DCN Marathi

DCN Marathi Your City, Your News. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. +91 7066522178

The Daily City News (DCN) is an Indian news portal based in the Peshwa City with a readership that transcends borders and timelines. DCN presents the readers around the world with an immediate access of the 360 degrees daily news offerings of Pune, state, country and the world at large.

13/08/2026

पुणे : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर आज नांदेडमध्ये झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील हल्लेखोराची ओळख ६२ वर्षीय जसपाल सिंग अशी झाली असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. नांदेड पोलिसांनी त्याला अटक केली असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, जसपाल सिंगच्या पुण्यातील निवासस्थानी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा पुण्यातील मुक्काम, त्याचे कुटुंबीय, संपर्क आणि नांदेडला जाण्यापूर्वीच्या हालचाली याबाबत माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेडमधील गुरुद्वारात बादल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा यंत्रणेने वेळीच हल्लेखोराला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली, तर सुरक्षा रक्षक जखमी झाला.

पुण्यातील चौकशीदरम्यान हल्लेखोर�

13/08/2026

पुणे स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसर गुरुवारी देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी दुमदुमून गेला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पुणे बँडच्या वतीने देशभक्तीपर गीतांची शानदार प्रस्तुती करण्यात आली.

सीआरपीएफ बँडच्या सुमधुर धुनांनी उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे शनिवारवाडा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभक्तीपर गीतांचा आनंद घेतला.

स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणे, तसेच नागरिकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला विशेष रंगत आली.

13/08/2026

पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे मागील काही दशकांपासून राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली. रोजगार आणि शिक्षणाच्या संधींमुळे देशाच्या विविध भागांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतरामुळे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चाकणमधील तब्बल २० उद्योजकांनी उद्योगासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे, तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चाकणमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

चाकण हे देशातील महत्त्वाच्या वाहननिर्मिती केंद्रांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चाकणमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. २०२४ मध्ये चाकणमधून तब्बल ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र �

पुणे: अभिनेता संजय दत्त आणि हेरंब शेळके यांच्याशी संबंधित पुण्यातील ‘बॉलर’ नाइटक्लबला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका द...
13/08/2026

पुणे: अभिनेता संजय दत्त आणि हेरंब शेळके यांच्याशी संबंधित पुण्यातील ‘बॉलर’ नाइटक्लबला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पीपीएल इंडियाच्या हक्कातील ध्वनिमुद्रित गाणी वैध परवान्याशिवाय सार्वजनिकरित्या वाजवण्यास न्यायालयाने तात्पुरती मनाई केली आहे.

पीपीएल इंडियाने न्यायालयात दावा दाखल करत ‘बॉलर’मध्ये त्यांच्या हक्कातील हिंदी चित्रपटांतील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय गाणी परवान्याशिवाय वाजवली जात असल्याचा आरोप केला होता.

पीपीएल इंडियाच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या प्रतिनिधीने २४ जून रोजी ‘बॉलर’ला भेट दिली होती. त्या वेळी संस्थेच्या हक्कातील अनेक गाणी नाइटक्लबमध्ये वाजवली जात असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला.

यामध्ये ‘बदतमीज दिल’, ‘मौजा ही मौजा’, ‘दर्द-ए-डिस्को’, ‘ओ साकी साकी’ आणि ‘दस बहाने’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय जस्टिन बीबर आणि दुआ लिपा यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांची गाणीही वाजवली गेल्याचा दावा पीपीएल इंडियाने केला आहे.

या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे ‘बॉलर’ने यापूर्वी पीपीएल इंडियाकडून गाणी सार्वजनिकरित्या वाजवण्यासाठी आवश्यक परवाना घेतला होता.

मात्र, हा परवाना संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तरीही संस्थेच्या हक्कातील गाणी वाजवली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पीपीएल इंडियाच्या बाजूने तात्पुरता दिलासा देत, वैध परवाना घेतल्याशिवाय त्यांच्या हक्कातील ध्वनिमुद्रित गाणी सार्वजनिकरित्या वाजवू नयेत, असे निर्देश दिले.



(Bouncer Nightclub Pune, PPL India, Bombay High Court, Sanjay Dutt, Heramb Shelke, Pune Nightclub, Music Copyright Case, Music Licensing, Copyright Infringement, Pune News)

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

13/08/2026

पुणे : मुसळधार पावसामुळे राजगड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाजेघर–राजगड मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजगड किल्ल्यावर जाणारे पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थीही खराब रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत.

या महत्त्वाच्या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.



(Rajgad Fort, Wajeghar Rajgad Road, Pune PWD, Rajgad Road Potholes, Wajeghar Road, Pune Road Conditions, Pothole Problem, Road Safety, Tourist Route, Pune Monsoon News)

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

13/08/2026

पुणे : महिला उबर चालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला चालकाला अधिक भाडे असणारी दुसरी राइड मिळाल्याने तिने प्रवाशांना वाहनातून खाली उतरण्यास सांगितल्याचे व्हीडिओमध्ये म्हटले जात आहे. मात्र, राइड रद्द केल्यास शुल्क आकारले जाऊ शकते, या भीतीने प्रवाशांनी वाहनातून उतरण्यास नकार दिला. त्यानंतर महिला चालक आणि प्रवासी तरुणींमध्ये जोरदार वाद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच उबरने या प्रकरणाची दखल घेतली आहे का, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हायरल व्हिडिओतील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.



(Uber, Uber Pune, Uber Driver, Pune Uber Ride, Uber Passengers, Pune Viral Video, Ride Dispute, Cab Driver Dispute, Uber Ride Argument, Pune News)

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

13/08/2026

पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील समस्या गंभीर असून, सरकारने त्याची दखल घेतली आहे. याबाबत बैठकही घेण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर चाकणमधील रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासोबतच पुण्यातील चाकणसह सर्व एमआयडीसी क्षेत्रांचा औद्योगिक नागरी वसाहतींमध्ये (इंडस्ट्रियल टाऊनशिप) विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरविकास विभाग आणि उद्योग विभागाला दिले आहेत. त्यामुळे औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासह उद्योगांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.



(Devendra Fadnavis, Chakan MIDC, Pune MIDC, Industrial Township, Chakan Infrastructure, Pune Industrial Area, Maharashtra Industries, Industrial Development, Chakan Development, Pune News)

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

पुणे : मोक्का (अंतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. निलेश ...
13/08/2026

पुणे : मोक्का (अंतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. निलेश घायवळ टोळीतील महत्वाचे हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष अनंत धुमाळ आणि विपुल उत्तम माशिरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या गुन्ह्यातील आरोपी संतोष धुमाळ हा पोलिसांना चकवा देत फरार होता. तो कोथरूड गावठाण परिसरातील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सोसायटीच्या परिसरात नजर ठेवली. आरोपी फ्लॅटमध्ये येऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

तर दुसरा आरोपी विपुल उत्तम माशिरे हा मुळशी तालुक्यातील रावडे येथील रहिवासी असून, त्याच्या हालचालींबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. तो बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले यांच्या दुकानामागे भेटण्यासाठी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळातच विपुल माशिरे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक अनिल माने, सुनील कारोटे, सुधीर घुले आणि त्यांच्या पथकाने केली.



(Nilesh Ghaywal Gang, Santosh Anant Dhumal, Vipul Uttam Mashire, Kothrud Police, Pune Police, MCOCA Case, Pune Crime News, Fugitive Accused Arrested, Nine Year Absconding Case, Pune Gang Crime)

Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

Address

No. 14, 3, Drive Babasaheb Ambedkar Road, Camp
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when DCN Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share