The Karbhari

The Karbhari पुणे महापालिका तसेच राजकीय, नागरी प्रश्न, शेतकरी, कामगारांचे प्रश्न व प्रशासकीय बातम्यांचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) |

शेतकऱ्यांच्या हक्कलढ्याचा इतिहास गणरायाच्या चरणी! 🙏आसूड मोर्चा आंदोलनाचे यश - ३८ व्या विशेषांकाचे दगडूशेठ मंदिरात प्रकाश...
03/09/2026

शेतकऱ्यांच्या हक्कलढ्याचा इतिहास गणरायाच्या चरणी! 🙏

आसूड मोर्चा आंदोलनाचे यश - ३८ व्या विशेषांकाचे दगडूशेठ मंदिरात प्रकाशन
सुनील भाऊ रासने यांच्या हस्ते, विठ्ठल राजे पवार यांच्या अध्यक्षतेत

४० लाख ऊस उत्पादकांना दिलासा मिळवून देणारा ऐतिहासिक लढा!

म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता; मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्यपुणे, दि.२ : पुणे ग...
02/09/2026

म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता; मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य

पुणे, दि.२ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत १५ टक्के सामाजिक व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अडचणींचा विचार करून मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात झाली. अर्जदारांच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

🔴 BREAKING: PMC मधील रिक्त पदांचा डोंगर उघड!१२ वर्षांपासून सरळसेवेची भरतीच नाही - कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण!PMC एम...
02/09/2026

🔴 BREAKING: PMC मधील रिक्त पदांचा डोंगर उघड!

१२ वर्षांपासून सरळसेवेची भरतीच नाही - कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण!
PMC एम्प्लॉईज युनियनची तदर्थ पदोन्नतीची आयुक्तांकडे मागणी

🔴 पुणे महापालिकेच्या ट्रकचा अपघात!धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५ लाखांची सानुग्रह मदत द्या- प्रमोद नाना ...
02/09/2026

🔴 पुणे महापालिकेच्या ट्रकचा अपघात!

धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५ लाखांची सानुग्रह मदत द्या
- प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिकेकडे मागणी

घटना: पुणे महानगरपालिका - आरोग्य विभाग ट्रक MH12V F1258

पुण्यात ७४ कोटींचा कचरा प्रकल्प: हडपसर रामटेकडीत उभारणार ७५ MTPD ड्राय वेस्ट प्लांटग्रीन पृथ्वी कंपनीला २० वर्षांसाठी कं...
02/09/2026

पुण्यात ७४ कोटींचा कचरा प्रकल्प: हडपसर रामटेकडीत उभारणार ७५ MTPD ड्राय वेस्ट प्लांट

ग्रीन पृथ्वी कंपनीला २० वर्षांसाठी कंत्राट*

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा एक मोठा प्रस्ताव समोर आला आहे. शहरातील सुक्या कचऱ्यावरील, विशेषतः कापड, चिध्या, होजिअरी, फर्निचर आणि लाकडाच्या कचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठी हडपसर रामटेकडी येथे *७५ MTPD क्षमतेचा Dry Waste Processing Plant* उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल *७४ कोटी ६ लाख ८६ हजार १९६ रुपये* इतका खर्च अपेक्षित आहे.

झोन २ मध्ये, मौजे हडपसर येथील फायनल प्लॉट नंबर १०४, रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील टी. पी. स्कीममधील सुमारे ११ एकर एम. पी. आरक्षित जागेपैकी दक्षिणेकडील १ एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येईल.

बी-२ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामासाठी मे. *ग्रीन पृथ्वी सोल्युशन्स एलएलपी, पुणे* या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने सुरुवातीला प्रकल्प उभारणीसाठी रु. १३,०३,७५,०००/- इतकी रक्कम सांगितली होती.

परंतु आयुक्तांनी यंत्रसामग्रीचा खर्च (Machinery Capex) कंत्राटदाराने तर स्थापत्य विषयक खर्च (Civil Capex) महापालिकेने करण्याची सूचना दिल्यानंतर सुधारित प्रस्ताव मागवण्यात आला.

Address

M1B, 515, Abhiruchi Paranjape Parisar, Dhayari
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Karbhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Karbhari:

Shortcuts

Share