17/07/2023
2018 साली lust stories anthology Netflix वर रिलीज झाली होती.
Lust म्हणजे काम वासना, एखाद्या व्यक्तीच्या काम वासनेची पूर्तता या धाग्याला धरून या फिल्म मध्ये चार वेगवेगळ्या कथा एकत्रित आणल्या होत्या. त्याचाच दूसरा भाग 5 वर्षांनी रिलीज झाला आहे. पहिल्या भागा प्रमाणेच दुसऱ्यातही काम वासना या धाग्यात चार कथा विणल्या आहेत. परंतू भाग एकच्या तुलनेत ही माळ विस्कटलेली दिसते. R बाल्की, कोंकनासेन शर्मा, सुजोय घोश व अमित शर्मा यांनी या चार वेळावेगळ्या कथांचे दिग्दर्शन केलेले आहे. या चार ही कथांची मांडणी उत्तम रित्या केलेली आहे. मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, अंगद बेदी, अमृता सुभाष, तिलोत्तमा शोम, विजय वर्मा, तमन्ना भाटीया, काजोल आणि कुमुद मिश्रा असे उत्तम कलाकार प्रमुख भूमिकेत असुन प्रत्येकानी दमदार भूमिका वटवल्या आहेत. परंतु मुख्य म्हणजे lust ही जी काय थीम आहे ती थीमच यातिल काही कथांनमध्ये मिसिंग वाटते. यातील the mirror ही कोकणा सेन ने दिग्दर्शीत केलेली कथा सर्वात उत्तम आहे. R. Balki यांची Made for each other समाधानकारक आहे. S*x with Ex ही कथा murder mystery तर तीलचट्टा ही Revenge drama आहे. या दोन्ही Stories मध्ये लस्ट मिसिंग आहे. ... ओढून ताणून lust stories चा भाग बनवला असं वाटतं. असे असले तरी सर्वांचा अभिनय दमदार आहे, music आणि विजूअल्स उत्तम आहेत. आणि ott वर उपलब्ध असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार एकदा बघायला काही हरकत नाही.
Shivaji Karde
D. Ganesh NarayanD. Ganesh Narayan Ganesh Narayan
Vikram Bolegave
Ram Satish Ram Satish Govindwad.Ram Satish Govindwad.
Anand Mansuk
...