12/07/2025
भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. मध्यंतरीचा काही काळ सोडला, तर सतत त्यांची प्रतिमा देशीविदेशी कलाकारांना आव्हान देत आली, आवाहन करीत आली. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अचारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत.
हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !
कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली, तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, ते मात्र भारतीय कलेतिहासाचे साहित्यिक जतन-संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेल्या सुहास बहुळकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी शैलीतले हे पुस्तक म्हणजे इतिहास, चित्रकला आणि शिल्पकला या तिन्ही क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांच्या अतुलनीय कार्यकर्तृत्वाला दिलेली मानवंदनाच आहे !
अधिक माहितीसाठी संपर्क:📞9921982828 or 9769882984.
⛳️
[ marathi pustak , marathi books , chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maratha , marathi , mi marathi , pune , kitabwala ]