळांचे विसर्जन नवव्या दिवशी होत असल्याने पुणे-अहिल्यानगर रोडवर मोठी वाहत...
20/09/2026

पुणे | वाघोली : वाघोली परिसरातील बहुतांश गणेश मंडळांचे विसर्जन नवव्या दिवशी होत असल्याने पुणे-अहिल्यानगर रोडवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 23 सप्टेंबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंत वाघोली परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी पुणे-अहिल्यानगर रोडवरील काही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

खासगी ट्रॅव्हल्स, कामगार बसेस आणि जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

पुण्यातून नगर रोडमार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसेसनी सादलधाबा चौक–चंद्रमा चौक–विश्रांतवाडी–आळंदी–शिक्रापूर या मार्गाचा वापर करावा.

नगर रोडमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसेसनी शिक्रापूर–चाकणमार्गे मुंबई असा पर्यायी मार्ग वापरावा.

नगर रोडने पुणे शहरात येणाऱ्या बसेसनी लोणीकंद–थेऊर फाटा–केसनंद गाव–थेऊर फाटा–सोलापूर रोड या मार्गाने पुढे जावे.

अहिल्यानगरकडून पुण्याकडे येणाऱ्या हलक्या चारचाकी वाहनांनी थेऊर फाटा–लोणीकंद–केसनंद–थेऊर गाव–थेऊर फाटा–सोलापूर रोड या मार्गाचा वापर करावा.

पुण्याकडून शिरूर आणि अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडी गावमार्गे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सुरभी माथा, लोणीकंद येथून पुढे इच्छित स्थळी जावे.

वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणेश विसर्जन शांततेत आणि सुरळीत पार पडावे तसेच परिसरातील वाहतूक नियंत्रणात राहावी, यासाठी नागरिकांनी जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



(Wagholi Traffic Diversion, Wagholi Ganesh Visarjan 2026, Pune Nagar Road Traffic Diversion, Pune Ahilyanagar Road Traffic, Pune Traffic Update, Wagholi Ganpati Visarjan Route, Pune Ganeshotsav Traffic, Nagar Road Diversion Pune, Pune Traffic Police Update, Wagholi Traffic News, Pune Ganesh Visarjan News, Pune City Traffic, Shirur Road Traffic Diversion, News Network 360 Marathi)

Address

Koregaon Park
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Network 360 Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share